पोस्ट्स

MB NEWS- *सेवाधर्म : फ्रंट लाईन फिल्डवर्कर पत्रकार बांधवांना कोरोना सुरक्षा किट वितरण शुभारंभ*

इमेज
 *सेवाधर्म : फ्रंट लाईन फिल्डवर्कर पत्रकार बांधवांना कोरोना सुरक्षा किट वितरण शुभारंभ* परळी वैजनाथ, प्रतिनिधी...           ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या सेवाधर्म :सारे काही समष्टीसाठी उपक्रमांतर्गत फ्रंट लाईन फिल्डवर्कर असलेल्या पत्रकार बांधवांना कोरोना सुरक्षा किट वितरण शुभारंभ करण्यात आला.            राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या सहकार्याने व गटनेते वाल्मिकअण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सेवाधर्म या उपक्रमात कोरोना फ्रंट लाईन लीडर यांना कोरोना सुरक्षा किटचे सुनियोजित पद्धतीने वितरण चालू असून आज पत्रकार बंधू भगिनींना सुरक्षा किट वितरणाची सुरुवात संपादक मंडळ यांच्यापासून करण्यात आली. यावेळी दै.मराठवाडा साथी चे कार्यकारी संपादक प्रशांत जोशी,दै.जगमित्रचे संपादक बाळासाहेब कडभाने, दै.दिव्यअग्नी चे संपादक प्रकाश सुर्यकर, दै.वैद्यनाथ वार्ताचे संपादक रामप्रसाद गरड, दै.परळी प्रहारचे राजेश साबणे,...

MB NEWS-परळीत ब्राम्हण महिला मंच तर्फे परशुराम जन्मोत्सव साजरा

इमेज
  परळीत ब्राम्हण महिला मंच तर्फे परशुराम जन्मोत्सव साजरा  परळी वैजनाथ - सकल ब्रह्मवृंदाचे आराध्य दैवत असेलेल्या भगवान परशुराम जन्मोत्सव शहरातील ब्राम्हण महिला मंच तर्फ साजरा करण्यात आला.कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम व अटींचे पालन करून भगवान परशुरामांना यावेळी वंदन करण्यात आले.श्री विष्णूंचा सहावा अवतार असणाऱ्या भगवान परशुराम यांच्या प्रतिमेला यावेळी पुष्पहार अर्पण करण्यात आला. परशुराम स्त्रोत्राचे 11 वेळा पठण करून आरती व मंत्रपुष्पांजली करत या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.पहले ब्राम्हण होने पर गर्व था, अब ब्राम्हण होने पे घमंड है.. पंडित की संतान है हम. इतना रुतबा रखते है . इतिहास क्या चीज है . हम तो भूगोल बदलने का दम रखते है जय परशुराम - जय श्री राम अशा घोषणा यावेळी देण्यात आला.यावेळी ब्राम्हण महिला मंच परळी अध्यक्षा वर्षा जोशी,किर्ती धोंड,सुमेधा जोशी,अर्चना दगडगुंडे,शोभा कुलकर्णी,विद्या खिस्ते आदि महिलांची उपस्थिती होती.

MB NEWS-धनुभाऊंचा सेवाधर्मउपक्रम कठिण काळात ठरतोय 'संजीवनी' !* ⬛ *महिला व लहान मुलांमुलीं करिता मोफत 100 बेडचे विलगीकरण केंद्र बनले 'आधारगृह'*

इमेज
 * धनुभाऊंचा सेवाधर्मउपक्रम कठिण काळात ठरतोय 'संजीवनी' !*  ⬛ *महिला व लहान मुलांमुलीं करिता मोफत 100 बेडचे विलगीकरण केंद्र बनले 'आधारगृह'*   परळी वैजनाथ, प्रतिनिधी.......         कोरोना महामारी ने संपुर्ण जगला विळखा घातला असताना अनेक व्यक्ती, संस्था पुढे येऊन  मदत करत आहेत.कोरोनाचा वाढता कहर पाहता  करोनाग्रस्त जनतेसाठी मदत म्हणून विविध क्षेत्रातील लोक काम करत आहेत. ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी व तालुक्यात सेवाकार्य मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. सर्वस्तरातील सर्वतोपरी 'सेवाकार्य' परळीतील कोरोना बाधितांसाठी  'संजीवनी' ठरत आहे.धनुभाऊंचा सेवाधर्म उपक्रम या कठिण काळात खरोखरच लोकोपयोगी व लाभदायक ठरत आहे.महिला व लहान मुलांमुलींकरिता मोफत 100 बेडचे विलगीकरण केंद्र खुप मोठे 'आधारगृह' ठरले आहे.          राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे  यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या कोविड काळातील मदतीचा सेवाधर्म...सारं काही समष्टिसाठि या लोकोपयोगी अभिनव उपक...

MB NEWS-बहरात असताना झाली छाटणी..... अंगभर साज,शृंगाराला हात घालून केले विवस्त्र ! ⬛ एक-एक फांदी अन् एक एक पान ढसढसा रडले तर नसेल ना... संवेदनशील मनाला रुखरुख ⬛

इमेज
  बहरात असताना झाली छाटणी..... अंगभर साज,शृंगाराला  हात घालून केले विवस्त्र ! ⬛ एक-एक फांदी अन् एक एक पान ढसढसा रडले तर नसेल ना... संवेदनशील मनाला रुखरुख ⬛ परळी वैजनाथ, प्रतिनिधी...      संवेदनशील मनाला रुखरुख लागून जाईल अशा काही घटना अवतीभवती नेहमीच घडतात.साध्या सरळ व सामान्य दिसणार्या या घटना मात्र कधीकधी मनात रुतुन जातात.अशाच प्रकारची घटना परळीतील संवेदनशील मनाच्या एका छायाचित्रकाराला अनुभवायला मिळाली आहे. या घटनेने मनाच्या खोलवर ही वेदना भळभळत असुन जिवापाड जपलेल्या एका वृक्षाची बहरात असताना झालेली छाटणी या छायाचित्रकाराला बैचेन व हतबल करुन टाकत आहे. अंगभर साज,शृंगाराला हात घालून विवस्त्र करावे असेच या झाडाबाबत घडल्याची खंत व्यक्त होत आहे.       सध्याच्या वातावरणामध्ये आॅक्सिजनचे महत्त्व प्रत्येकाला लक्षात आले आहे.आॅक्सिजन मिळवण्यासाठी नाही नाही ते करावे लागत आहे.गेल्या अनेक वर्षांपासून वृक्षसंवर्धन चळवळ उभी करून अधिकाधिक झाडांचे संवर्धन होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.परळीतही २०११ मध्ये फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने वृक्षलागवड मोहीम राबविण्या...

MB NEWS-सेवाधर्म; कोविडसेवा देणाऱ्या वाहनचालकांना मोफत कोरोना सुरक्षा किट*

इमेज
  सेवाधर्म; कोविडसेवा देणाऱ्या वाहनचालकांना मोफत कोरोना सुरक्षा किट* परळी (दि. 14) ---- : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजयजी मुंडे साहेब यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या आणि कोरोनाच्या प्रादुर्भावात नागरिकांना एक आधार म्हणून सुरू असलेल्या सेवाधर्म उपक्रमांतर्गत विविध कोविड मध्ये सेवा देत असलेल्या रिक्षा, रुग्णवाहिका, शववाहिका आदी वाहनांवरील चालकांना मोफत कोरोना सुरक्षा किट वाटप करण्यात आले. न.प. गटनेते वाल्मीकअण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली आज परळीतील रुग्णवाहतुक, रुग्णसेवा तसेच नगर परिषदेस कोरोना रुग्णाची अंत्यविधि करण्यासाठी सहकार्य करणारे वाहन चालक यांना कोरोना सुरक्षा किटचे वितरण करण्यात आले. यावेळी नागनाथ भाग्यवंत, गणेश काळे, वैजनाथ कासार, शरीफ भाई, मुखतार सेठ, कोयला भाई, सिद्धेश्वर फड, महादेव भोसले, हनुमंत कराड, संतोष गायकवाड, योगेश पिसाळ, जावेद शेख, वैजनाथ खरोडे, नारायण गित्ते, राम पाळवदे यांच्यासह अनेक चालकांना कोरोना सुरक्षा किट देण्यात आले.    यावेळी रा.कॉ. शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, युवक तालुकाअध्यक्ष संतोष शिं...

MB NEWS-पं.स.सभापती बालाजी मुंडे यांनी घेतला लसिकरणाचा आढावा ना.धनंजय मुंडे साहेबांच्या माध्यमातुन आवश्यक तो लस पुरवठा करु-मुंडे

इमेज
 पं.स.सभापती बालाजी मुंडे यांनी घेतला लसिकरणाचा आढावा ना.धनंजय मुंडे यांच्या माध्यमातुन आवश्यक तो लस पुरवठा करु-मुंडे  परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-   परळी शहरासह तालुक्यातील लसिकरण केंद्रावर लस उपलब्ध करुन देण्यात आली असुन येणार्या काळात सर्व नागरीकांचे लसिकरण पुर्ण होण्यासाठी पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या माध्यमातुन आवश्यक तो लसींचा साठा उपलब्ध करु असे पंचायत समितीचे सभापती बालाजी (पिंटु) मुंडे यांनी सांगितले. शहरातील एका व तालुक्यातील पाच केंद्रावरील लसिकरण केंद्रांना भेटी देवुन आढावा घेतला त्याप्रसंगी ते बोलत होते.    सध्या उपलब्ध असलेल्या लसींमधून ज्या नागरिकांना पहिला डोस देऊन विहित वेळ पूर्ण झाली आहे, त्यांना दुसरा डोस वेळेत देणे आवश्यक असल्याने परळी तालुक्यातील नटराज रंगमंदिर व प्रा आ केंद्र मोहा, प्रा आ केंद्र पोहनेर , प्रा आ केंद्र सिरसाळा प्रा आ केंद्र धर्मापुरी, प्रा आ केंद्र नागापूर येथील लसीकरण केंद्रावर 45 वर्षांवरील दुसऱ्या डोस साठी पात्र असलेल्या नागरिकांसाठी दुसरा डोस उपलब्ध करुन देण्यात आला. शुक्रवारी दि.14 मे रोजी सभापती बालाजी मुंड...

MB NEWS- *गाढे पिंपळगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती संभाजी व महात्मा बसवेश्वर जयंती साजरी*

इमेज
 *गाढे पिंपळगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती संभाजी व महात्मा बसवेश्वर जयंती साजरी* परळी वैजनाथ दि.१४ (प्रतिनिधी)           तालुक्यातील गाढे पिंपळगाव येथे स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज व जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती कोरोना विषयक उत्साहात साजरी करण्यात आली.              गाढे पिंपळगाव येथे शुक्रवारी (ता.१४) छत्रपती संभाजी महाराज व महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्रामपंचायतचे उपसरपंच रामेश्वर वाघमोडे, रामेश्वर घेवारे व बन्सी सोनवणे यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज व महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी गुरुलिंग महाराज फुटके यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या जिवन कार्याचा आढावा मांडताना सांगितले की, १२ व्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी समता प्रस्थापित व्हावी यासाठी प्रत्यक्ष कार्य केले. जातीय व्यवस्था निर्मुलन करण्यासाठी प्रयत्न केले. तर माजी सरपंच कांतराव सोनवणे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याची माह...