पोस्ट्स

MB NEWS-वंचितांचा लढा लढणे ; ज्यांचा कुणी वाली नाही त्यांची वाणी होणे ही माझी भूमिका : पंकजाताई मुंडे* *लातूर येथे पार पडला ओबीसींचा भव्य महामेळावा*

इमेज
 *ओबीसींचे राजकीय आरक्षण पुनर्स्थापित होईपर्यंत लढा सुरूच राहणार* * वंचितांचा लढा लढणे ; ज्यांचा कुणी वाली नाही त्यांची वाणी होणे ही माझी भूमिका : पंकजाताई मुंडे* *लातूर येथे पार पडला ओबीसींचा भव्य महामेळावा* लातूर । दिनांक १४ । स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसींचे राजकीय आरक्षण जोपर्यंत पुनर्स्थापित होत नाही तोपर्यंत ओबीसींच्या न्याय हक्कासाठी लढा सुरू राहील,आरक्षण पूर्ववत झाल्यानंतरच राज्यात निवडणुका होतील अशी भूमिका भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी मांडली.लातूर येथे पार पडलेल्या ओबीसी आणि भटक्या विमुक्त जातींच्या महाजागर महामेळाव्याला संबोधित करताना त्या बोलत होत्या.  यावेळी मंचावर माजी मंत्री राम शिंदे,आ.संभाजी पाटील निलंगेकर,आ.नरेंद्र पवार,आ.रमेश कराड,आ.अभिमन्यू पवार,खा.सुधाकर शृंगारे,योगेश टिळेकर,सुधाकर भालेराव,गोविंद केंद्रे, पाशा पटेल,राहुल केंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.मेळाव्याच्या सुरुवातीला लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले व तदनंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उदघाटन करण्यात आले. यावेळी ओबीसी...

MB NEWS-राजेश गिते यांच्या लोकनेता संपर्क कार्यालयात बेलंबा गावचे ग्रामविकास अधिकारी रणवीर यांचा सत्कार*

इमेज
  राजेश गिते यांच्या लोकनेता संपर्क कार्यालयात बेलंबा गावचे ग्रामविकास अधिकारी रणवीर यांचा सत्कार परळी वैजनाथ, प्रतिनिधी...      राजेश गिते यांच्या लोकनेता संपर्क कार्यालयात बेलंबा गावचे ग्रामविकास अधिकारी रणवीर यांचा ह्रद्य सत्कार करण्यात आला.       बेलंबा येथे कार्यरत असलेले ग्रामविकास अधिकारी रणवीर यांची नुकतीच माजलगाव येथे बदली झाली आहे. त्याअनुषंगाने राजेश गिते यांच्या लोकनेता संपर्क कार्यालयात रणवीर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. या सत्काराचे रणवीर कुटुंबिय भारावुन गेले.यावेळी राजेश गित्ते यांनी त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

MB NEWS-पंकजाताई मुंडे यांनी शेतकरी, नागरिकांच्या जागोजागी थांबून जाणून घेतल्या व्यथा!* *पावसाअभावी पिकांचे नुकसान ; विमा मिळत नसल्याचेही मांडले गाऱ्हाणे*

इमेज
  पंकजाताई मुंडे यांनी शेतकरी, नागरिकांच्या जागोजागी थांबून जाणून घेतल्या व्यथा! पावसाअभावी पिकांचे नुकसान ; विमा मिळत नसल्याचेही मांडले गाऱ्हाणे परळी ।दिनांक १४।   ओबीसी मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी लातूर कडे जाताना भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी रस्त्यात जागोजागी थांबून परळी मतदारसंघातील शेतकरी व नागरिकांच्या समस्या, व्यथा जाणून घेतल्या. पावसा अभावी सध्या पिकांचे होत असलेले नुकसान आणि पीक विमा मिळत नसल्याबद्दल शेतकऱ्यांनी त्यांचेकडे गाऱ्हाणे मांडले.    पंकजाताई मुंडे हया आज सकाळी परळीहून लातूरकडे जाण्यासाठी निघाल्या असता रस्त्यात ठिकठिकाणी त्यांनी शेतकरी व नागरिकांच्या भेटी घेतल्या. वरवटी येथे शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.पावसाअभावी हाताशी आलेले पीक जाण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी त्यांचेकडे चिंता व्यक्त केली. तसेच पीक विम्याबाबत ही यावेळी शेतकऱ्यांनी गाऱ्हाणे मांडले.यासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा करून न्याय मिळवून देण्याचा विश्वास त्यांनी शेतकऱ्यांना दिला. वरवटी नंतर पिंपळा धायगुडा, शेपवाडी, अंबाजोगाई, वाघाळा, राडी, सायगां...

MB NEWS-कु.मंजुश्री घोणे च्या संकल्पनेतून७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ७५ कृतीयुक्त संकल्प

इमेज
   कु.मंजुश्री घोणे च्या संकल्पनेतून७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ७५ कृतीयुक्त संकल्प  ---------------------------------------------------------------------                                                             दि. ११/०८/२१ प्रति, भारत वर्षाचे कर्तव्यदक्ष पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजी  नमस्कार, मी मंजुश्री सुर्यकांत घोणे महाराष्ट्रातील मराठवाडा येथील डिघोळ ता. सोनपेठ जि. परभणी ची रहिवासी. दयानंद कला महाविद्यालय, लातूर येथे बी.ए अंतिम वर्षाचे शिक्षण घेत आहे. जागतिक आपत्तीच्या कालखंडात आपण केलेले आपत्ती व्यवस्थापनाचं कार्य आपल्या देशासाठी नव्हे तर जगासाठी दिशादर्शक ठरले यांचा आम्हा भारतीयांना सार्थ अभिमान वाटतो. आपल्याकडे अगदीच तुटपुंजी व्यवस्था असताना या व्यवस्थेला कर्तव्यदक्ष करत. सर्वसामान्य माणसाच्या मदतीने, नोकरशाही वर्गाच्या माध्यमातून, प्रत्येकाच्या सहकार्यातून आलेल्या संकटाला मात देऊन. संकटाच्या लढाईला ...

MB NEWS-परळीत 585 कर्णबधिर दिव्यांगांना अत्याधुनिक डिजिटल श्रवण यंत्राचे वितरण

इमेज
  सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून राज्यात दिव्यांगांना सहाय्यक उपकरणे वाटपाची यशस्वी चळवळ सुरू - खा. सुप्रिया सुळे कायमस्वरूपी कर्णबधिर असलेल्या दिव्यांग बांधवांच्या कानात आवाज ऐकू येणे याचे समाधान फार मोठे - धनंजय मुंडे परळीत 585 कर्णबधिर दिव्यांगांना अत्याधुनिक डिजिटल श्रवण यंत्राचे वितरण परळी (दि. 14) ---- : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून राज्यभरातील दिव्यांग व्यक्तींना राज्य सरकार, केंद्र सरकार, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान अशा विविध माध्यमातून विविध सहाय्यक उपकरणे मिळवून देण्याची एक आगळी वेगळी यशस्वी चळवळ सुरू झाली असून, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या या कामाचा अभिमान असल्याचे मत खा. सुप्रियाताई सुळे यांनी व्यक्त केले आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, बीड जिल्हा आरोग्य विभाग, धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजना व स्वरूप फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने परळी येथील लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर येथे 585 गरजू दिव्यांग व्यक्तींना सुमारे 25 हजार रुपये किमतीचे डिजिटल श्रवण यंत्र मोफत वाटप करण्यात आले, या कार्यक्रम...

MB NEWS- *आजचा कोविड अहवाल: जिल्ह्याचे आकडेवारी कमी होत असताना परळी तालुक्याचा आकडा वाढतोय !* _आज परळी तालुक्यात ६ रुग्ण तर जिल्ह्यात १३९ पाॅझिटिव्ह_

इमेज
 *आजचा कोविड अहवाल: जिल्ह्याचे आकडेवारी कमी होत असताना परळी तालुक्याचा आकडा वाढतोय !* _आज परळी तालुक्यात ६ रुग्ण तर जिल्ह्यात १३९ पाॅझिटिव्ह_ परळी वैजनाथ, प्रतिनिधी....         आरोग्य प्रशासनाच्या वतीने कोविड -१९ रुग्णांच्या बाबतीत दैनंदिन अहवाल जाहीर करण्यात येतो. गेल्या अनेक दिवसात  बीड जिल्ह्याच्या दैनंदिन covid-19 अहवालात परळी तालुक्यातील संख्या कमी झालेली दिसत आहे. मात्र ०ते २-३ असा दिसणारा आकडा आज वाढलेला दिसतो आहे. आजच्या अहवालात परळी तालुक्यातील संख्या ०६ आहे.                    आजच्या कोविड- 19 दैनंदिन अहवालात जिल्ह्यात पाॅझिटिव्ह रुग्णसंख्या १३९आहे.संख्या ओसरत असतानाच परळी तालुक्याची संख्या हळूहळू झिरो पाॅझिटिव्हकडे जाताना दिसत होती. मात्र आज  परळी तालुक्याची संख्या ०६ झाली आहे.  कोरोना संसर्गाची साखळी  संपुर्णतः तुटलेली दिसून येत नाही. झिरो कोरोणा करण्याच्या दृष्टीने नागरिकांनी सतर्कता बाळगण्याची नितांत आवश्यकता असून कोविड विषयक नियमांचे पालन करावे व सोशल डिस्टंसिंग, मास्कचा वापर, आ...

MB NEWS- खा.सुप्रियाताई सुळे व मंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते आज मोफत डिजीटल श्रवणयंत्र (कानांच्या मशीन)चे होणार वाटप ; शिबीरास उपस्थित राहावे- डॉ. संतोष मुंडे

इमेज
 खा.सुप्रियाताई सुळे व मंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते आज मोफत डिजीटल श्रवणयंत्र (कानांच्या मशीन)चे होणार वाटप ; शिबीरास उपस्थित राहावे- डॉ. संतोष मुंडे परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  खासदार सुप्रियाताई सुळे व  सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक मंत्री तथा बीडचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते 585 गरजू व्यक्तींनासाठी अंदाजे 25 हजार रुपये किंमतीच्या मोफत डिजिटल  श्रवणयंत्र (कानाची मशीन) वाटप शिबिराचे उद्घाटन आज शनिवार, 14 आँगस्ट रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. तरी पुर्व तपासणी झालेल्या रूग्णांनी कोरोनाचे सर्व नियम पाळून उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, धनंजय मुंडे आरोग्य मित्र  योजनेचे प्रदेशाध्यक्ष तथा शिबीर संपर्क प्रमुख डॉ. संतोष मुंडे यांनी केले आहे.               शहरातील लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराजरंग मंदिर येथे  स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून दि.14, 15 व 16 आँगस्ट रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, जिल्हा आरोग्य विभाग, बीड, नाथ प्रतिष्ठान, परळी वैजनाथ, धनंजय मुंडे...