पोस्ट्स

MB NEWS-वाढदिवस विशेष:शेतकर्यांच्या प्रश्नासाठी बांधावर जाऊन संघर्ष करणारे नेतृत्व राजेश गित्ते

इमेज
  शेतकर्यांच्या प्रश्नासाठी बांधावर जाऊन संघर्ष करणारे नेतृत्व राजेश गित्ते  परळी- परळी तालुका हा राजकिय जागृती असलेला तालुका म्हणुन ओळखला जातो.राज्य व राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात गाजत असलेल्या अनेक नेते घडले.स्थानिक पातळीवरील राजकारणात या नेत्यांची भुमिका महत्वपुर्ण ठरत आली आहे.अशा काही मोजक्या नेतृत्वापैकी स्वकर्तृत्वाने राजकारण,समाजकारणात अढळ स्थान निर्माण केलेले व शेतकरी,कष्टकरी यांना केंद्रबिंदू मानुन त्यांच्या प्रश्नांसाठी बांधावर उतरुन हाती घेतलेला प्रश्न मार्गी लावणारे व परळीच्या ग्रामीण भागाची ओळख निर्माण केलेले नेतृत्व म्हणजे राजेश गित्ते.  कै.प्रा.एच.पी.गित्ते यांचे शैक्षणीक क्षेत्रातील योगदान व शिस्त यामुळे गित्ते परिवार पुर्वीपासुनच परळी तालुक्यात परिचित होता.शैक्षणीक वारशाच्या या घरात जन्मलेल्या राजेश गित्ते यांच्याकडे बालपणापासुनच नेतृत्वगुण वाढत गेले.विद्यार्थीदशेत अनेक उपक्रम,आंदोलनात सहभाग नोंदवत हे युवानेतृत्व फुलत गेले.सर्वांना सोबत घेवुन चालण्याच्या त्यांच्या कार्यशैलीमुळे अगदी कमी वयात त्यांनी आपल्या बेलंबा गावचे सरपंच होण्याचा मान पटकावला.इतर सरपं...

MB NEWS-तेली युवक संघटना, श्री.शनैश्वर प्रतिष्ठान व महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभेच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त शिक्षक सन्मान व विद्यार्थी गुण गौरव सोहळा उत्साहात संपन्न*

इमेज
  तेली युवक संघटना, श्री.शनैश्वर प्रतिष्ठान व महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभेच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त शिक्षक सन्मान व विद्यार्थी गुण गौरव सोहळा उत्साहात संपन्न परळी वैजनाथ दि.०६ (प्रतिनिधी)           येथील तेली युवक संघटना, श्री.शनैश्वर प्रतिष्ठान व महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभेच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त शिक्षक सन्मान व विद्यार्थी गुण गौरव सोहळ्याचे आयोजन रविवारी (ता.०५) आर्य वैश्य मंगल कार्यालयात करण्यात आले होते. हा सोहळा उत्साहात संपन्न झाला.                  येथील तेली युवक संघटना, श्री.शनैश्वर प्रतिष्ठान व महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभेच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त शिक्षक सन्मान व विद्यार्थी गुणगौरव सोहळा व नियुक्ती समारंभाचे आयोजन आर्य वैश्य मंगल कार्यालयात करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री.संत संताजी महाराज व डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळीतेली समाजातील १० वी १२ वी उत्तीर्ण झालेल्या व कोविड काळात मुंबई येथील धारावी व लोकमा...

MB NEWS-माजी नगरसेविका शोभनाताई बद्दर यांचे दुःखद निधन जेष्ठ पञकार दिलिप बद्दर यांना पत्नी शोक

इमेज
  माजी नगरसेविका शोभनाताई बद्दर यांचे दुःखद निधन जेष्ठ पञकार दिलिप बद्दर यांना पत्नी शोक परळी वै...  शिवसेनेच्या माजी नगरसेविका शोभनाताई दिलिपराव बद्दर यांचे आज दुपारी 1 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले असुन त्या जेष्ठपञकार दिलिपराव बद्दर यांच्या पत्नी होत. शोभनाताई बद्दर यांच्या पार्थिव देहावर अंतिम संस्कार आज सायंकाळी 5 वाजता परळी येथील राजस्थानी स्मशानभुमी येथे करण्यात येणार आहे. शोभनाताई बद्दर यांच्या पश्चात पती,दोन मुली एक मुलगा, दिर जावा असा मोठा परिवार आहे.बद्दर परिवारावर कोसळलेल्या दुःखात एमबी  न्युज परिवार सहभागी आहे.

MB NEWS- *करुणा शर्मा यांना न्यायालयीन कोठडी; न्यायालयात स्वतःच मांडली बाजू*

इमेज
 *करुणा शर्मा यांना न्यायालयीन कोठडी; न्यायालयात स्वतःच मांडली बाजू*  परळी वैजनाथ, प्रतिनिधी      जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या करुणा शर्मा यांना अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी मंजूर केली आहे. तर या प्रकरणातील अन्य एक आरोपी असलेल्या अरुण मोरे यांस एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान न्यायालयामध्ये वकील पोहोचू न शकल्याने करुणा शर्मा यांनी स्वतः आपली बाजू न्यायालयासमोर मांडली.       राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या बाबतीत बेछुट आरोप करुन परळीत पत्रकार परिषद घेऊन सत्य जगासमोर आणण्याचा दावा करून  काल दि.५ रोजी परळी मध्ये दाखल झालेल्या करुणा शर्मा यांची काही महिलांसोबत बाचाबाची झाली.  त्यानंतर जातीवाचक शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याच्या आरोपावरून करुणा शर्मा यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली होती. त्याप्रमाणे करुणा शर्मा यांच्या गाडीची झडती घेतली असता एक पिस्तूल आढळून आला ...

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

इमेज
 *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय* परळी (दि. 05, प्रतिनिधी) - सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बेछूट आरोप करणाऱ्या कथित करुणा शर्मा परळीत आल्या असता त्यांच्या गाडीत पोलिसांना पिस्तुल आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. तूर्तास परळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून चौकशी चालू असल्याचे समजते आहे.  परळीत येऊन पत्रकार परिषद घेणार, पुरावे देणार हे दावे तूर्तास तरी फोल ठरले असून करुणा शर्माच्या गाडीत बेकायदेशीर पिस्तुल आढळल्याने त्यांच्या धनंजय मुंडे व त्यांच्या कुटुंबीयांचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.  दरम्यान परळी शहरातील शेकडो महिला रस्त्यावर उतरल्या असून शहर पोलीस ठाण्यासमोर दाखल झाल्या आहेत. या महिलांनी करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांची बदनामी तर केलीच पण आज थेट धनंजय मुंडे यांना संपवण्यासाठी डाव आखला असल्याचा आरोप करत करुणा शर्मा यांना अटक करण्याची जोरदार मागणी केली आहे. यावर आता परळी पोलीस काय भूमिका घेतात ...

MB NEWS- *स्व.पंडीत अण्णा मुंडे यांच्या स्मरणार्थ किर्तन महोत्सवाचे परळीत गटनेते अजय मुंडेंच्या हस्ते उद्घाटन !*

इमेज
 *स्व.पंडीत अण्णा मुंडे यांच्या स्मरणार्थ किर्तन महोत्सवाचे परळीत गटनेते अजय मुंडेंच्या हस्ते उद्घाटन !* अध्यात्ममाने मनशुद्धी होते,सामाजिक सलोखा जपण्यास कीर्तन व कीर्तनकार समाजासाठी मार्गदर्शक - अजय मुंडे _नामवंत किर्तनकारांची परळीत मांदियाळी_ परळी......ता. २ - शेमारो मराठी बाणा व नाथ प्रतिष्ठान परळी वैजनाथ आयोजित स्व. पंडीत अण्णा मुंडे यांच्या स्मरणार्थ परळी शहरातील लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर येथे भव्य कीर्तन महोत्सवाचे उद्घाटन बीड जिल्हा परिषदेचे गटनेते श्री. अजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते श्री. बाळासाहेब देशमुख, जेष्ठ नेते श्री. माऊली गडदे, नगरसेवक गोपाळराव आंधळे, प्रा. अतुल दुबे, संयोजक ह.भ.प. रामेश्वर महाराज कोकाटे, गोविंद महाराज मुंडे, सूर्यकांत मुंडे उपस्थित होते.अध्यात्ममाने मनशुद्धी होते व सर्व धर्म सम भाव आणि सामाजिक सलोखा जपण्यास कीर्तन व कीर्तनकार समाजासाठी मार्गदर्शकच आहेत असे यावेळी श्री. मुंडे म्हणाले.परळी व पंचक्रोशीतील भाविकांनी या कीर्तन महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले.

MB NEWS-सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा;स्थगितीची मुदत संपली

इमेज
  सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा; स्थगितीची मुदत संपली पुणे : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्य सरकारने ३१ ऑगस्टपर्यंत दिलेली स्थगितीची मुदत संपली आहे. राज्य सरकारने या निवडणुकांना पुन्हा स्थगिती देण्याबाबत अद्याप कोणताही आदेश दिला नसल्याने २५० पेक्षा जास्त सभासद असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांसह, सहकारी साखर कारखाने, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, कर्मचारी पतसंस्था अशा विविध सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार आता राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून याबाबतची प्रक्रिया सुरू के ली जाईल. राज्यातील विविध ६७ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. राज्य सरकारने यापूर्वी सहकारी संस्थांच्या निवडणुका  सहा वेळा पुढे ढकलल्या होत्या. एप्रिल महिन्यात काढलेल्या आदेशानुसार या संस्थांच्या निवडणुकांना ३१ ऑगस्टपर्यंत स्थगिती देण्यात आली होती. ही मुदत संपली आहे. राज्यात सध्या १६ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. अन्य कमी सभासद असलेल्या गृहनिर्माण संस्थांसह इतर सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्या...