पोस्ट्स

MB NEWS-*कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक जयस्तंभास उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केले अभिवादन* *कोरेगाव भीमाचा इतिहास त्यागाचा आणि पराक्रमाचा-अजितदादा पवार* *जयस्तंभ शौर्य, समता व न्यायाची प्रेरणा देत राहील; इथला सर्वंकष विकास करणार - धनंजय मुंडे*

इमेज
*कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक जयस्तंभास उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केले अभिवादन*  *कोरेगाव भीमाचा इतिहास त्यागाचा आणि पराक्रमाचा-अजितदादा पवार*  *जयस्तंभ शौर्य, समता व न्यायाची प्रेरणा देत राहील; इथला सर्वंकष विकास करणार - धनंजय मुंडे* पुणे, दि.१:  उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे व मान्यवरांनी कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक जयस्तंभास आज पहाटे अभिवादन केले. इतिहासाची पाने बघितली असता महाराष्ट्राचा आणि त्याचप्रमाणे कोरेगाव भीमा येथील इतिहास त्यागाचा, शौर्याचा आणि पराक्रमाचा असल्याचे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले.  ऐतिहासिक जयस्तंभ हा शौर्य, समता व न्यायाचे प्रतीक असून जयस्तंभ व परिसराचा सर्वंकष विकास करण्याची जबाबदारी आपल्या विभागाने घेतली असल्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे म्हणाले. यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, पर्यावरण व वातावरणीय बदल राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांसह मान्यवर उपस्थित होते.  राज्यातील सर्व जनतेला न...

MB NEWS- *भिमा कोरोगाव विजय स्तंभास परळीत मानवंदना*

इमेज
 *भिमा कोरोगाव विजय स्तंभास परळीत मानवंदना* परळी(प्रतिनिधी) - भिमा कोरोगाव (पुणे) येथील विजयी स्तंभ प्रतिमेस परळी येथील भिमनगर येथे आज दिनांक 1 जानेवारी 2022 रोजी सकाळी 9:00 वाजता सामुहिक मानवंदना देण्यात आली.    सकाळी सुरु झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन झाली.आंबेडकरी चळवळीचे प्रतीक असणार्‍या निळ्या झेंड्याचे ध्वजारोहन डाॅ सिध्दार्थ जगतकर यांच्या हस्ते करण्यात आले,त्यानंतर सर्वांनी भिमा कोरैगाव विजय स्तंभास सॅल्युट करुन मानवंदना देण्यात आली.    यावेळी प्रा विलास रोडे यांनी उपस्थितांना भिमा कोरेगाव येथील घडलेला इतिहास कथन करतांना सांगितले की,कोरेगाव येथील युध्द म्हणजे जातीयवादी मानसिकतेच्या पेशव्यावर केलेला शुर,लढावू महार सैन्यांचा विजय होता तसेच आत्मसन्मानाच्या लढाईची सुरुवात होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भालचंद्र ताटे यांनी केले तर आभार मुंकुद ताटे यांनी केले.या कार्यक्रमास बहुसंख्य नागरीकांची उपस्थीती होती

MB NEWS- *मोहा येथे एसएफआयचा वर्धापन दिन सोहळा*

इमेज
 *मोहा येथे एसएफआयचा वर्धापन दिन सोहळा* परळी वै:दि 31 प्रतिनिधी महाराष्ट्र विद्यालय मोहा येथील मा. खासदार कॉ.गंगाधर आप्पा बुरांडे सांस्कृतिक सभागृह येथे स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) ५२ वा वर्धापन दिन बीड जिल्हा कमिटीच्या वतीने साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते संघटनेच्या झेंड्याचे ध्वजारोहण करून शहीद भगतसिंग व माजी खासदार कॉम्रेड गंगाधर आप्पा बुरांडे यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून क्रांतिकारीअभिवादन करण्यात आले. सोहळ्यास उद्घाटक म्हणून स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे मा. राज्याध्यक्ष तथा डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया या युवक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तथा किसान सभेचे नेते एड.अजय बुरांडे हे होते.  आपल्या उदघाटनपर भाषणात एड.अजय बुरांडे यांनी विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन करत सद्या परिस्थितला धरून विद्यार्थी चळवळीचे महत्व पटवून दिले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे (एसएफआय) राज्यध्यक्ष बालाजी कलेटवाड,  राज्यसचिव रोहिदास जाधव यांनी मौल्यवान असे मार्गदर्शन करत विद्यार्थी संघटनेचा दैदिप्यमान इतिहास संघटनेचे ...

MB NEWS-कोर्टातील तडजोडपत्र व कोर्ट डिक्रीसाठी मुद्रांक शुल्क आवश्यकता नाही... जिल्हाधिकारी यांचे आदेश..

इमेज
  कोर्टातील तडजोडपत्र व कोर्ट डिक्रीसाठी मुद्रांक शुल्क आवश्यकता नाही- जिल्हाधिकारी यांचे आदेश परळी वैजनाथ :- न्यायालयामध्ये कुटुंबातील सदस्यांमध्ये होणाऱ्या तडजोड पत्रावर व  वाटणी पत्रावर व मालकी घोषणेच्या न्यायालयीन डिक्रीवर यापुढे कोणतेही मुद्रांक शुल्क आकारू नये व तात्काळ फेरफार घेण्यात यावे असे आदेश जिल्हाधिकारी बीड यांनी जिल्ह्यातील महसूल प्रशासनला दिले आहेत. थोडक्यात वृत्त असे की न्यायालयामध्ये कुटुंबातील सदस्यामध्ये होणाऱ्या वाटणी पत्राचे न्यायालयीन तडजोड नामे व मालकी घोषणेचे दावे हे न्यायालयाचा निकाल दिल्यानंतरही महसूल प्रशासन फेरफार घेण्यास टाळाटाळ करीत होते. त्यामुळे परळी तालुक्यात व जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची कुचंबना होत होती व आर्थिक भुर्दंड बसत होता. न्यायालयांमध्ये झालेली कोर्ट डिग्री ही नोंदणीकृत करून आणावी असे तोंडी सांगितले जात होते. त्यामुळे शेतकऱ्यांना हजारो रुपये मुद्रांक शुल्काचा भुर्दंड भरावा लागत होता. याबाबत परळी वकील संघाने आवाज उठवून उपविभागीय अधिकारी परळी व जिल्हाधिकारी बीड यांना कुटूंबातील सदस्यांमध्ये होणाऱ्या तडजोड पत्रासाठी मुद्रांक शुल्क आवश्यक ...

MB NEWS-गौरव आणि अभिमान:परळीच्या भूमीकन्येला मानाचा साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार प्रदान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी केलं सर्व विजेत्यांचे अभिनंदन

इमेज
गौरव आणि अभिमान: परळीच्या भूमीकन्येला मानाचा साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार प्रदान     मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी केलं सर्व विजेत्यांचे अभिनंदन परळी वैजनाथ, प्रतिनिधी......    मुळ परळीच्या असलेल्या  ख्यातनाम लेखिका डॉ. मंजुषा कुलकर्णी यांना संस्कृत भाषेकरिता आज साहित्य अकादमीचा मानाचा अनुवाद पुरस्कार  प्रदान करण्यात आला.महाराष्ट्रातील निवडक साहित्यिकांना हा पुरस्कार मिळाला आहे यामध्ये परळीच्या भुमिकन्येला मानाचा साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार प्रदान झाला. परळीकरांसाठी ही गौरवाची व अभिमानाची बाब आहे.              नवी दिल्ली येथील कोपर्निकस मार्ग स्थित साहित्य अकादमीच्या रविंद्र सभागृहात वर्ष 2020च्या अनुवाद पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले. अकादमीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कंबार यांच्या हस्ते देशातील 24 प्रादेशिक भाषांतील अनुवादकांना यावेळी सन्मानित करण्यात आले.  50 हजार रुपये आणि ताम्रपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.अकादमीचे  उपाध्यक्ष माधव कौशिक यांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले. ...

MB NEWS-एक साकार स्वप्न धावणार बीडमध्ये ; लढणाऱ्या प्रत्येक घटकांचे अभिनंदन* - *पंकजाताई मुंडे यांचं ट्विट* *बीड रेल्वेच्या स्वप्नपूर्तीबद्दल मानले पंतप्रधान मोदी, देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार यांचे आभार !*

इमेज
 * एक साकार स्वप्न धावणार बीडमध्ये ; लढणाऱ्या प्रत्येक घटकांचे अभिनंदन*  - *पंकजाताई मुंडे यांचं ट्विट*  *बीड रेल्वेच्या स्वप्नपूर्तीबद्दल मानले पंतप्रधान मोदी, देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार यांचे आभार !* बीड  ।दिनांक २९। एक साकार स्वप्न धावणार बीडमध्ये.. माझ्या जिल्ह्यातील प्रत्येक घटकांचे अभिनंदन.. ज्यांनी अनेक दशके लढाई दिली असं ट्विट  भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केलं आहे. बीड रेल्वेमार्गाच्या स्वप्नपूर्तीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांचे आभारही त्यांनी मानले आहेत.   बीडच्या जनतेचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाची आष्टीपर्यंतची हायस्पीड चाचणी आज सायंकाळी होत असून हा मार्ग आता पुर्णत्वाकडे चालला असून लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर पंकजाताई मुंडे यांनी हे ट्विट केलं आहे.    पंकजाताई यांनी म्हटलं आहे की, एक साकार स्वप्न धावणार बीडमध्ये.. माझ्या जिल्ह्यातील प्रत्येक घटकांचे अभिनंदन ज्यां...

MB NEWS- *आझाद मैदानावरओबीसीच्या विविध मागण्यांसाठी ओबीसी जन मोर्चाच्या वतीने लाक्षणिक उपोषण!* *ओबीसीच्या मागण्यांचा सरकारने त्वरित विचार करावा— प्रा. टी. पी. मुंडे*

इमेज
 *आझाद मैदानावर ओबीसीच्या विविध मागण्यांसाठी ओबीसी जन मोर्चाच्या वतीने लाक्षणिक उपोषण!* *ओबीसीच्या मागण्यांचा सरकारने त्वरित विचार करावा— प्रा. टी. पी. मुंडे* परळी वैजनाथ /प्रतिनिधी  राज्य सरकारची याचिका सुप्रीम कोर्टाकडून फेटाळल्यानंतर ओबीसी जन मोर्चाच्या वतीने राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आझाद मैदान मुंबई येथे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. ओबीसीच्या न्यायिक मागण्यांचा राज्य सरकारने गंभीरपूर्वक विचार करण्याची गरज आहे असे प्रतिपादन ओबीसी जन मोर्चाचे उपाध्यक्ष प्रा.टी.पी. मुंडे सर यांनी केले.  ओबीसी जन मोर्चाच्या वतीने ओबीसींच्या विविध मागण्यांसंदर्भात राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आझाद मैदान मुंबई येथे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. ओबीसी जनमोर्चा चे अध्यक्ष माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडगे, कार्याध्यक्ष अँड. चंद्रकांत बावकर ,जे. डी.तांडेल, लक्ष्मण गायकवाड, दशरथ पाटील, गजानन सुवरे आदीसह ओबीसी च्या विविध संघटना त्यांचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.       स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसीचे राजकीय आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थ...