पोस्ट्स

MB NEWS:दानशूर दात्यांना नम्र आवाहन!

इमेज
  भगवान श्री शनैश्वर मंदिर जीर्णोध्दारासाठी  दानशूर दात्यांना नम्र आवाहन! परळी वैद्यनाथ प्रभू वैद्यनाथ मंदिर पायथ्याशी असलेल्या भगवान श्री शनैश्वर  मंदिराच्या  जीर्णोध्दाराचे काम सर्व दानशूर भाविकांच्या मदतीने  अंतीम टप्यात आले आहे. परंतु शेवटी प्लास्टर, पीओपी ,आणि फरशी चे काम शिल्लक राहिले आहे. तरी दानशूर शनि भक्तांना नम्र विनंती आहे की, या कामासाठी आपण रोख किंवा जमेल त्या साहित्य देऊन आपण मदत करू शकता.  त्यासाठी आपण  चंद्रकांत शंकरअप्पा उदगीरकर  मोबाईल नंबर:-9850730084  संगमेश्वर नागनाथअप्पा फुटके  मोबाईल नंबर:-8208765200 यांच्यासी संपर्क साधावा किंवा  ऑनलाईन देणगी साठी बॅंक खात्याचा तपशील खालील प्रमाणे  श्री शनी मंदिर देवस्थान ट्रस्ट कमेटी  स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा परळी वैद्यनाथ  खाते नं.:-62115610063  IFSC Code :-SBIN0020030   भगवान शनैश्वर आपल्या सर्व मनोकामना पुर्ण करो हीच प्रार्थना.  धन्यवाद!

MB NEWS:मालेवाडी येथील गुट्टे व बदने कुटुंबियांचे खा.डॉ.प्रितमताई मुंडेंनी केले सांत्वन

इमेज
  मालेवाडी येथील गुट्टे व बदने कुटुंबियांचे खा.डॉ.प्रितमताई मुंडेंनी केले सांत्वन परळी वैजनाथ (प्रतिनिधी)  :-  परळी तालुक्यातील मालेवाडी येथे गुट्टे व बदने कुटुंबियांची खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी भेट घेऊन दोनही कुटुंबियांचे सांत्वन केले.         मालेवाडी येथे भास्कर राम गुट्टे  व कै. रुक्मिणी बाळासाहेब बदने यांचे दुःखद निधन झाले होते. गुट्टे व बदने दोन्ही कुटुंबियांची खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे भेट घेऊन त्यांनी सांत्वन केले. यावेळी माजी सरपंच भुराज बदने व इतर उपस्थित होते.

MB NEWS:दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल व गटशिक्षणाधिकारी कार्यालय पं.समिती यांच्या संयुक्त विद्यमाने

इमेज
  दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल व गटशिक्षणाधिकारी कार्यालय पं.समिती  यांच्या संयुक्त  विद्यमाने 12 ते14 जानेवारी 50 वे तालुकास्तरीय विज्ञान व गणित 2022-23 प्रदर्शनाचे आयोजन तालुक्यातील सर्व शाळांनी सहभागी होण्याचे  आवाहन  परळी प्रतिनिधी ;  शहरातील दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल येथे पन्नास वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन होणार असून याबाबत गटशिक्षणाधिकारी कार्यालयातुन तालुक्यातील सर्व शाळांना विज्ञान प्रदर्शनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले असून दिनांक 12 जानेवारी रोजी सकाळी ८ :३०ते ११ दरम्यान या प्रदर्शन ची नोंदणी व मान्य होणार असून दुपारी १२:३० वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे तसेच एक ते पाच दरम्यान प्रदर्शनी वस्तू व उपक्रम पाहण्यासाठी खुले होणार आहेत. सविस्तर माहिती अशी की शहरातील बीड रोड येथील दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल येथे 12 ते 14 जानेवारी दरम्यान ५०  व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन होणार असून या विज्ञान गणित प्रदर्शनाचे उद्घाटन दिनांक 12 जानेवारी रोजी दुपारी ठीक 12:30 होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायट...

MB NEWS-परळी तालुक्यातील परचुंडीचा सर्वेश बनला इंडियन एअर फोर्स मध्ये फ्लाईंग ऑफिसर

इमेज
  परळी तालुक्यातील परचुंडीचा सर्वेश बनला इंडियन एअर फोर्स मध्ये फ्लाईंग ऑफिसर परळी वैजनाथ, प्रतिनिधी...      तालुक्यातील परचुंडी येथील मूळ रहिवासी असलेला सर्वेश नावंदे हा इंडियन एअर फोर्स मध्ये फ्लाईंग ऑफिसर म्हणून रुजू झाला आहे.          चि. सर्वेश  सुभाष नावंदे  मुळगाव परचुंडी ता परळी हा  हैदराबाद येथील ट्रेनिंग संपवून इंडियन एअर फोर्स मध्ये फ्लाईंग ऑफिसर म्हणजे पायलट म्हणून 2 जानेवारी २०२३ रोजी रुजू झाला आहे . त्याच्या या यशाबद्दल त्याचे अभिनंदन केले जात आहे. अल्पपरिचय..... ●सर्वेश सुभाष नावंदे  स्टॅंडर्ड फर्स्ट टू ट्वेलव्ह व्हीं पी एम एस स्कूल, पुणेमॉडन कॉलेज गणेश खिंड येथे बीएससी मॅथ्स डिग्री घेतली. ते करत असतानाच त्याने पहिल्याच वर्षी एनसीसी हेडकॉटर, बालभारती समोर एस बी रोड, येथे एनसीसीसाठी ऍडमिशन घेतले. बीएससी मॅथ्सच्या सेकंड इयरला असताना त्याची आर डी सी ( रिपब्लिक डे कॅम्प ) साठी महाराष्ट्राच्या टीममध्ये बेस्ट कॅडेट एअर विंग म्हणून निवड झाली. त्यानंतर औरंगाबाद येथे तीन महिन्याचा प्री आर डी सी कॅम्प केला व दिल्लीमध्...

MB NEWS:सनराईज इंग्लिश स्कुलचे वार्षिक स्नेहसंमेलन थाटात

इमेज
  विद्यार्थ्यांच्या गुणगौरव व कौशल्याला वाव देण्याचे कार्य स्नेहसंमेलनातून:अभिनेत्री कोमल सोमारे सनराईज इंग्लिश स्कुलचे वार्षिक स्नेहसंमेलन थाटात   (परळी प्रतिनिधी):- येथील परिवर्तन युवा मंच संचलित सनराईज इंग्लिश स्कुलचे वार्षिक स्नेहसंमेलन थाटात संपन्न झाले.  या कार्यक्रमाचे उद्घाटन कलर्स मराठी फेम, सुप्रसिद्ध सिने-नाटय अभिनेत्री कोमल सोमारे यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी अध्यक्षस्थानी  उपशिक्षणाधिकारी (प्राथ) हिरालालजी कराड, तर प्रमुख अतिथी म्हणून आयआयबी लातूरचे संचालक चिराग सेनमा,सभापती बालाजी(पिंटू)मुंडे, माजी प्राचार्य जी. एस. सोंदळे,शिक्षण विस्तार अधिकारी( पं. स.)हिना उमर  अन्सारी , ,माउली मुंडे,(पं स.सदस्य )प्रसिद्ध सिने-नाटय अभिनेता दिग्दर्शक डॉ. सिद्धार्थ तायडे,रामकिशन मुंडे,प्रा. वैभव स्वामी, ज्युनिअर चार्ली  यांचेसह सनराईजचे संचालक गोविंदराव मुंडे, उपाध्यक्ष हरिश्चंद्र चाटे,सचिव सौ. प्रियतमा मुंडे, प्राचार्य ए. एस. रॉय फुलचंद मुंडे , उद्धव कराड, आदींची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून  कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. ...

MB NEWS:आडस परिसरातील शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी आडसकरांची तहसील दरबारी पायी दिंडी

इमेज
  विमा कंपनी आणि सरकार विरोधी घोषणा देत शेतकऱ्यांची पायी दिंडी आडस परिसरातील शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी आडसकरांची तहसील दरबारी पायी दिंडी केज :- केज तालुक्यातील आडस आणि परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा आणि अतिवृष्टीचे अनुदानाच्या मागणुलीसाठी शेकऱ्यांनीथील सामाजिक कार्यकर्ते शिवरुद्र आकुसकर यांच्या नेतृत्वाखाली आडस ते केज अशी पायी दिंडी काढून तहसीलदारांना मागण्यांच्या निवेदनाचे गाठोडे सुपूर्त केले. या बाबतची माहिती अशी की, आडस ता केज येथील शेतकऱ्यांनी बुधवारी दि. ११ सकाळी ८:०० वा. शेतकऱ्यांच्या पीक विमा अनुदानाचे वैयक्तिक तक्रार अर्जाचे गाठोडे डोक्यावर घेऊन बंडी आणि अर्धी चड्डी अशा अर्ध नग्न पेहरावात सामाजिक कार्यकर्ते शिवरुद्र आकुस्कर यांच्या नेतृत्वाखाली आडस येथील श्री. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून कळंबआंबा, चंदन सावरगाव, कुंबेफळ, ढाकेफळ मार्गे तहसील कार्यालय, केज असे २५ कि.मी. पायी जाऊन तहसील प्रशासनाला तक्रारी अर्ज दाखल करण्यात आले. तहसीलदार दुलाजी मेंडके यांनी त्यांचे निवेदन स्विकारले. यावेळी रमेशराव आडसकर, भाई मोहन गुंड, शिवसेनचे रत्नाकर शिंदे, प्रा हनुमंत स...

MB NEWS:शेतकरी अगोदरच अडचणीत ; मग त्यांचा विमा थांबवता कशाला ?

इमेज
  शेतकरी अगोदरच अडचणीत ; मग त्यांचा विमा थांबवता कशाला ? तातडीने विमा अदा करण्याची पंकजाताई मुंडे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी बीड  ।दिनांक ११। अतिवृष्टीमुळे जिल्हयातील शेतकरी अगोदरच अडचणीत असताना त्यात पुन्हा विमा मिळण्यासाठी त्यांना कंपन्यांकडून आडकाठी आणली जात आहे. शेतकरी अडचणीत असताना त्यांचा विमा थांबविण्याचे कारण काय? असा सवाल भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालून शेतकऱ्यांना विम्याची रक्कम तातडीने द्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.      पंकजाताई मुंडे यांनी यासंदर्भात एक ट्विट करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे याकडे लक्ष वेधले आहे. "बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पीक विम्याची रक्कम विमा कंपनीने थकवण्याचे कारण काय ? नियमाने ऑनलाईन पीक विमा भरून देखील अतिवृष्टीच्या अडचणींचा सामना करत असताना शेतकऱ्यांचा विमा थांबवणे शंभर टक्के अयोग्य आहे.विमा कंपनीला मा. मुख्यमंत्री साहेबांनी तात्काळ आदेश देऊन शेतकऱ्यांची विम्याची रक्कम त्वरित अदा करण्यास सांगावे." असं पंकजाताई मुंडे यांनी म्हटलं आहे. ••••