MB NEWS:बारावीत मुलीच हुशार !
.jpeg)
बारावीत मुलीच हुशार ! बीड- बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यावर्षी देखील मुलींनी बाजी मारली आहे. राज्याचा निकाल 91 टक्के लागला आहे, सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा आहे तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा लागला आहे. शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, यंदाचा राज्याचा एकूण निकाल 91.25 टक्के इतका लागला आहे. बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र बोर्डाच्या mahahsscboard.in fchal maharesult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. यंदा राज्याचा निकाल 91.25 टक्के लागला असून 12 लाखांहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल 96.01 तर सर्वात कमी निकाल मुंबई 88. 13 टक्के लागला आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत निकालाची टक्केवारी 2.97 टक्क्यांनी घसरली. गेल्यावर्षी 94.22 टक्के निकाल लागला होता.14 लाख 16 हजार 371 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी 12 लाख 92 हजार 468 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्याच्या निकालाची टक्केवारी 91.25 एवढी आहे. कोकण विभाग अ...