वाचा : ✍️ चंद्रशेखर फुटके यांचा विशेष ब्लॉग >>>>●जनता द्यायची मनातून सन्मान: असे होते आदर्श नेतृत्व कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे

जनता द्यायची मनातून सन्मान: असे होते आदर्श नेतृत्व कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे ए स टी महामंडळाच्या बसच्या सीटवर 'आमदार/ खासदार यांच्यासाठी राखीव' असे लिहिलेले वाचल्यानंतर तुम्हाला हसू येते ना? तुम्ही असा विचार करता की हे लोक कधी एसटीने प्रवास करणार? पण आपल्याच बीड जिल्ह्याचे माजी खासदार कॉम्रेड गंगाधर आप्पा बुरांडे हे नेहमी एसटीने प्रवास करायचे... सर्वसामान्य माणसासाठी लढा देणारे अप्पा सर्वसामान्यांसोबत राहायचे... त्यांच्या समस्या आप्पांना न सांगताच समजायच्या.... शिक्षणा वाचून तरणोपाय उपाय नाही हे अप्पांनी ओळखले होते म्हणूनच मोह्यासारख्या ग्रामीण भागातून त्यांनी शिक्षणाची दारे सर्वसामान्यांना खुली करून दिली... .. भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या चळवळीत आप्पांनी निजामाविरुद्ध संघर्ष केला, मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या लढ्यात आप्पांची भूमिका प्रमुख होती... रझाकराच्या काळात आप्पांच्या मागोवा पोलिसांनी केला, सर्वसामान्य जनतेने आप्पांना अटक होऊ दिली नाही... हे आपलं नेतृत्व आहे हे जनतेने मान्य केलेले होते म्हणूनच आप्पांना जनतेतून संरक्षण मिळत होते... सध्याच्या काळात बऱ्याचदा जनतेवर न...