वाचन प्रेरणा दिन, मराठी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन

मराठी वाङ्मयमंडळ भाषा समृद्ध करते- प्रो.डॉ.एम. बी. धोंडगे सिरसाळा,प्रतिनिधी... राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर व श्री पंडित गुरु पार्डीकर महाविद्यालय सिरसाळा सामंजस्य करारांतर्गत दिनांक 16 ऑक्टोबर 2023 रोजी संपन्न झालेल्या वाचन प्रेरणा दिन, मराठी वाङ्मय मंडळाच्या उद्घाटन व ग्रंथ प्रकाशन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रो.मुंजा धोंडगे हे होते. कार्यक्रमाध्यक्ष म्हणून राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे होते. याप्रसंगी बोलताना प्रोफेसर मुंजा धोंडगे यांनी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला प्रत्येक विद्यार्थ्यांनी वाचन प्रेरणा दिनापासून मराठी साहित्यातील विविध ग्रंथांचे वाचन केले पाहिजे कारण एक पुस्तक हे शंभर मित्राप्रमाणे असते. मराठी साहित्य मंडळाच्या माध्यमातून मराठी भाषा समृद्ध होण्यास मदत होते. असे मत व्यक्त केले. लातूर येथे राजश्री शाहू महाविद्यालयात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करून झाली. या ग्रंथ प्रदर्शनाचे व वाङ्मय यउद...