पोस्ट्स

देवाच्या नाही तर शेतक-याच्या नावाचा एकमेव कीर्तन महोत्सव

इमेज
  देवाच्या नाही तर शेतक-याच्या नावाचा एकमेव कीर्तन महोत्सव परळी / प्रतिनिधी  देवाच्या नावाने चालणारे अनेक कीर्तन महोत्सव पाहिले, परंतु शेतक-यांच्या नावाने सुरू असलेला हा एकमेव कीर्तन महोत्सव आहे, असा सूर शेतकरी कीर्तन महोत्सवात आलेल्या सर्व वक्त्यांच्या बोलण्यातून व्यक्त झाला. ख-या अर्थाने सामाजिक परिवर्तनाची ही सुरूवात म्हणता येईल,  असे मतही अनेक वक्त्यांनी व्यक्त केले. शेतकरी केंद्र स्थानी ठेऊन 21 गावातील लोकांच्या सहकार्यातून सुरू केलेल्या कीर्तन महोत्सवाचा दुसरा दवस विविध उपक्रमाने संपन्न झाला. सकाळी प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डाॅ. हमीद दाभोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबिर संपन्न झाले. या शिबिरात बीड जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांची टीमही सहभागी झाली होती.  ●●●●●●●●●●●●● *सुविधा वाढल्या,समाधान हरवले - डाॅ. हमीद दाभोळकर* जग वेगाने बदलत आहे. विज्ञानाच्या प्रगतीने अनेक सुविधा वाढल्या आहेत. सुविधा वाढल्या असल्या तरी माणूस समाधानी झाला नाही उलट तो अधिक तणावात गेला आहे. विशेषतः 15 ते 35 वयोगटातील तरुणांचे मानसिक स्वास्थ्य मोठ्या प्रमाणात बिडताना दिसत आहे. त्यातून ...

यश इंटरनॅशनलचे विद्यार्थी आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकतील- उद्योजक सुरेश फड

इमेज
  ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षण देणे हेच आपले ध्येय-प्रदिप खाडे   यश इंटरनॅशनलचे विद्यार्थी आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकतील- उद्योजक सुरेश फड   विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच व्यायामाकडे लक्ष द्यावे- सपोनि खोडेवाड विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने रसिक झाले मंत्रमुग्ध यश इंटरनॅशनल सीबीएसई स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-   दिंद्रुड सारख्या ग्रामीण भागात आम्ही शेतकरी, कष्टकरी आणि ऊसतोड कामगार कुटुंबातील विद्यार्थ्यांचे शिक्षण डोळ्यासमोर ठेवुन शाळा सुरु केली.आज आमच्या कै.रामभाऊ आण्णा खाडे संस्थेच्या अनेक शाळा,कॉलेजमधून शिक्षण घेत विद्यार्थी उच्च पातळीवर पोंहचत आहेत यामुळे ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षण देण्याचे आमचे स्वप्न पुर्ण झाले असुन भविष्यात आणखी सुविधा उपलब्ध करु असे प्रतिपादन कै.रामभाऊ आण्णा खाडे संस्थेचे अध्यक्ष प्रदिप खाडे यांनी केले. स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात शालेय विद्यार्थी कलावंतांनी सादर केलेल्या कलाविष्काराने उपस्थित हजारो रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले होते.    कै.रामभाऊ आण्णा खाडे संस्थेच्या संगम फाटा द...

भव्य कमानी, आकर्षक कटआउट्सने परळी शहर सजले

इमेज
  लाडक्या लेकिचे उद्या परळी विधानसभा मतदार संघात आगमन ! पंकजा मुंडे यांच्या स्वागताची जय्यत तयारी ढोल - ताशांच्या  गजरात जेसिबीतुन होणार फुलांची उधळण*  *गोपीनाथ गडावर होणार नतमस्तक तर कौठळी तांडा येथील होळी कार्यक्रमात होणार सहभागी *परळी नगरी स्वागतासाठी सजली, भव्य कमानी, आकर्षक कटआऊटसने वेधले लक्ष*  मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे - भाजपा - शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेस - रिपाई - मित्र पक्षांचे आवाहन परळी वैजनाथ           भाजपा व मित्रपक्षाच्या बीड लोकसभेच्या उमेदवार, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उद्या दिनांक 24 मार्च रोजी प्रथमच परळी विधानसभा मतदारसंघांमध्ये आगमन होणार आहे. लाडक्या लेकीच्या स्वागतासाठी विधानसभा मतदारसंघ सज्ज झाला असून त्यांचे ठिकठिकाणी जोरदार स्वागताची तयारी  करण्यात आली आहे. पंकजाताई मुंडे या प्रथम लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या समाधीस्थळी नतमस्तक होणार आहेत. कौठळी तांडा येथील होळी महोत्सवात सहभाग घेतल्यानंतर त्यांचे थाटात परळी शहरात आगमन होणार आहे. ढोल ता...

पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी एकमुखी पाठिंब्याचा दिला शब्द ; सावरगावला झाली पेढेतुला

इमेज
  लेकीला मिळाले जिल्हयातील श्रध्देय गडांचे आशीर्वाद ! श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड, भगवान भक्तीगड, नारायणगडावर पंकजाताई मुंडे नतमस्तक पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी एकमुखी पाठिंब्याचा दिला शब्द ; सावरगावला झाली पेढेतुला बीड । दिनांक २३। बीड लोकसभेच्या उमेदवार तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी काल व आज जिल्हयातील श्रध्देय गडांच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतले. जिल्हयातील जनतेच्या ऋणात नेहमी असावे, त्यांचेवरील प्रेम कधीही कमी होऊ नये अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. गड परिसरातील ग्रामस्थांनी देखील त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याचा शब्द यावेळी दिला.    लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजाताई मुंडे शुक्रवारी बीडमध्ये आल्या. धामणगांव इथं जल्लोषात स्वागत झाल्यानंतर काल रात्री त्यांनी श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड, सावरगाव घाट येथील भगवान भक्तीगडावर जाऊन श्रध्देय वामनभाऊ, राष्ट्रसंत भगवान बाबा, कुसळंब येथील खंडेश्वर यांचे आशीर्वाद घेतले. आज सकाळी धाकटी पंढरी म्हणून ओळख असलेल्या श्रीक्षेत्र नारायणगडावर जावून त्यांनी संत नगद नारायण महाराजांचे आशीर्वाद घेतले. दोन्ही गडाव...

आजचं स्वागत, विजयाची नांदी

इमेज
  लेकीसाठी जिल्हयाच्या एकीची वज्रमूठ !  बीडच्या वेशीवर पंकजाताई मुंडेंचं 'न भूतो न भविष्यती' स्वागत मी मतांचं नाही विकासाचं राजकारण करते ; जिल्हयाच्या विकासाचं बीजारोपण करण्यासाठी साथ द्या - पंकजाताई मुंडे यांची जनतेला साद आष्टी ।दिनांक २२।  राजकारण करत असताना मी कधी कुणाविषयी अभद्र बोलले नाही की कधी जातीभेद केला नाही. मायनस असणाऱ्या गावांनाही करोडो रूपयांचा निधी दिला. मी मतांचं नाही तर विकासाचं राजकारण करण्यासाठी राजकारणात आहे, जिल्हयाच्या विकासाचं बीजारोपण करण्यासाठी मला आपल्या आशीर्वादाची गरज आहे, त्यासाठी मला साथ द्या अशा शब्दांत भाजपच्या लोकसभेच्या उमेदवार तथा राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी जनतेला साद घातली.    नगरहून प्रस्थान केल्यानंतर बीडच्या वेशीवर धामणगांव इथं पंकजाताई मुंडे यांचं दुपारी थाटात आगमन झालं. लोकसभेची उमेदवारी मिळाल्याबद्दल कार्यकर्त्यांनी मोठया जल्लोषात, मिरवणूक काढून फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि जेसीबीतून पुष्पवृष्टी करत त्यांचं जोरदार स्वागत केले. खासदार डाॅ.प्रितमताई मुंडे हया देखील त्यांच्यासमवेत होत्या. सत्कारानंतर  जनतेशी स...

श्रीक्षेत्र मोहटादेवीच्या चरणी नतमस्तक

इमेज
अलोट गर्दी: पंकजा मुंडेंची पाथर्डीत ओपन जीपमधून मिरवणूक ; फटाक्यांची आतिषबाजी, जेसीबीतून फुलांची उधळण श्रीक्षेत्र मोहटादेवीच्या चरणी नतमस्तक तुमच्या जीवावर मैदानात उतरलेयं; आशीर्वाद अन् साथ द्या पाथर्डी ।दिनांक २२। बीड लोकसभेची उमेदवारी मिळाल्याबद्दल मावशीच्या भूमीत म्हणजे पाथर्डी शहरात आज भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांचं अभूतपूर्व असं स्वागत झालं. फटाक्यांची आतिषबाजी, जेसीबीतून फुलांची उधळण करत अलोट गर्दीच्या साक्षीनं कार्यकर्त्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. पाच वर्ष संघर्ष केला, आता तुमच्या जीवावर मैदानात उतरले आहे, आशीर्वादाची शिदोरी माझ्या झोळीत टाका असं आवाहन त्यांनी याप्रसंगी बोलतांना केलं.    पंकजाताई मुंडे काल नगर येथे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निवासस्थानी मुक्कामास होत्या. खासदार सुजय विखे, आमदार मोनिका राजळे यांनी त्यांचं स्वागत केलं. सकाळी नगरहून पाथर्डीकडे रवाना होताना  रस्त्यात मेहकरी फाटा, करंजी, देवराई, तिसगाव येथे कार्यकर्त्यांनी त्यांचं मोठं स्वागत केल्यानंतर पाथर्डीत त्यांचं आगमन झालं. इथं त्यांच्या स्वागताला अलोट जनसागर लोटला ह...

नगरकडे जाताना स्वागतासाठी कार्यकर्ते रस्त्या रस्त्यावर ; जेसीबीने फुलांची उधळण

इमेज
  मिशन लोकसभा - बीड दौऱ्याआधी पंकजाताई मुंडे यांचं पुण्यात जंगी स्वागत पुण्याचे उमेदवार मुरलीधर मोहोळांना दिल्या शुभेच्छा ; ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद पुणे ।दिनांक २१। भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांचं आज पुण्यात पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत झालं. पुण्याचे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना शुभेच्छा देण्यासाठी त्या आल्या होत्या. या दौऱ्यात त्यांनी पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी देखील संवाद साधला.  दरम्यान पुण्याहून नगरकडे मार्गस्थ होताना रस्त्यात ठिक ठिकाणी त्यांचं फटाक्यांच्या आतिषबाजीत जोरदार स्वागत झालं.    बीडची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजाताई मुंडे उद्या नगरमार्गे बीडच्या हद्दीत येत आहेत. धामणगांव आष्टी येथे त्यांच्या मोठया स्वागताची तयारी सुरू आहे. बीडला येण्यापूर्वी त्या आज दुपारी पुण्यात आल्या. आमदार माधुरीताई मिसाळ यांनी त्यांचं निवासास्थानी स्वागत केलं. नंतर  लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयास त्यांनी भेट दिली. इथं त्यांचं जोरदार स्वागत झालं. मोहोळ यांना औ...