
जलयुक्त शिवार घोटाळा; २४ जणांवर गुन्हा दाखल सात वर्षांपूर्वी झाला होता १८ लाख २७ हजार ८०० रुपयांचा अपहार परळी : सात वर्षांपूर्वी परळीतालुक्यातील गावामध्ये जलयुक्त शिवार अंतर्गत करण्यात आलेल्या कामात १८ लाख २७ हजार ८०२ रुपयांचा अपहार केल्याच्या आरोपावरून २४ जणांविरुद्ध परळी शहर पोलिस ठाण्यात २ डिसेंबर २०२४ रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत २०१५ ते २०१७ दरम्यानच्या काळात झालेल्या कामांमध्ये भ्रष्टाचार करण्यात आल्याच्या तक्रारी झाल्या होत्या. या प्रकरणाची वेळोवेळी चौकशी झाली व दोषी अधिकारी, कर्मचारी तसेच गुत्तेदारांकडून रक्कमही वसूल करण्यात आली होती. तसेच गुन्हेही दाखल करण्यात आले होते. त्यामधील राहिलेल्या लोकांविरोधात सुनावणीच्या वेळेस लोकआयुक्तांकडे गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार २ डिसेंबर रोजी परळी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. २४ जणांनी जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत कंपार्टमेंट बंडिंग, माती नाला बांध, सिमेंट नाला बांधच्या शासकीय कंत्राटाच्या कामामध्ये बनावट व खोटे दस्तऐवज यांचा वापर करून ती खरी आहेत असे भा...