प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

श्री दत्तात्रय भगवान भव्य प्राणप्रतिष्ठा व दत्तयाग महोत्सवास सुरुवात ; विविध धार्मिक कार्यक्रम

 सर्वांना सामावून घेणारी भारतीय संस्कृती वैभवशाली - महंत राधाताई महाराज सानप

श्री दत्तात्रय भगवान भव्य प्राणप्रतिष्ठा व दत्तयाग महोत्सवास सुरुवात ; विविध धार्मिक कार्यक्रम 


परळी वैजनाथ (प्रतिनिधी):

       भारतीय संस्कृती ही जगात सर्वश्रेष्ठ आहे. त्याच प्रमाणे सनातन हिंदू धर्म हा देखील सर्वांना सामावून घेत विश्वबंधुत्वाची साक्ष देणारा व साद घालणारा आहे. आपण या हिंदुस्थानच्या पवित्र भूमीत जन्म घेतला हे आपले भाग्य असून आपल्या थोर संस्कृतीची जपवणूक करणे हे आपल्या सर्वांचे आद्य कर्तव्य आहे, असे प्रतिपादन महंत राधाताई महाराज यांनी तालुक्यातील गोपाळपुरा, सारडगाव येथे सुरू असलेल्या श्री दत्तात्रय भगवान (त्रिमूर्ती) भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा व चार दिवसीय कीर्तन महोत्सवाच्या दुसऱ्या पुष्पात बोलताना केले.

      आपल्या मातीला महान अशी संत परंपरा लाभलेली आहे. संतांच्या चरणाची धूळ ही जगण्याचे कृतार्थ करणारी आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढत नामसंकीर्तनाला महत्व दिले पाहिजे. ईश्वराचे नामसंकीर्तन जो करेल, त्याच्या जीवनात कायम सात्विकता राहील. शिवाय त्याला काहीही कमी पडणार नाही. त्यामुळे ज्येष्ठांनी आपल्या घरातील लहानग्यांना आतापासून ईश्वरी साधनेचा मार्ग दाखवावा. यातच समाजाचे सौख्य आहे. मनुष्य देह हा देवाचे भजन करण्यासाठीच प्राप्त झाला आहे. म्हणून मनुष्याने इतर रंगात रंगण्याऐवजी ज्याने या विश्वातच रंग निर्माण केले अशा ईश्वराच्या रंगात रंगून जावे. त्यामुळेच संत तुकोबाराय देवापाशी हेच मागणे मागत आहेत. सध्याच्या काळात आपल्या मुलामुलींवर योग्य संस्कार करणे ही काळाची गरज असून मुला मुलींना मोबाईल सोबतच राजमाता जिजाऊ यांचे चरित्र देखील हाती देण्याचे गरज असल्याचे यावेळी राधाताई महाराज यांनी सांगितले.

संत साहित्याचे अभ्यासक विद्यावाचस्पती डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या भव्यदिव्य महोत्सवाच्या दुसऱ्या पुष्पात मंगळवार, दि. ३ डिसेंबर रोजी सकाळी ७ ते १२ या वेळेत प्रायश्चित्त संकल्प, देवता वहन व वास्तुमंडल पूजा, दुपारी २ ते ४ या वेळेत मूर्तीस जलाधिवास तसेच दुपारी ३ ते ५ या वेळेत महंत ह.भ.प. राधाताई सानप आईसाहेब यांचे कीर्तन तर सायंकाळी ५ ते ७ या वेळेत मंगलाचरण, नवग्रह स्थापना, देवता स्थापना आणि मूर्तीस पुष्पाधिवास करण्यात आला. सायंकाळी ७ वाजता आरती व प्रसाद व त्यानंतर ७ ते ८ या वेळेत स्वररत्न संगीत मैफिल प्रस्तुत महाराष्ट्राचा महागायाक पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध गायक सुभाष शेप व गायिका मयुरी मजगे यांची भजनसंध्या संपन्न झाली.

यावेळी सौ मंजलीताई वाल्मीक कराड, मा.सभापती सूर्यभान नाना मुंडे, सरपंच बंडू गुट्टे, दत्तात्रय गुट्टे, सरपंच सुनील गुट्टे, सरपंच राजेभाऊ आघाव, माधव मुंडे, संजय अघाव, संदीपान तांदळे, नीळकंठ दराडे, देहु आघाव, वाल्मीक गोलेर, केशव आघाव, राम बोबडे, सोमनाथ वायभसे मंगेश फड यांच्यासह सारडगाव व नंदनंज पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आज तुकोबारायांचे वंशज बापूसाहेब मोरे यांचे कीर्तन

आज सकाळी ७ ते १२ मंगलचरण, पौष्टिक हवन, दुपारी २ ते ३ श्री मूर्तीस - धान्याधिवास, कुंभात्माका स्नान, पुष्पार्चन, बिल्वार्चना, कुमकुमार्चन-होम-हवन, शय्याधिवास, दुपारी ३ ते ५ जगद्गुरू तुकोबारायांचे वंशज ह.भ.प. बापूसाहेब मोरे महाराज व सायंकाळी ५ ते ७ या वेळेत सायं पूजन, आरती व महाप्रसाद होईल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या