प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

'वर्षा'वर खलबतं !

सत्तारोहणाची वेगवान लगबग ;'वर्षा'वर घडामोडींना वेग; फडणवीस शिंदेंच्या भेटीसाठी दाखल

मुंबई: राज्यात विधानसभा निवडणूक होऊन जवळपास 10 दिवस झाले आहेत. मात्र अजूनही महायुतीचे सरकार स्थापन झालेले नाही. मुख्यमंत्री कोण होणार हेच अजून स्पष्ट झालेले नाही. भाजपचा मुख्यमंत्री होणार असला तरी चेहरा कोण असणार हे अजूनही स्पष्ट नाही. देवेंद्र फडणवीस यांचे नाव अंतिम झाल्याचे समजते आहे. मात्र काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. या दोघांमध्ये काय चर्चा होणार आहे, हे आता पहावे लागणार आहे.
      वर्षा निवसास्थानी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तब्बल 6 दिवसानंत देवेंद्र फडणवीस  हे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांची भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत. दिल्लीत झालेल्या भेटीनंतर एकनाथ शिंदे आणि देवेद्र फडणवीस यांची भेट होत आहे. दिल्लीत 26 नोव्हेंबरवा या दोघांची भेट झाली होती. त्यानंतर प्रथमच दोघेजण भेटत आहेत. 

      सत्ता स्थापनेच्या दृष्टीनं देवेंद्र फडणवीस आणि एकनवाथ शिंदे यांच्यातील ही भेट महत्वाची मानली जात आहे. दरम्यान, थोड्यावेळापूर्वीच एकनाथ शिंदे यांनी भाजप नेते गिरीष महाजन यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली होती. यावेळी उदय सामंत हेदेखील उपस्थित होते. दरम्यान, गिरीश महाजन अद्याप वर्षा निवासस्थानातून बाहेर पडले नाहीत. तोपर्यंतच देवेंद्र फडणवीस देखील वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहे. त्यामुळं या भेटीला विशेष महत्व प्राप्त झालं आहे. संभाव्य खातेवाटपावर चर्चा सुरु असल्याची माहिती मिळत आहे.
            महायुती सरकारचा शपथविधी येत्या 5 डिसेंबरला आझाद मैदानावर पार पडणार आहे. या शपथविधीच्या आधी मुंबईत आज 3 डिसेंबरला राजकीय घडामोडींना वेग आलेला बघायला मिळत आहे. राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री हे गेल्या चार दिवसांपासून आजारी होते. त्यामुळे त्यांच्या बैठका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. एकनाथ शिंदे हे गेल्या आठवड्यात शुक्रवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीसाठी गेले होते. त्यानंतर ते मुंबईत परतले होते. त्यानंतर ते आपल्या साताऱ्यातील दरेगावात गेले होते.

दिवसभरात काय-काय घडलं?

एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांचा दरेगावातील मुक्काम वाढला होता. शिंदे सलग दोन दिवस दरेगावात होते. त्यानंतर ते मुंबईत आले. पण प्रकृतीत सुधार न झाल्यामुळे ते ठाण्यातील निवासस्थानी आराम करत होते. या सर्व घडामोडींनंतर आज दुपारी एकनाथ शिंदे हे ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात रुटीन चेकअपसाठी गेले. सर्व चेकअप झाल्यानंतर एकनाथ शिंदे मुंबईच्या दिशेला रवाना झाले. एकनाथ शिंदे अवघ्या अर्ध्या तासात वर्षा बंगल्यावर दाखल झाले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी महापरिनिर्वाण दिनासाठी काय-काय तयारी केली आहे याची आढावा घेण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला देवेंद्र फडणवीस हे देखील व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या