पोस्ट्स

पोलीस ॲक्शन मोडवर....

इमेज
चार वर्षापुर्वीच्या मर्डर मधील दोन तर १९ मोटार सायकल चोरीमधील एक आरोपी जेरबंद अंबाजोगाई (वसुदेव शिंदे)....       बीड जिल्हयामध्ये गुन्हेगारी याचा आढावा घेतला असता बऱ्याच गुन्हयामधील आरोपी हे गुन्हा केल्यानंतर पळुन जातात व मिळुन येत नाहीत त्यामुळे बीड जिल्हयामधील पोलीस अभिलेखावरील पाहीजे व फरारी आरोपीस पकडुन संबधीत पोलीस ठाणेच्या ताब्यात देण्या बाबत वरीष्ठांनी आदेश दिल्याने चार वर्षापुवीच्या खुनामधील दोन आरोपी व 19 मोटार सायकली मधील एक असे तीन आरोपींना पकडण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश आले आहे या बाबत सवीस्तर वृत्त असे की दिनांक 31.08.2021 रोजी यातील फिर्यादी नामे दिलीप अभिमान धोत्रे रा.अंबाजोगाई यांनी पोलीस ठाणे अंबाजोगाई शहर येथे तक्रार दिली होती की, डुक्कर का मारले या कारणावरुन अंबाजोगाई येथील आरोपींनी फिर्यादीच्या भाऊ रवी अभिमान धोत्रे यास खंजीर व चाकुने भोसकुन एकुण 11 आरोपींनी त्याचा खुन केला होता यातील आरोपी हे गुन्हा केल्यापासुन फरार झाले होते. पोलीसांनी वेळोवेळी शोध घेवुन देखील मिळुन येत नव्हते. या गुन्हयातील आरोपी हे परळी येथील उड्डाणपुलाखाली दिसल्याचे ग...
इमेज
स्व. संतोष देशमुख हत्याप्रकरण: प्रसारित व व्हायरल फोटो- बीड एसपींनी जारी केली प्रेसनोट             बीड.....            मस्साजोग येथील सरपंच स्व. संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरणात गुन्हे अन्वेषन विभाग यांनी मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. आज दिनांक 03/03/2025 रोजी तपासाचा भाग असलेले काही फोटो टीव्ही चॅनेलवर तसेच समाज माध्यमांवर प्रसारित/ व्हायरल झाले आहेत. सदरील फोटो हे मन विचलित करणारे आहेत. त्यामुळे व्हायरल फोटोंवरून समाज माध्यमांवर जनतेच्या प्रतिक्रीया उमटत आहेत.  "सदर प्रकरण हे आता न्यायप्रविष्ट असून सदर फोटो हे न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे. त्यामुळे जनतेने  कायदा हातात घेऊ नये" असे आवाहन पोलीस अधीक्षक श्री.नवनीत कॉंवत यांनी केले आहे.
इमेज
जागतिक ग्राहक दिनानिमित्त ग्राहकाची प्रलंबित प्रकरणे  निकाली काढावीत -अनिल बोर्डे                          गेवराई ( प्रतिनिधी) 15 डिसेंबर हा जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. त्यादिवशी जिल्ह्यातील सर्व कार्यालयातील ग्राहकाचे ,शेतकरी ग्राहकाचे जिल्ह्या स्तरावरील ,तालुका स्तरावरील तहसील कार्यालयातील शेतकरी ग्राहकाचे प्रलंबित प्रकरणे निकाली काढावीत असे आवाहन बीड जिल्हा ग्राहक पंचायत महाराष्ट्र चे उपाध्यक्ष तथा गेवराई ग्राहक पंचायत मार्गदर्शन केंद्र प्रमुख अनिल बोर्डे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केलेली आहे.       जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या माध्यमातून ग्राहकाच्या समस्या सोडविण्यासाठी हक्काचे बीड जिल्ह्यात ग्राहक संरक्षण कक्षाची स्थापना होणे अत्यंत आवश्यक आहे . याबाबत बीड जिल्हा ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांच्या वतीने मा. जिल्हाधिकारी बीड यांना निवेदन द्वारे मागणी केलेली आहे परंतु अद्याप पर्यंत जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची स्थापना झालेली नाही तरी याबाबत 15 मार्च जागतिक ग्राहक दिनानिमित्त...
इमेज
दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल मध्ये  जागतिक विज्ञान दिनाचे औचित्य साधून भव्य विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन  परळी(प्रतिनीधी): दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी प्रशालेतील प्राचार्य, विद्यार्थी, पालक,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत विज्ञान दिवस व सी.व्हि. रमण यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली.         कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करून  करण्यात आली. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्रीकांत पाटील सर व प्रमुख  पाहुणे व परीक्षक म्हणून लाभलेले लक्ष्मीबाई महिला महाविद्यालयाचे प्रा. अशोक पवार सर आणि प्रा.सौ.विना भांगे मॅडम व कु. वेदांचे पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन तसेच उद्घाटन  करण्यात आले.  यावेळी प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी विविध विज्ञान प्रकल्पांचे सादरीकरण यामध्ये प्रत्यक्ष कार्य करणाऱ्या प्रतिकृती , चित्रफिती, चित्र इत्यादी प्रकल्पांचा समावेश होता. या सर्व प्रकल्पातून विद्यार्थ्यांनी आपल्या वैज्ञानिकतेची चुणूक दाखवत उत्तम प्रकारे प्रकल्पांचे स्पष्टीकरण ही केले. या प्रदर्शनीस  प्रेक्षक म्हणू...

✍️ प्रासंगिक लेख - प्रा. डॉ. सिद्धार्थ सत्यभामा आबाजी तायडे

इमेज
आदर्श शिक्षक हभप संपत महाराज गित्ते गुरुजी:अध्यापन आणि अध्यात्माचा संगम  आदर्श शिक्षक, गीताभक्त,हभप संपत महाराज गित्ते गुरुजी हे केवळ एक नाव नाही, तर ते अध्यापन आणि अध्यात्माचा संगम आहेत. त्यांनी आपले संपूर्ण जीवन ज्ञानार्जनासाठी आणि ज्ञानदानासाठी समर्पित केले आहे. ते एक आदर्श शिक्षक,प्रवचनकार, कीर्तनकार, क्रीडाप्रशिक्षक, साहित्यप्रेमी आणि अध्यात्मिक गुरु आहेत. त्यांचे जीवन म्हणजे शिक्षण, कला-क्रिडा आणि अध्यात्माचा आदर्श वस्तुपाठ  आहे.हभप संपत महाराज गित्ते गुरुजी हे एक महान व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांचे कार्य आणि जीवन अनेक लोकांसाठी प्रेरणादायी आहे. शिक्षण क्षेत्रातील अतुलनीय योगदान:  विद्यार्थीप्रिय शिक्षक गित्ते गुरुजींनी जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, गिरवली येथे अनेक वर्षे ज्ञानदानाचे पवित्र कार्य केले. त्यांनी विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञानच दिले नाही, तर त्यांना जीवनातील व्यावहारिक ज्ञान आणि नैतिक मूल्यांची शिकवण दिली. ते विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श शिक्षक आणि मार्गदर्शक आहेत. त्यांच्या शिकवणीतून अनेक विद्यार्थी घडले आणि त्यांनी जीवनात यशस्वी वाटचाल केली.त्यातीलच मीह...
इमेज
  परळी वैजनाथ येथे गौवंश रक्षणासाठी आमरण उपोषण सुरू परळी वैजनाथ (प्रतिनिधी)        परळी वैजनाथ हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असून, या पवित्र क्षेत्रात गौवंश संरक्षणासाठी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी करत आजपासून (दि. ३ मार्च २०२५) नगर परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.   उपोषणकर्त्यांनी खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत: परळी परिसरातील अवैध कत्तलखाने त्वरित बंद करावेत. गौवंश मास विक्री करणारी दुकाने बंद करावी व यापुढे विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. गौरक्षकांवर पोलिसांकडून होणारी अपमानजनक वागणूक थांबवावी. रस्त्यावरील गौवंशासाठी नगर परिषदेतर्फे कोंडवाड्याची व्यवस्था करावी. २७ फेब्रुवारी २०२४ महाराष्ट्र शासन निर्णय पशुसंवर्धन विभाग यांच्या वतीने पशूंच्या खरेदी विक्री संदर्भात काढलेल्या आदेशाची कडक अंबल बजावणी करणे. गौ तस्करी करणाऱ्यावर कडक कार्यवाही करावी. गौसेवकां वरील होणारे हल्ले थांबवून पोलिसांकडून संरक्षण द्यावे.  या मागण्यांसाठी बळीराम परांडे,विजय बडे,माऊली मंडलिक गोरक्षण सेवा संघ महाराष्ट्र राज्य परळी वैजनाथ नगर परिषदेसमोर...
इमेज
अपयशात दडले आहे यशाचे सूत्र - सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले ==================== अंबाजोगाई (वसुदेव शिंदे):- पालक आपल्या मुलांना फक्त यशाला सामोरे जायला शिकवितात परंतु, अपयश आले तर काय..? याची मात्र तयारी त्यांच्याकडून करून घेत नाहीत त्यामुळे ज्यावेळी विद्यार्थ्यांना अपयश येते ते स्वीकारण्याची आणि पचविण्याची त्यांची मानसिकता नसते त्यामुळे विद्यार्थी निराशेच्या गर्तेत जाऊन त्यांचा आत्मविश्वास खचतो. त्यामुळे यशस्वी झालेल्या लोकांच्या कथा वाचण्यापेक्षा अपयशाच्या कथा वाचल्या पाहिजेत. कारण, अपयशाचे हेच अनुभव त्या विद्यार्थ्याला यश कसे मिळवावे याचे सूत्र शिकवितात असे प्रतिपादन सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ तथा महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष डॉ.राजेश इंगोले यांनी केले. येथील संजीवन एज्युकेशन सोसायटीच्या वार्षिक स्नेहसंमेलनात ते अध्यक्ष म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ऍंम्पाच्या अध्यक्षा डॉ.सुलभा पाटील, डॉ.सागर कुलकर्णी, ऍड.संतोष पवार, संस्थेच्या सचिव डॉ.योगिनी नागरगोजे, संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर नागरगोजे, मुख्याध्यापक शेख मुक्तार व जयराम विघ्ने महाराज यांची...