इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

जागतिक ग्राहक दिनानिमित्त ग्राहकाची प्रलंबित प्रकरणे  निकाली काढावीत -अनिल बोर्डे                   

     

गेवराई ( प्रतिनिधी) 15 डिसेंबर हा जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. त्यादिवशी जिल्ह्यातील सर्व कार्यालयातील ग्राहकाचे ,शेतकरी ग्राहकाचे जिल्ह्या स्तरावरील ,तालुका स्तरावरील तहसील कार्यालयातील शेतकरी ग्राहकाचे प्रलंबित प्रकरणे निकाली काढावीत असे आवाहन बीड जिल्हा ग्राहक पंचायत महाराष्ट्र चे उपाध्यक्ष तथा गेवराई ग्राहक पंचायत मार्गदर्शन केंद्र प्रमुख अनिल बोर्डे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केलेली

आहे. 

     जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या माध्यमातून ग्राहकाच्या समस्या सोडविण्यासाठी हक्काचे बीड जिल्ह्यात ग्राहक संरक्षण कक्षाची स्थापना होणे अत्यंत आवश्यक आहे . याबाबत बीड जिल्हा ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांच्या वतीने मा. जिल्हाधिकारी बीड यांना निवेदन द्वारे मागणी केलेली आहे परंतु अद्याप पर्यंत जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची स्थापना झालेली नाही तरी याबाबत 15 मार्च जागतिक ग्राहक दिनानिमित्त योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी या पत्रकाद्वारे करण्यात येत आहे. त्यामुळे विविध कार्यालयीन शासनाचे कामकाज शासन धोरणानुसार, गतिमान, पारदर्शक, मर्यादित कालावधी निपटारा होण्यासाठी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची स्थापना होणे अत्यंत आवश्यक आहे याबाबत शासनाने योग्य ती कार्यवाही करून कक्षाची स्थापना करावी अशी विनंती बीड जिल्हा ग्राहक पंचायत महाराष्ट्र उपाध्यक्ष अनिल बोर्डे यांच्यावतीने प्रसिद्धी पत्रका द्वारे करण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या