पोस्ट्स

MB NEWS : Congratulations...

इमेज
  ॲड. प्रकाश कवठेकर यांना महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार अमोल जोशी/पाटोदा             बीड येथील तेजस ग्रुप चे चेअरमन माजी जि प सदस्य ॲड प्रकाश दादा कवठेकर यांना के पी एम मीडिया पुणे यांच्या वतीने महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.     थोडक्यात माहिती बीड येथील तेजस उद्योग समूहाचे चेअरमन व माजी जि प सदस्य ॲड प्रकाश दादा कवठेकर यांना  ऑक्सीतेज मिनरल वॉटर या ब्रँड साठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. तेजस बेवरेजेस या कंपनीच्या अंतर्गत ऑक्सितेज मिनरल वॉटर मार्केटिंग प्रोडक्शन क्वालिटी हे या कंपनी ने जपले आहे, सर्वसामान्य कुटुंबामध्ये येऊन बीड जिल्ह्यामध्ये स्वतःचा ब्रँड निर्माण करण्याचे काम दादांनी केला आहे आज मीतिला तेजस इलेक्ट्रिकल अँड सप्लायर्स, तेजस बेवरेजेस, तेजस इंडस्ट्रीज, तेजस अर्बन, तेजस अर्बन मल्टिनिधी, राजनंदनी अर्थमूव्हर्स इत्यादी कंपनी स्थापन करून शेकडो तरुणांना रोजगार उपलब्ध केला आहे.ही कंपनी ग्रामीण भागात उभा करून शेकडो मुलांना रोजगार उपलब्ध केलेला आहे. आज मितीला मराठवाडा व शेजारील जिल्ह्यामध्ये वितरण हो...

वाढदिवस- ताईसाहेबांचा संकल्प - सामाजिक बांधिलकीचा उपक्रम...!

इमेज
ना.पंकजा मुंडे यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून साजरा जनसेवेसाठी ताईसाहेबांना शतायुष लाभो - राजेश गित्ते परळी - (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री मा. ना. पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या वाढदिवसा निम्मित वाढदिवस- ताईसाहेबांचा  संकल्प - सामाजिक बांधिलकीचा उपक्रम साजरा करण्यात आला.या अंतर्गत आज दि. 26/07/2025 शनिवार रोजी*श्री सोमेश्वर प्रभुस महाअभिषेक करून ताई साहेब यांना जनसेवेसाठी शतायुष लाभो अशी प्रार्थना करण्यात आली. टोकवडी येथे पशु वैद्यकीय शिबीर घेण्यात आले. सेलू परळी येथे वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला तसेच बेलंबा आणि वैजवाडी येथे ही पदाधिकारी यांनी वृक्षारोपण केले . स्वच्छता अभियान अंतर्गत  बुद्ध विहार मिरवट, राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर मंदिर दादाहरी वडगांव, सावता महाराज मंदिर लोणी येथे भाजपा पदाधिकारी यांनी स्वच्छता केली. शैक्षणिक प्रगती अभियान अंतर्गत सोमेश्वर विद्यालय जिरेवडी येथे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.जनसेवा अभियान अंतर्गत वैद्यनाथ मंदिर परिसरातील निराधार व्यक्तींना ब्लँकेट वाटप करण्यात आले.       ...

परळीत तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

इमेज
  खळबळजनक प्रकार: बनावट  काझी, खोटे लग्न, सतत अनैसर्गिक शारीरिक संबंध व दोनवेळा जबरदस्ती गर्भपात केला ! परळीत तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल  परळी वैजनाथ, प्रतिनिधी...       लैंगिक अत्याचाराच्या घटना वारंवार समोर येत असतांनाच शारीरीक व मानसिक छळाच्या घटनांची पोलीसात सातत्याने नोंदी होतात. अशाच प्रकारची एक खळबळजनक घटना परळीतील संभाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद झाली असुन या अत्याचाराच्या घटनेची हकीकत सुन्न करुन टाकणारी आहे.याबाबत एका २५ वर्षिय पिडितेच्या फिर्यादीवरून तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.         याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, या खळबळजनक घटनेतील २५ वर्षिय पिडितेचे संगणमताने खोटे लग्न लावले व २०१९ पासून तिच्यावर पत्नीसारखे नियमीत वारवार शारीरीक संबध  प्रस्थापित करण्यात आले.यामध्ये दोन वेळा जबरदस्तीने तिला गर्भपातही करायला लावल्याचे या पिडितेने नमूद केले आहे. तिला हे सर्व अत्याचार भोगायला लावून नांदवण्यास नकार देण्यात आला आहे.विशेष म्हणजे इतकी वर्षे तिच्याशी लग्नाचा बनाव करण्यात आला.बनावट  काझी आण...
इमेज
जनसुरक्षा कायद्याखाली शेतकऱ्यांची मुस्कटदाबी जनसुरक्षा विधेयक विरोधी कृती समितीचे निदर्शने परळी / प्रतिनिधी      कृषिप्रधान देशातील शेती क्षेत्राचा संपूर्ण ताबा कॉर्पोरेट कंपन्यांना देण्याची केंद्र व राज्य सरकारची तीव्र इच्छा असुन केंद्र सरकारने यासाठीच तीन काळे कृषी कायदे देशावर लादण्याचा प्रयत्न करून पाहिला मात्र संयुक्त किसान मोर्च्याच्या नेतृत्वाखाली वर्षभर चाललेल्या आंदोलनाने हे सत्ताधारी नेतृत्वाचे प्रयत्न रोखण्यात आले.असे असले तरी त्यांनी याबाबतचे प्रयत्न सोडलेले नाहीत. ‘कृषी व्यापार नीती’च्या  नव्या प्रस्तावाच्या माध्यमातून त्यांची याबाबतची दांडगाई सुरूच असून राज्यात जनसुरक्षा विधेयक नावाखाली शेती आणि शेतकरी उध्वस्त करण्याचा कुटील डाव देशातील आणि राज्यातील सत्ताधारी करू पाहत असून या संविधान विरोधी विधेयकाला जनसामान्यांचा रोष आणि संताप उघड उघड दिसून येत आहे असे प्रतिपादन कृती समितीचे घटक व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष्यांचे जिल्हा सचिव कॉ.एड.अजय बुरांडे यांनी केले. कृषीप्रधान असलेल्या आपल्या देशातील आणि राज्यातील शेती आणि शेतकरी हे जीवाची पराकाष्ठा करत आपलं ज...

सत्यमेव जयते - धनंजय मुंडे

इमेज
  धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळातील कृषी विभागाची ती खरेदी नियमानुसारच - उच्च न्यायालयाचा निर्णय खोटी याचिका दाखल करणाऱ्या याचिका कर्ता तुषार पडगिलवार यास एक लाखांचा दंड मुंबई उच्च न्यायालयाकडून कृषी साहित्य खरेदीबाबत राज्य शासनाच्या निर्णयास दुजोरा, दोन्ही याचिका फेटाळल्या माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी राबवलेली खरेदी प्रक्रिया योग्यच - मुंबई उच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब मुंबई, २४ जुलै २०२५ –  तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात राज्य शासनाच्या कृषी विभागाने शेती पूरक साहित्य खरेदी साठी राबवलेल्या विशेष कृती आराखड्यांतर्गत कृषी साहित्याच्या थेट खरेदी व वितरणाच्या निर्णयास मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरवले असून, यास विरोध करणाऱ्या दोन्ही याचिका फेटाळल्या आहेत.  न्यायमूर्ती आलोक आराधे व संदीप व्ही. मर्णे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या भोवती या धोरणात्मक निर्णयाच्या विरोधात आरोपांची राळ उठवून व्यावसायिक दृष्टिकोन ठेऊन चुकीचे आरोप करण्यात आले होते. मात्र धनंजय मुंडे यांनी राज्य मंत्रिमंडळाची रीतसर मान्यता घेऊनच श...

शासनाची सुधारीत डोंगरी क्षेत्र समावेश गावांची यादी...

इमेज
परळी वैजनाथ तालुक्यातील १४ गावांचा डोंगरी क्षेत्रात समावेश परळी वैजनाथ, एमबी न्यूज वृत्तसेवा...        डोंगरी विभाग विकास कार्यक्रमातंर्गत सुधारीत निकष व निकषांनुसार निश्चित केलेल्या डोंगरी क्षेत्राच्या यादीत परळी तालुक्यातील १४ गावांचा समावेश  करण्यात आला आहे. सुधारीत निकष व निकषांनुसार निश्चित केलेल्या डोंगरी क्षेत्राच्या राज्यातील समावेश करण्यात आलेल्या गावांची यादी व शासन निर्णय नियोजन विभागाकडून निर्गमित करण्यात आला आहे.       महाराष्ट्र शासन, नियोजन विभाग शासन निर्णय क्र. डोंविका- २०२१/ प्र.क्र.५८/का.१४८१-अ मंत्रालय, मुंबई ४०० ०३२. दिनांक: १७ जुलै, २०२५ प्रमाणे शासन निर्णय  निर्गमित करण्यात आला आहे.डोंगरी विभाग विकास कार्यक्रमांतर्गत उपगट डोंगरी तालुक्यातील गावांच्या नावात सुधारणा करणे, नामसाधर्म्यामुळे द्विरुक्ती झालेली गावांची नावे वगळणे, डोंगरी विभाग विकास कार्यक्रमांतील यापूर्वीच्या गावांच्या नावांची छाननी इ.मध्ये सुधारणा  करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यासंदर्भात शासनाने निर्णय घेतला आहे. यानुसार डोंगरी विभाग विकास...

स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी....

इमेज
प्रतिबंधित गुटखा वाहतूक करणारा इसम पकडला; सुमारे पाच लाखांचा मुद्देमाल जप्त परळी वैजनाथ (प्रतिनिधी):       स्थानिक गुन्हे शाखा, बीड पथकाने गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकून गुटख्याची मोठ्या प्रमाणावर वाहतूक करणारा इसम पकडला असुन, त्याच्याकडून सुमारे 5 लाख 34 हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा व पान मसाला जप्त करण्यात आला आहे.     ही कारवाई 23 जुलै 2025 रोजी दुपारी 4.30 वाजण्याच्या सुमारास उजनी पाटी, ता. परळी, जि. बीड येथे करण्यात आली. गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकला असता बालाजी सौदागर फड (वय 25, रा. धर्मापुरी, ता. परळी, जि. बीड) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या वाहनातून विविध कंपनीचा पान मसाला व गुटखा जप्त करण्यात आला आहे. या आरोपीस व जप्त मुद्देमालासह बर्दापूर पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.     ही कारवाई पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रामचंद्र केकान, नाईक पोलीस कॉन्स्टेबल गोविंद भताने आणि पोलीस कॉन्स्टेबल सचिन आंधळे यांनी केल...