MB NEWS-सावधान: आपल्या मोबाईलवर आलेल्या अनोळखी काॅलवर बॅकेसंबंधी माहिती देऊ नका अन्यथा.....!

 सावधान: आपल्या मोबाईलवर आलेल्या अनोळखी काॅलवर बॅकेसंबंधी माहिती देऊ नका अन्यथा.....!



 परळीतील एकाला तीन लाखाला घातला गंडा

 

 परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

      आपल्या मोबाईलवर आलेल्या अनोळखी काॅलवर बॅकेसंबंधी माहिती देऊ नका अन्यथा आपली फसवणूक होऊ शकते.असाच एक प्रकार परळीतील एका नागरिकासोबत घडला आहे.यामध्ये संबंधित व्यक्तीला तीन लाखांचा गंडा घातला गेला आहे.याप्रकरणी गंडा घालणाऱ्या अनोळखी मोबाईल नंबर धारकाविरुद्ध परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Click -🏵️होळी पेटवून का मारल्या जातात बोंबा?? घ्या जाणुन.*

     याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, फिर्यादी तुळशीराम मोतीराम गंगणे रा.समतानगर परळी वैजनाथ यांना अनोळखी मोबाईल क्रमांक ९३३४४९०२१७ यावरून एक फोन आला. फिर्यादीस सांगितले गेले की, मी आयसीआयसीआय बँक शाखा मुंबई येथुन व्हेरिफिकेशन साठी म्हनुन कॉल केला व तुम्हाला केडीट कार्ड सुविधा सुरू करण्यासाठी मोबाईलवर प्राप्त ओटोपी विचारण्यात आला आहे तो सांगा.  ट्रु कॉलरवर  तो कॉल आयसी आयसीआय बँक चा वाटल्याने  फिर्यादीने ओटोपी  दिले असता ९८५३१ रु. कार्डवरून डेबीट झाल्याचा मेसेज आला. विचारणा केली असता लवकरात लवकर बॅलेन्स परत येईल व ही सर्व एक कार्ड सुरू करण्याची प्रक्रिया आहे असे सांगण्यात आले.

Click -🏵️ *पंकजाताई मुंडे यांनी दत्तक घेतलेल्या उदयोन्मुख गायिकेच्या मधुर आवाजाची एक झलक......!*

 नंतर पुन्हा  ९८५२० कपातीचा ओटीपी आला व हे ओटीपी टाकल्यास वॅलेन्स परत येईल म्हनुन सांगण्यात आले. फिर्यादीने ओटीपी दिला व नंतर पुन्हा ९६४५७० कपातीचा ओटीपी आला व आता ओटीपी फायनल असुन सर्व पैसे अपडेट होवून तुम्हाला अॅपवर दिसतील असे सांगण्यात आले. फिर्यादीच्या एकूण ३,००,००० मर्यादितून २.९३.५०८ रु येवढी रक्कम धोकाधडीने कपात करण्यात आली. या मोबाईल धारकाने फसवणुक केली म्हनुन आरोपी अनोळखी मोबाईल नंबर धारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास परळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे हे करीत आहेत.

Click -🏵️ *आला होळीचा सण,लय भारी:* *’लेंगी’च्या पारंपरिक बंजारा गीतांवर थिरकली पाउले!*

•••••••••••••••••••••••••••••••••••••

⬛ *सत्तावीस कट्टयाच्या हरभरा थप्पीतून सहा कट्टे चोरुन नेले*

Click -🏵️ *पंढरपूरात आमलकी एकादशी निमित्त मंदिरात मोगरा व शेवंतीच्या फुलांची सुंदर व मनमोहक आरास......!

Click -⬛ *देवेंद्र फडणवीस यांना आलेल्या नोटीसीचे परळीत भाजपकडून दहन.

Click -🏵️ *एका आवलिया 'योगी भक्ताची' परळीत येऊन 'संकल्पपुर्ती'.* _

Click -🏵️ *अन् महाशिवरात्री नंतर परळीत भरली प्रासंगिक यात्रा....!* 

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

CONTACT👉 🌑MB NEWS बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क-   महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717. 🌑

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••              जाहिरात/ADVERTIS

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार