इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-उखळी रेल्वे स्टेशन जवळ एका इसमाची रेल्वेखाली आत्महत्या

उखळी रेल्वे स्टेशन जवळ एका इसमाची रेल्वेखाली आत्महत्या 



परळी वैजनाथ, प्रतिनिधी दिनांक 19 

      परळी परभणी रेल्वे मार्गावरील उखळी बुद्रुक रेल्वे स्टेशन जवळ रेल्वे पटरी खाली एका इसमाने आत्महत्या केल्याचा प्रकार आज (दि.१९) सकाळी उघडकीस आला आहे.

      उखळी बुद्रुक रेल्वे स्टेशन जवळ रेल्वे रुळावर सकाळच्या सुमारास अंदाजे ३५ वर्षिय एका अनोळखी इसमाचा रेल्वेखाली कटलेला मृतदेह आढळून आला. हा इसम रेल्वेच्या ट्रॅक वर सुरू असलेल्या कामावरील कामगार असावा असा प्राथमिक अंदाज आहे. काल दिवसभर हा इसम या रेल्वे मार्गावर फिरताना नागरिकांनी पाहिलेला होता. दरम्यान या इसमाचा मृतदेह सकाळी आढळल्याने खळबळ उडाली आहे. घटनास्थळावर या इसमाचा मोबाईल आढळला असून त्यातील सिम कार्ड  काढून टाकल्याचे लक्षात येत आहे. त्यामुळे त्याने स्वतःहून या ठिकाणी आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

•••••••••••••••••••••••••••••••••••••

                 🔸हे देखील वाचा/पहा🔸

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

Click -🏵️ *आला होळीचा सण,लय भारी:* *’लेंगी’च्या पारंपरिक बंजारा गीतांवर थिरकली पाउले!*

Click -🏵️ *पंकजाताई मुंडे यांनी दत्तक घेतलेल्या उदयोन्मुख गायिकेच्या मधुर आवाजाची एक झलक......!*

Click -🏵️होळी पेटवून का मारल्या जातात बोंबा?? घ्या जाणुन.*

Click-*🏵️ भागवतमर्मज्ञ हभप सुरेंद्रानंद (बाळु) महाराज उखळीकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!*

Click -☘️ *पळसाला पाने तीन अन् फुलाचे रंग दोन! काय आहे पळस व होळीचा संबंध? पळसपापडी माहिती आहे का?-बघा.*☘️

Click -⭕ *मंत्री धनंजय मुंडे यांची आज की 'बात'.....'इशारो ही इशारों में!'*

Click- *"त्या" मयत बांधकाम कामगाराच्या कुटुंबाला मिळाली पाच लाखाची मदत*


⬛ *सत्तावीस कट्टयाच्या हरभरा थप्पीतून सहा कट्टे चोरुन नेले*

Click -🏵️ *पंढरपूरात आमलकी एकादशी निमित्त मंदिरात मोगरा व शेवंतीच्या फुलांची सुंदर व मनमोहक आरास......!

Click -⬛ *देवेंद्र फडणवीस यांना आलेल्या नोटीसीचे परळीत भाजपकडून दहन.

Click -🏵️ *एका आवलिया 'योगी भक्ताची' परळीत येऊन 'संकल्पपुर्ती'.* _

Click -🏵️ *अन् महाशिवरात्री नंतर परळीत भरली प्रासंगिक यात्रा....!* 

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

CONTACT👉 🌑MB NEWS बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क-   महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717. 🌑

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••              जाहिरात/ADVERTIS

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••



















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!