MB NEWS:सिमेंट फॅक्ट्रीत कामगाराचा मृत्यू

 सिमेंट फॅक्ट्रीत कामगाराचा मृत्यू




परळी (प्रतिनिधी)

 परळी येथील सिमेंट फॅक्ट्रीमध्ये सिमंटचे सॅम्पल घेण्याचे काम करणार्या कामगाराचा मृत्यु झाल्याची घटना मंगळवार दि.4 एप्रिल रोजी घडली.

 परळी शहरातील गणेशपार भागातील नारायण संभाजी फड हे गत दोन वर्षांपासुन सिमेंट फॅक्ट्रीमध्ये सिमेंट सॅम्पल घेण्याचे काम करतात.परळीतील या सिमेंट फॅक्ट्रीत 130 फुट उंचीवर जाऊन हे काम करावे लागते.नारायण हे नेहमीप्रमाणे सोमवारी (दि.3 एप्रिल)रात्री 10 वाजता कंपनीत कामावर गेले.परंतु सकाळी 6 वा.ते परत घरी आले नसल्याने घरातील व्यक्तींनी फोन लावला परंतु ते उचलत नव्हते.तेवढ्यात कंपनीतुन फोन आला व नारायण हे घरी आले का याची चौकशी केली.यानंतर सकाळी नातलगांनी संभाजीनगर पोलिस ठाण्यात मिसिंगची तक्रार दिली यानंतर सायंकाळी 4 वाजता नारायण यांचा मृतदेह 130 फुट उंचीवर सिमेंट सॅम्पल घेण्याच्या जागेजवळुन बाहेर काढण्यात आला.नारायण यांच्या पश्चात आई,वडील,पत्नी,एक मुलगी व एक मुलगा असा परिवार असुन हा परिवार आता उघड्यावर पडला असुन याप्रकरणी त्याची पत्नी चांगुणा नारायण फड यांच्या फिर्यादीवरुन संभाजीनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.






Video news 




Advertise 


Video news 



हे देखील वाचा:-

Click:● *आठव्या वर्गातील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी शाळेच्या वतीने निरोप*




Click:● *कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत १८ जागेसाठी १२६ अर्ज दाखल*




Click:● *परळीत सामूहिक हनुमान चालीसा पठण कार्यक्रम: मोठ्या संख्येने सहभागी व्हावे*




Click:● *दीनदयाळ बँकेला 4 कोटी 6 लाख रूपयांहून अधिकचा नफा* _दीनदयाळ बँकेचे मकरंद अध्यक्ष ॲड. पत्की व उपाध्यक्ष ॲड. राजेश्वर देशमुख यांची माहिती






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !