MB NEWS:परळीत सामूहिक हनुमान चालीसा पठण कार्यक्रम: मोठ्या संख्येने सहभागी व्हावे
परळीत हनुमान जयंतीनिमित्त सामूहिक हनुमान चालीसा पठण कार्यक्रम: मोठ्या संख्येने सहभागी व्हावे
परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....
हनुमान जयंतीनिमित्त सकल हिंदू समाजाच्या वतीने परळीत सामूहिक हनुमान चालीसा पठण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
हनुमान जयंतीनिमित्त गुरुवार, दि.०६ एप्रिल २०२३ सायं : ०५ वाजता संकट मोचन हनुमान मंदिर, मोंढा मार्केट, परळी वैजनाथ येथे हनुमान चालीसा पठण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. समस्त हिंदू समाजाने या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजक सकल हिंदू समाज परळी वैजनाथ यांच्यावतीने करण्यात आले आहे.
Click:
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा