श्री पंडितगुरु पार्डीकर महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

 श्री पंडितगुरु पार्डीकर महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा 



सिरसाळा (प्रतिनिधी):- श्री पंडितगुरु पार्डीकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व ग्रंथालय  विभागाच्या वतीने भारतीय क्षेपणास्त्राचे जनक माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्य वाचन प्रेरणा दिन संपन्न झाला. या प्रसंगी मुख्य मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. डी.बी.मस्के उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के.के.पाटील हे तर विशेष उपस्थितीत डॉ. के.एम. नागरगोजे होते.  


Click-■ मराठी वाङ्मयमंडळ भाषा समृद्ध करते- प्रो.डॉ.एम. बी. धोंडगे


       कार्यक्रमाच्या सुरुवातीस भारतरत्न  डॉ ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्या नंतर डॉ. मस्के सरांनी तरुणांना डॉ ए. पी. जे. अब्दुल कलामांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा असे आवाहन करताना डॉ ए. पी. जे. अब्दुल कलामांचा जीवन संघर्ष विद्यार्थ्यांसमोर विशद केला. डॉ कलामांचे इस्रो मधील योगदान, भारतीय क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमात डॉ. कलामांची भूमिका, त्याबरोबरच राष्ट्रपती पदापर्यंत घेतलेली झेप यावर सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ के के पाटील यांनी अध्यक्षीय समारोपात विद्यार्थ्यांना मोबाईलच्या जमान्यात वाचन संस्कृती टिकवण्याचे आवाहन करताना वाचाल तर वाचाल हा संदेश दिला.

यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ अरुणा वाळके मॅडम तर सूत्रसंचालन डॉ जयदीप सोळुंके यांनी केले. तसेच आभार एन एस एस स्वयंसेवक गोविंद पौळ यांनी मानले.यावेळी कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी, विद्यार्थिनी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

-----------------------------------------------------

■ video News 








■ Flash Back NEWS 

Click-*श्री. पंडितगुरु पार्डीकर महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा*

Click-■ मराठी वाङ्मयमंडळ भाषा समृद्ध करते- प्रो.डॉ.एम. बी. धोंडगे

Click- ■ आशा व गटप्रर्वतकांचा १८ ऑक्टोबरपासून बेमुदत संपाचा इशारा

Click-■ Pankaja Munde:मी येत आहे, आपल्या दसऱ्यासाठी..२४ ऑक्टोबरला भेटूया.. आपल्या भगवान भक्तीगडावर सिमोल्लंघनाला!

Click-■ न्यू हायस्कूल ज्यू कॉलेजच्या विद्यार्थ्यांने पटकावले सुवर्णपदक

Click-■ शिक्षण व रोजगार खाजगीकरण विरोधात विद्यार्थी युवक रस्त्यावर

Click-आंतरवाली येथील सभे दरम्यान गेवराईच्या तरुणाचा उष्मघाताने मृत्यू ; अंत्यविधीला उपस्थित राहून जरांगे पाटीलांची श्रद्धांजली

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !