इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

बास्केटबॉल स्पर्धेत कॉलेजचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर

 न्यू हायस्कूल ज्यू कॉलेजच्या विद्यार्थ्यांने पटकावले सुवर्णपदक



बास्केटबॉल स्पर्धेत कॉलेजचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर 


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर संचलित न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाच्या इयत्ता बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थी चि. शिवम समाधान मुंडे याने  नेपाळ येथे नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे.

                                                            शहरातील थर्मल कॉलनी परिसरातील न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी चि‌. शिवम समाधान मुंडे याने बास्केटबॉल स्पर्धेमध्ये विभाग स्तरावर,राज्यस्तरावर व त्यानंतर राष्ट्रीय पातळीवर आपल्या खेळाची चुणूक दाखवली होती. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर बास्केटबॉल खेळ प्रकारात त्याची निवड झाली. त्यानंतर नेपाळ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेमध्ये त्याने सुवर्णपदक पटकावले.

                                         चि‌. शिवम मुंडे याला मिळालेल्या यशाबद्दल व कॉलेजचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजवल्याबद्दल मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आ. प्रकाशदादा सोळंके, सरचिटणीस आ.सतीशभाऊ चव्हाण, शालेय समितीचे अध्यक्ष नानासाहेब (काका) सोळंके, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य बी.ए. नाईकनवरे, उपप्राचार्य सुनील लोमटे यांच्यासह सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या