पोस्ट्स

*परळीत रविवारी श्रीगुरु संत सोपानकाका महाराज यांचा ७१ वा पुण्यतिथी महोत्सव*

इमेज
*परळीत रविवारी श्रीगुरु संत सोपानकाका महाराज यांचा  ७१ वा पुण्यतिथी महोत्सव* ● कीर्तने व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन● परळी वैजनाथ । प्रतिनिधी. ..       परळी पंचक्रोशीतील महान संत श्रीगुरु संत सोपानकाका महाराज यांचा  ७१ वा पुण्यतिथी महोत्सव रविवार दि. ११ रोजी आहे. त्यानिमित्ताने परळीत  मान्यवर कीर्तनकारांची कीर्तने व विविध पारंपरिक धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. वारकरी संप्रदायातील व उखळीकर भजनी फडावरील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.       श्रीगुरु संत सोपानकाका महाराज मंदिर येथे आज रविवार दि. ११ रोजी  ७१ वा पुण्यतिथी महोत्सव संपन्न होणार आहे. या महोत्सवात सकाळी ११ ते १ जगमित्रनागा मंदिर येथे हभप ज्ञानेश्वर महाराज उखळीकर यांचे पूजेचे किर्तन होणार आहे. दुपारी २ ते ४ संत सोपानकाका महाराज मंदिर येथे महामंडलेश्वर स्वामी भागवतानंदजी महाराज कैलास आश्रम वेरूळ यांचे तर रात्री ९ते११ हभप परमेश्वर महाराज जायभाये आळंदी यांचे किर्तन होणार आहे....

परळीकरांचा संगीतमय दिवाळी पाडवा

इमेज
वैद्यनाथाच्या उत्तर पायर्‍यांवर रंगतदार संगीत मैफिल! ● परळीकरांचा संगीतमय  दिवाळी पाडवा ● छायाचित्र व व्हिडिओ : राजेंद्र सोनी, परळी वैजनाथ . परळी वैजनाथ/ प्रतिनिधी  दि.4 -          श्री.वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने आज  दि.8 ऑक्टोबर,गुरुवार रोजी दिवाळी पाडव्यानिमित्त पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य तथा सुप्रसिद्ध गायक  पं.आनंद भाटे यांच्या  गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. वैद्यनाथाच्या उत्तर पायर्‍यांवर रंगतदार संगीत मैफिल सुरु आहे.    पं.भीमसेन जोशी यांचे शिष्य म्हणून सर्व परिचित असलेले प.आनंद भाटे यांच्या भक्तीगीत आणि अभंगवाणीची मेजवानी परळीकरांना दिवाळीनिमित्त भेटली  आहे. विविध भक्तीगीते व भावगीते सादरीकरणात रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले. उत्तर पायर्‍या भाविकांनी फुलून गेल्या आहेत.

अन्यायकारक भारनियमन : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने १५ रोजी कंदील मार्च!*

इमेज
* अन्यायकारक भारनियमन : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने १५ रोजी कंदील मार्च!*  ● _मोठ्या संख्येने सहभागी व्हावे - बाजीराव भैय्या धर्माधिकारी_ ●  परळी वैजनाथ |प्रतिनिधी. .....           अन्यायकारक व  चुकीच्या भारनियमनामुळे जनता त्रस्त झाली असुन जनतेचा मोठा असंतोष निर्माण झाला आहे. याबाबत विधान परिषद विरोधी पक्षनेते ना. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शना खाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने १५ रोजी पावर हाउसवर  कंदील मार्च आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती  माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी दिली आहे.      सरकारच्या चुकीच्या नियोजनामुळे राज्य अंधारात आहे. भार नियमनमुक्त महाराष्ट्र करण्याच्या पोकळ घोषणा करणार्‍या सरकारला जाब विचारावाच लागेल. परळी शहरावर अन्यायकारक व चुकीच्या पद्धतीने भारनियमन लादले आहे. शहराचा वीज पुरवठा कोणत्याही क्षणी बंद करणे, कोणत्याही क्षणी चालू करणे असा नियम करण्यात आला आहे. वास्तविक वीज निर्मिती केंद्र असलेले परळी  शहर भारनियमन मुक्त ठे...
इमेज
परळीत नवरात्रोत्सवाची लगबग; ३० दुर्गोत्सव मंडळे !  आॅनलाईन परवाने मिळवण्याची मंडळांची घाई    परळी वैजनाथ /प्रतिनिधी . .............        नवरात्रोत्सव काळातील विविध परवानग्या प्राप्त करण्यासाठी  मंडळे सध्या  प्रयत्नशील आहेत. परळीत ३० दुर्गोत्सव मंडळे असणार आहेत. मात्र तूर्तास परवाना प्रक्रिया सुरू आहे. परळीतील ३०  मंडळे  या परवान्याच्या  प्रतिक्षेत आहेत. आॅनलाईन परवाने मिळवण्याची मंडळांची घाई  सुरू असल्याचे दिसून येत आहे.         सध्या नवरात्रोत्सवाची लगबग सुरू आहे. शहरात दोन पोलीस ठाण्याच्या हद्दीत मिळून २३ दुर्गोत्सव  मंडळे आहेत.तर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ७ दुर्गोत्सव  मंडळे आहेत.  शहर पोलीस ठाणे व संभाजीनगर पोलीस ठाणे या हद्दीत मंडळांना ध्वनिक्षेपक, मिरवणूक आदी परवानग्या देण्यात येतील. मंडळांनी वीज जोडणीबाबतचा अधिकृत परवाना वीज वितरण कंपनीकडून घेणे बंधनकारक आहे. तसेच धर्मादाय कार्यालयाकडील नोंदणीचे अधिकृत प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. त्या...

*....तर मोदी 2022 साली संपूर्ण संविधान बदलून टाकतील - धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली भीती*

इमेज
*....तर मोदी 2022 साली संपूर्ण संविधान बदलून टाकतील - धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली भीती* औरंगाबाद दि 9 ----  डॉ. ए.पी.जे. कलाम हे 2020 साली भारत महासत्ता होण्याचे स्वप्न पाहत होते, मात्र सध्याचे सरकार 2022 साली संपूर्ण संविधानच बदलून टाकण्याचे स्वप्न पाहत आहे अशी टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. औरंगाबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी  आयोजित संविधान बचाव परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सौ. सुप्रियाताई सुळे, माजी मंत्री फोजिया खान, आ. राजेश टोपे, आमदार सतीश चव्हाण, विक्रम काळे, भाऊसाहेब चिकटगावकर, प्रकाश गजभिये, विजय भाम्बळे, सौ. चित्राताई वाघ, सुरेखाताई ठाकरे, कदिर मौलाना आदी उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळेच देशाची वाटचाल योग्य रितीने चालली होता. मात्र आज या संविधानावर घाला घातला जात आहे. मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आले तर 2022 साली संपूर्ण संविधान बदलून टाकतील अशी भीती धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली. काही वृत्तवाहिनीच्या पत्रकारांनी सरकारची पोलखोल केली म्हणून त्य...

अन्यायकारक व चुकीच्या भारनियमनामुळे जनता त्रस्त

इमेज
अन्यायकारक व   चुकीच्या भारनियमनामुळे जनता त्रस्त  ! **_राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने व्यापक जन आंदोलन उभे करणार -  बाजीराव भैय्या धर्माधिकारी_* ●  परळी वैजनाथ |प्रतिनिधी. .....    ऐन सणासुदीच्या तोंडावर  अन्यायकारक व    चुकीच्या भारनियमनामुळे जनता त्रस्त   झाली आहे. या प्रश्नी आता जनतेचा मोठा असंतोष निर्माण झाला आहे. याबाबत विधान परिषद विरोधी पक्षनेते ना. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने व्यापक जन आंदोलन उभे करणार असल्याचा इशारा माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी दिला आहे.     माजी उपमुख्यमंत्री आ.अजितदादा पवार यांनी भाररनियमनमुक्ती करून दाखवली होती . अजितदादांचा भारनियमन मुक्तीचा हा वारसा या सरकारने ना चालवला ना टिकवला. आता  ग्रामीण भाग आणि महानगरेही अंधारात आहेत. लोड शेडिंगमुळे त्रस्त जनतेचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही.राष्ट्रवादी काँग्रेस याप्रश्नी तीव्र आंदोलन करणार आहे.सरकारच्या चुकीच्या नियोजनामुळे र...

_ह.भ.प.वै.दादासाहेब महाराज बोरखेडकर यांचा चौदावा पुण्यस्मरण महोत्सव_ *भागवत मर्मज्ञ ह-भ-प सुरेंद्र(बाळु) महाराज उखळीकर यांच्या सुश्राव्य वाणीतुन श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ*

इमेज
_ह.भ.प.वै.दादासाहेब महाराज बोरखेडकर यांचा चौदावा पुण्यस्मरण महोत्सव_  *भागवत मर्मज्ञ ह-भ-प सुरेंद्र(बाळु) महाराज उखळीकर यांच्या सुश्राव्य वाणीतुन श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ*  परळी वैजनाथ। प्रतिनिधी ...      तालुक्यातील बोरखेड येथे महान संत ह.भ.प. वै. दादासाहेब महाराज बोरखेडकर यांचा चौदावा पुण्यस्मरण महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या निमित्त भागवतमर्मज्ञ ह-भ-प सुरेंद्र(बाळु) महाराज उखळीकर यांच्या सुश्राव्य वाणीतुन श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ व अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात नामांकित कीर्तनकार यांची कीर्तन सेवा होणार आहे.