पोस्ट्स

माजलगाव येथे स्वानंद सुखनिवासी सद्गु रु जोग महाराज पुण्यशताब्दी निमित्त भागवतमर्मज्ञ ह.भ.प बाळु महाराज उखळीकर यांच्या सुमधूर वाणीतूनभागवत कथा ज्ञानयज्ञ माजलगाव /प्रतिनिधी.........      सुप्रसिद्ध भागवतकथा प्रवक्ते  भागवतमर्मज्ञ ह.भ.प बाळु महाराज उखळीकर यांच्या सुमधूर वाणीतून भागवतकथा ज्ञानयज्ञ आयोजन करण्यात आले आहे. माजलगाव येथे श्रीमद् भागवत कथेला आज दि. 8 रोजी उत्साहात प्रारंभ  झाला. यावेळी कथा श्रवणाचा भाविक मोठ्या संख्येने लाभ घेत आहेत.     माजलगाव येथे स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज पुण्यशताब्दी निमित्ताने शिवाजीनगर महिला भजनी मंडळाच्या वतीने दि. ८ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी  सप्ताहात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भागवतकथा प्रवक्ते  भागवतमर्मज्ञ ह.भ.प बाळु महाराज उखळीकर यांच्या सुमधूर वाणीतून भागवतकथा ज्ञानयज्ञ आयोजन करण्यात आले आहे. स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज पुण्यशताब्दी निमित्त होत असलेल्या या सोहळ्यात विविध अध्यात्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. दररोज दुपारी १ ते ५  या वेळेत भागवतमर्मज्ञ ह.भ....

● _कै.राजीवगांधी अनु.जाती जमाती निवासी मा.आश्रम शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात_ ●

*देशभक्तीने प्रेरीत शालेय विद्यार्थीच देशाच्या जडणघडणीचा पाया - शिवाजी मव्हाळे*  ● _कै.राजीवगांधी अनु.जाती जमाती निवासी मा.आश्रम शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात_ ● सोनपेठ / प्रतिनिधी. .......         देशभक्तीने प्रेरीत शालेय विद्यार्थीच देशाच्या जडणघडणीचा पाया असतात. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे लक्षात घेऊन प्रत्येकाने या प्रवाहात सामील झाले पाहिजे.शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे हेच ध्येय असुन देशनिष्ठ विद्यार्थी घडावा यासाठी प्रयत्न असल्याचे प्रतिपादन कै. राजकुमार मव्हाळे ग्रामीण विकास सेवाभावी  संस्थेचे अध्यक्ष शिवाजी मव्हाळे यांनी स्वातंत्र्य दिन समारंभात केले.       खडका येथील कै. राजीवगांधी अनु.जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रम शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन सादर केले. त्याचप्रमाणे देशभक्तीपर मनोगते व गीते सादर केली. प्रारंभी कै. राजकुमार मव्हाळे ग्रामीण विकास सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष शिवाजी मव्हाळे यांच्या शुभहस्ते ध्वजारोह...
इमेज
*कु.समृद्धी मनोजराव जब्दे घवघवीत यश* परळी (प्रतिनिधी)                कु.समृद्धी  मनोजराव जब्दे हिने इयत्ता दहावी शालांत परिक्षेत 90टक्के गुण घेवुन घवघवीत यश संपादन केले आहे.          महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त (10 वी ) च्या परीक्षेत परळी येथील प्रतिष्ठित नागरिक मनोजराव जब्दे यांची कन्या कु.समृद्धी हिने घवघवीत यश संपादन केले आहे. तिच्या या यशाबद्दल पालक,मित्र परिवार,शाळेचे शिक्षक व आप्तेष्टाकडुन अभिनंदन होत आहे.
इमेज
* लोकसभेतील 'विजयश्री'नंतर आता खा. डाॅ. प्रीतम मुंडेंचा मतदारसंघात आभार दौरा*  ● _८ ते ११ जुन दरम्यान पहिला टप्पा_ ● परळी वैजनाथ /प्रतिनिधी. ......          बीडच्या लोकसभा निवडणूकीबाबत राज्यभरात प्रचंड उत्सुकता होती. अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या आणि राज्याचे लक्ष लागलेल्या बीड लोकसभा मतदार संघांमध्ये अपेक्षित  'विजयश्री'नंतर आता खा. डाॅ. प्रीतम मुंडेंचा मतदारसंघात आभार दौरा काढणार आहेत. ८ ते ११ जुन दरम्यान या आभार दौऱ्याचा  पहिला टप्पा असणार आहे.          लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान बीडची राजकीय लढाई चांगलीच रंगली होती.या मध्ये मुंडे भगिनींना निर्विवाद विजयश्री मिळाली.राज्याच्या ग्रामविकास, महिला व बालकल्याण मंत्री तथा बीड च्या पालकमंत्री असलेल्या ना. पंकजा मुंडे आणि विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते ना. धनंजय मुंडे हे नेते आपापल्या पक्षाचे राज्य स्तरावर नेतृत्व करतात.त्यामुळे राजकीयदृष्टय़ा अतिशय महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लावली गेली.  भाजपच्या हाती असलेले एकहाती यश पुन्...
इमेज
* मांडवा येथील शेतकरी दुष्काळी अनुदाना पासून वंचित*!  ● _अनुदान वाटप करण्याची मागणी अन्यथा आंदोलन_ ● परळी वै./प्रतिनिधी...        दुष्काळी परिस्थितीत होरपळून निघणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार कडूनही दुष्काळी अनुदाना पासून वंचित ठेवले जात आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात दुष्काळी अनुदान जमा केल्याच्या घोषणावर घोषणा देणाऱ्या सरकारचे पितळ परळी तालुक्यात उघडे पडले आहे.   तालुक्यातील मांडवा येथील  शेतकरी अध्यापही दुष्काळ अनुदान पासून वंचित असून . तात्काळ हे अनुदान खात्यावर जमा करावे आशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.       दुष्काळाच्या झळांमध्ये होर पळलेला मांडवा येथील शेतकरी आपले दुःख विसरून पेरणी करण्याची तयारी करताना दिसत आहे.पण सरकार कडून देण्यात येणारे दुष्काळी अनुदान  दत्तक बँक आँफ महाराष्ट्र शाखेतील खातेदार शेतकऱ्यांना आद्याप मिळाले नाही . शेतकऱ्यांना पेरणीसाठी लागणारे बि-बियाणे , खत खरेदी करण्यासाठी खाजगी सावकारकडे जाण्याची वेळ आली आहे.           सरकार कडून देण्यात येणारे दुष्काळी अनुदान 50-50% असा प्रक...

परळी रेल्वे स्थानकात ट्राफिक ब्लॉक; विविध कामांसाठी काही गाड्या रद्द*

इमेज
*परळी रेल्वे स्थानकात ट्राफिक ब्लॉक;  विविध कामांसाठी काही गाड्या रद्द* छायाचित्र : जयराम गोंडे ,स्माईल फोटो स्टुडीओ  परळीवैजनाथ /प्रतिनिधी. ...         परळी रेल्वे स्थानकात ट्राफिकब्लॉक घेण्यात आला असून  विविध कामांसाठी काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या कामांची युद्धपातळीवर लगबग सुरू असल्याचे आज रेल्वे स्थानक परिसरात दिसून येत आहे. छायाचित्र :जयराम गोंडे, स्माईल फोटो स्टुडीओ परळीवैजनाथ         परळी रेल्वे स्थानकाजवळ  रेल्वे ने हाती घेतलेल्या नॉन-इंटर लॉक वर्किंग करिता 3 दिवस ट्राफिक ब्लॉक घेण्यात आल्या मुळे  काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही रेल्वे गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. गाडी संख्या 51522 पूर्णा ते परळी सवारी गाडी – दिनांक 8, 9 आणि 10 मे, 2019 रोजी रद्द करण्यात आली आहे. गाडी संख्या 51521 परळी ते पूर्णा सवारी गाडी – दिनांक 8, 9 आणि 10 मे, 2019 रोजी रद्द करण्यात आली आहे.गाडी संख्या 57554 आदिलाबाद ते परळी सवारी गाडी दिनांक 8, 9 आणि 10 मे, 2019 रोजी परभणी ते परळी दरम...

गित्ते भावंडांनी मिळवली गायन व वादनात विशेष योग्यता

इमेज
*कु.श्रेया व चि.आरव या  गित्ते भावंडांचे संगीत  परिक्षेत घवघवीत यश*   ● _गायन व वादनात मिळवली विशेष योग्यता_ ● परळी वैजनाथ /प्रतिनिधी. ...         संगीत विषयातील गायन परिक्षेत कु. श्रेया मधुकर गित्ते हिने आणि तबला वादन परीक्षेत चि.आरव मधुकर गित्ते या बहिण - भावांनी घवघवीत यश संपादन केले आहे. विशेष बाब म्हणजे या परिक्षेत गित्ते भावंडांनी   गायन व वादनात विशेष योग्यता मिळवलीआहे.या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.         अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडल मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या नोव्हेंबर २०१८ या सत्राचा संगीत परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या मध्ये गायन या विषयात कु. श्रेया मधुकर गित्ते हिने परिक्षा प्रविष्ट केली होती. या परिक्षेत तीने घवघवीत यश संपादन केले. तिने पैकीच्या पैकी गुण संपादित करत विशेष योग्यता श्रेणी प्राप्त केली आहे. तर चि.आरव मधुकर गित्ते याने तबला या विषयात वादन परीक्षेत पैकीच्या पैकी गुण संपादित करत विशेष योग्यता श्रेणी प्राप्त केली आहे. त्यांना परळी येथील ग...