पोस्ट्स

इमेज
५८ दिवसांनंतर निघण्यासाठी सज्ज 'लालपरी' वाट पाहून पाहून थांबली ! *परळी आगारात दिवसभरात आले केवळ दोन प्रवासी* परळी वैजनाथ, प्रतिनिधी:-        कोरोनामुळे ठप्प झालेली अर्थव्यवस्था सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे.त्याचाच एक भाग म्हणून परिवहन महामंडळाची लालपरी शुक्रवार दि.22 मे पासून धावणार यासाठी परळी आगारात  8 गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. मात्र सकाळपासून कोणीही प्रवासी बसस्थानकावर फिरकलेच नाही.दिवसभरात केवळ दोन प्रवासी आले. त्यामुळे परळी आगारातून बसच्या नियोजित फेर्या झाल्या नाहीत.          दोन महिन्यांपासून बसून असलेल्या महामंडळाच्या बसेस शुक्रवारपासून सुरू करण्यात आल्या. शासनाच्या बसेस या जिल्हा अंतर्गत धावणार आहेत. परळी आगारात बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले. परळी-बीड अणि परळी-अंबाजोगाई अशा प्रत्येकी बारा फेर्यांचे नियोजन करण्यात आलेले आहे.यासाठी एकूण आठ बसेस सज्ज करण्यात आल्या. होत्या अशी माहिती आगारप्रमुख  आर.बी.राजपुत  यांनी दिली. मात्र 'वाट पाहिन पण एसटीनेच जाईन 'असे नेहमी म्हटले जाते परंतु आज वाट पाहिन पण...

कोरोना महामारीत परळीत युवकांचा घरोघर 'माधुकरी' गोळा करून गरजूंना अन्नदान यज्ञ !

इमेज
कोरोना महामारीत परळीत युवकांचा  घरोघर 'माधुकरी' गोळा करून गरजूंना अन्नदान यज्ञ  ! • _शिवनगरमधिल युवकांचा २५ दिवसांपासून उपक्रम_ • परळी वैजनाथ/ प्रतिनिधी....       कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लागु करण्यात आलेल्या टाळाबंदीने अनेकांना अनेक अडचणी येत आहेत.त्याचप्रमाणे अडल्या नडलेल्यांना अडचणी येऊ नयेत यासाठीही अनेक प्रयत्नशिल हात पुढे येत गरजुंना सर्वोतोपरी मदत करत आहेत.अशाच प्रकारे गेल्या २५ दिवसांपासून मांगिर बाबा मित्र मंडळाचे श्रीनाथ विभूते, कृष्णा भास्कर व अन्य युवक गल्लीत प्रत्येक घरातून घरोघर 'माधुकरी' गोळा करून गरजूंना अन्नदानयज्ञ करण्याचा उपक्रम राबवताना दिसत आहेत. सर्वसामान्य घरांतील युवकांनी एकत्रित येत राबवलेला हा उपक्रम माणुसकीचे मुर्तीमंत उदाहरण ठरला आहे.        कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लागु करण्यात आलेल्या टाळाबंदीच्या परिस्थितीत गरजुंपर्यंत जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीसाठी नागरीक,  संस्था पुढे येत आहेत.  कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लागु करण्यात आलेल्या टाळाबंदीने  देश व राज्यातील हातावर पोट...

परळीतील नव्या पिढीलाही वैद्यनाथाची ओढ

इमेज
परळीतील नव्या पिढीलाही वैद्यनाथाची ओढ : चित्रकार मैथिलीने  रेखाटले वैद्यनाथ मंदिरचे हुबेहुब पोस्टर चित्र ●वैद्यनाथ मंदिर : नवोदित शिल्पकार,  चित्रकारांसाठी उत्कृष्ट कलाकृती!● परळी वैजनाथ /रविंद्र जोशी. ....        देशभरातील बारा ज्योतिर्लिंगापैकी पाच ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. त्यापैकी तीन ज्योतिर्लिंग मराठवाड्यात आहेत. या मध्ये परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग आहे. त्यामुळेच गावाला वैद्यनाथाची परळी किंवा परळी वैजनाथ हे नाव प्राप्त झाले आहे. परळीचे वैद्यनाथ मंदिर एक ऐतिहासिक, सांस्कृतिक व धार्मिक समृद्ध वारसा आहे. त्याचबरोबर वास्तुरचनेचा उत्तम नमुना आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिराची अनेक वैशिष्ट्ये आहेत. या मध्ये आणखी एक भर पडली असुन वैद्यनाथ मंदिर हे नवोदित शिल्पकार,  चित्रकारांसाठी उत्कृष्ट कलाकृती आहे. परळीतील नव्या पिढीची  चित्रकार मैथिलीने  वैद्यनाथ मंदिरचे हुबेहुब पोस्टर चित्र रेखाटले आहे. यावरुन कलाकृतींमध्ये रस असणारांनाही मोठे आकर्षण असल्याचे प्रत्ययाला आले.       ब...

४० बालकांना वृक्षारोपण, गीतापाठ, संकिर्तनासह गोसेवेची प्रत्यक्ष घडवली अनुभुती

इमेज
परळी गीता परिवाराच्या वतीने रामरक्षा गोशाळेत क्षेत्रभेट! ● ४० बालकांना वृक्षारोपण,  गीतापाठ, संकिर्तनासह गोसेवेची प्रत्यक्ष घडवली अनुभुती ● परळी वैजनाथ /प्रतिनिधी. ...     प. पु. गोविंददेव गिरीजी महाराज  (किशोरजी व्यास ) यांच्या प्रेरणेने संचलित परळी गीता परिवाराच्या वतीने अंबाजोगाई रस्त्यावरील रामरक्षा गोशाळेत क्षेत्रभेट उपक्रम घेण्यात आला. यामध्ये ४० बालकांना गीतापाठ, संकिर्तनासह गोसेवेची प्रत्यक्ष अनुभुती घडवली.त्याचबरोबर या बालकांना निसर्गसानिध्य देत वृक्षारोपण करुन वृक्षसंवर्धन व संगोपनासाठी संस्कार रुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला.       गीता परिवार परळी वैद्यनाथ च्या माध्यमातून संस्कारवर्ग व संस्कृतीरक्षक उपक्रम राबविण्यात येतात. या अनुषंगाने   अंबाजोगाई रस्त्यावरील रामरक्षा गोशाळेत क्षेत्रभेट उपक्रम घेण्यात आला. या मध्ये 40 बालक सहभागी झाले होते.बालकांना गीतापाठ, संकिर्तनासह गोसेवेची प्रत्यक्ष अनुभुती घडवली. मुलांच्या हस्ते गाईंना गुळ, पेंढ, चारा देण्यात आला. भगवद्गीता  12 वा आणि  15 वा अध्याय पाठ एकत...

परळीतील नव्या पिढीलाही वैद्यनाथाची ओढ

इमेज
परळीतील नव्या पिढीलाही वैद्यनाथाची ओढ : चित्रकार मैथिलीने  रेखाटले वैद्यनाथ मंदिरचे हुबेहुब पोस्टर चित्र ●वैद्यनाथ मंदिर : नवोदित शिल्पकार,  चित्रकारांसाठी उत्कृष्ट कलाकृती!● परळी वैजनाथ /रविंद्र जोशी. ....        देशभरातील बारा ज्योतिर्लिंगापैकी पाच ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. त्यापैकी तीन ज्योतिर्लिंग मराठवाड्यात आहेत. या मध्ये परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग आहे. त्यामुळेच गावाला वैद्यनाथाची परळी किंवा परळी वैजनाथ हे नाव प्राप्त झाले आहे. परळीचे वैद्यनाथ मंदिर एक ऐतिहासिक, सांस्कृतिक व धार्मिक समृद्ध वारसा आहे. त्याचबरोबर वास्तुरचनेचा उत्तम नमुना आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिराची अनेक वैशिष्ट्ये आहेत. या मध्ये आणखी एक भर पडली असुन वैद्यनाथ मंदिर हे नवोदित शिल्पकार,  चित्रकारांसाठी उत्कृष्ट कलाकृती आहे. परळीतील नव्या पिढीची  चित्रकार मैथिलीने  वैद्यनाथ मंदिरचे हुबेहुब पोस्टर चित्र रेखाटले आहे. यावरुन कलाकृतींमध्ये रस असणारांनाही मोठे आकर्षण असल्याचे प्रत्ययाला आले.     ...

महाशिवरात्री विशेष लेख: वैद्यनाथ ज्योतिर्लिंग परळीचे साक्षात भूकैलास कलीयुगाचे

इमेज
वैद्यनाथ ज्योतिर्लिंग परळीचे साक्षात भूकैलास कलीयुगाचे ------------------------------------ [ॲड.दत्तात्रय आंधळे ]       श्रीक्षेत्र परळी वैजनाथ बाराज्योर्तिलिंगापैकी एक वैद्यनाथ या नावाने  प्रशिध्द आहे .येथे हिंदू धर्माचे प्राचीन पाच संप्रदाय परंपरेने आहेत आणि देव देवतेचा परिवार जणु माहेरघर असलेले पवित्र आणि पावन स्थान परळी होय.येथे १वैष्णव २शैव३शाक्त ४स्मार्त ५वैदिक संप्रदाय परंपरा आजतागायत जतन केलेले तीर्थक्षेत्र होय. .भारताच्या  नकाशात कन्याकुमारी ते उच्जैन दरम्यान एक मध्यरेषा ओढली तर ती परळी वैजनाथ क्षेत्रावरुन जाते .म्हणून परळीला मध्यरेखा पण म्हटले जाते.याविषयी एकमहान ज्योतिषाचार्य तथा गणितज्ञ  भास्कराचार्य [इ.स.११४४-१२२३]यांनी सिध्दांतशिरोमणी आणि करणकुतूहल हे ग्रंथ  लिहले आहेत.त्यांनी भारतवर्षाची मध्यरेखा कशी व कोणकोणत्या स्थानावरुन जाते हे वर्णित केलेले आहे. "पुरीरक्षशां देवकन्याsथ कांची/सितःपर्वतःपर्यली वत्सगुल्यम//पुरी चोज्जयिन्यांन्हया गर्गराटम/कुरुक्षेत्र मेरुर्भुवोर्मध्य रेखा//"भारताची मध्यरेखा राक्षसांचीनगरी लंका ,कन्याकुमारी,कां...
माजलगाव येथे स्वानंद सुखनिवासी सद्गु रु जोग महाराज पुण्यशताब्दी निमित्त भागवतमर्मज्ञ ह.भ.प बाळु महाराज उखळीकर यांच्या सुमधूर वाणीतूनभागवत कथा ज्ञानयज्ञ माजलगाव /प्रतिनिधी.........      सुप्रसिद्ध भागवतकथा प्रवक्ते  भागवतमर्मज्ञ ह.भ.प बाळु महाराज उखळीकर यांच्या सुमधूर वाणीतून भागवतकथा ज्ञानयज्ञ आयोजन करण्यात आले आहे. माजलगाव येथे श्रीमद् भागवत कथेला आज दि. 8 रोजी उत्साहात प्रारंभ  झाला. यावेळी कथा श्रवणाचा भाविक मोठ्या संख्येने लाभ घेत आहेत.     माजलगाव येथे स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज पुण्यशताब्दी निमित्ताने शिवाजीनगर महिला भजनी मंडळाच्या वतीने दि. ८ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी  सप्ताहात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भागवतकथा प्रवक्ते  भागवतमर्मज्ञ ह.भ.प बाळु महाराज उखळीकर यांच्या सुमधूर वाणीतून भागवतकथा ज्ञानयज्ञ आयोजन करण्यात आले आहे. स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज पुण्यशताब्दी निमित्त होत असलेल्या या सोहळ्यात विविध अध्यात्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. दररोज दुपारी १ ते ५  या वेळेत भागवतमर्मज्ञ ह.भ....