पोस्ट्स

शेत,शिवार आणि शेतकरी यांच्या जीवनात समृद्धी निर्माण करणारे मुख्यमंत्री वसंतराव नाईक-शिवाजीराव मव्हाळे

इमेज
 शेत,शिवार आणि शेतकरी यांच्या जीवनात समृद्धी निर्माण करणारे मुख्यमंत्री वसंतराव नाईक-शिवाजीराव मव्हाळे • *_कै.राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रमशाळा खडका येथे वसंतराव नाईक जयंती साजरी_* • सोनपेठ (प्रतिनिधी).....      कै.राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रमशाळा खडका येथे हरित क्रांतीचे प्रणेते   वसंतराव नाईक जयंती यांची जयंती साजरी करण्यात आली.      हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीच्या निमित्ताने राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रमशाळा खडका येथे संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव मव्हाळे, सरपंच रामप्रसाद यादव, पोलीस पाटील वैजनाथराव यादव, मुख्याध्यापक डी.एल. सोनकांबळे,वसतिगृह अधिक्षक डी.एम.माने आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत वसंतराव नाईक   प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव मव्हाळे यांनी सांगितले की, कृषी क्षेत्रातील खर्या अर्थाने क्रांती घडवून शेत,शिवार आणि शेतकरी यांच्या जीवनात समृद्धी निर्माण करणारे मुख्यमंत्री म्हण...

Video News: गुन्हे मागे घ्या परळी पत्रकार संघाचे निवेदन

इमेज
गुन्हे मागे घ्या परळी पत्रकार संघाचे निवेदन परळी (प्रतिनिधी) औरंगाबाद येथे कोरोना संदर्भात सत्य लिखाण करत प्रशासनाच्या चुका चव्हाट्यावर मांडल्यामुळेआपले अपयश झाकण्यासाठी प्रशासनाने  दिव्य मराठीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्रशासकीय यंत्रणेचा परळी  पत्रकार संघाच्या वतिने निषेध करण्यात येवुन हे गुन्हे त्वरीत मागे घ्यावेत अशी मागणी निवेदनाद्वारे  केली आहे. औरंगाबाद महानगर भागात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असताना या पार्श्वभुमीवर प्रशासनाचा निष्काळजीपणा व बेजबाबदारपणा बाबत दैनिक दिव्य मराठीने सत्य परिस्थिती मांडल्यानंतर प्रशासनाने वृत्तपत्रांची मुस्कटदाबी करण्याच्या हेतूने व आपली अकार्यक्षमता झाकण्यासाठी चुकीच्या पद्धतीने दैनिकाचे संपादक, प्रकाशक व वार्ताहरावरच गुन्हे दाखल केले आहेत.प्रशासनाच्या या मुजोरपणाचा जाहीर निषेध करीत दैनिका विरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे पोलिस प्रशासनाने तात्काळ मागे घेण्यात यावी व या कार्यपद्धतीत दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत तहसिलदार यांना निवेदन दिले.या निवेदनावर पत्रकार...

समाजभुषण स्व. सुवालालजी वाकेकर पुरस्कारांची घोषणा

इमेज
समाजभुषण स्व. सुवालालजी वाकेकर पुरस्कारांची घोषणा पालकमंत्री ना.धनंजय मुंडे, उद्योगपती रमेश फिरोदीया, ज्येष्ठ साहित्यीक प्रा.डॉ.दासू वैद्य  पुरस्कारांचे मानकरी सार्वजनिक कार्यक्रमावरील निर्बंध शिथील होताच होणार कार्यक्रम परळी (प्रतिनिधी-) समाजभुषण स्व. सुवालालजी वाकेकर (ललवाणी) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मारवाडी युवा मंचच्या वतीने देण्यात येणार्या  राज्यस्तरीय पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली. राज्याचे सामाजिक न्याय तथा विशेष सहाय्यमंत्री  तथा नाथ प्रतिष्ठाणचे अध्यक्ष ना. धनंजय मुंडे (राज्य भुषण), उद्योगपती रमेश फिरोदीया (समाज भुषण) व प्रसिद्ध साहित्यीक प्रा.डॉ.दासू वैद्य (साहित्य भुषण) यांना स्व. सुवालालजी वाकेकर पुस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात सार्वजनिक कार्यक्रमावर निर्बंध असून हे निर्बंध शिथील होताच कार्यक्रमाची तारिख जाहीर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून रामाणाचार्य रामराव महाराज ढोक व प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध कवि  अशोक नायगावकर उपस्थित राहणार असल्याचे मारवाडी युवा मंचचे अध्यक्ष ...

कै.राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रमशाळा खडका येथे राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी

इमेज
कै.राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रमशाळा खडका येथे राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी सोनपेठ (प्रतिनिधी).....      कै.राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रमशाळा खडका येथे राजे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.  आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रमशाळा खडका येथे संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव मव्हाळे, गणेश हांडे, राजाभाऊ निळे या मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव मव्हाळे यांनी सांगितले की, सामाजिक न्यायाची खरोखर भुमिका घेत खर्या अर्थाने घेणारे राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांची कास धरून वाटचाल केली पाहिजे.त्यांचे विचारच सामाजिक न्याय व हक्क मिळवून देणारे असल्याचे सांगितले.   प्रास्ताविक मुख्याध्यापक सोनकांबळे यांनी केले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक डी.एल.सोनकांबळे, वसतिगृह अधिक्षक डी.एम.माने, शिक्षकवृंद, कर्मचारी उपस्थित होते. ***†********************************...

Video News: अनंत इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वोपयोगी उपक्रम

इमेज
अनंत इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वोपयोगी उपक्रम*  • *_वृक्षारोपण, वृक्षभेट, सॅनिटायझर,मास्क व अन्नधान्य किटचे वितरण_* अनंत इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वोपयोगी उपक्रम*  • *_वृक्षारोपण, वृक्षभेट, सॅनिटायझर,मास्क व अन्नधान्य किटचे वितरण_* * परळी वैजनाथ: प्रतिनिधी....      राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर सरचिटणीस अनंत इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त परळी शहरात सर्वोपयोगी उपक्रम राबवण्यात आले.अनाठायी खर्च व सवंग प्रसिद्धी च्या उपक्रमांना फाटा देत वृक्षारोपण, ५०० वृक्षभेट,  सॅनिटायझर, मास्क व अन्नधान्य किटचे वितरण करण्यात आले.        जग सध्या कोरोना महामारीच्या महाभयंकर संकटाशी सामना करत आहे.या पार्श्वभूमीवर अगदी सुरुवाती पासून कोरोना प्रतिबंधक मोहीमेत अग्रेसर राहिलेल्या व सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात पुढाकार घेणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर सरचिटणीस अनंत इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त राजकीय,सामाजिक व विविध स्तरातील नागरिकांनी शुभेच्छा दिल्या. मित्र मंडळाच्या वतीने अनंत इंगळे यांच्या वाढदिवसा निमित्त...

पंकजाताई मुंडे यांनी केले आवाहन....मुंडे साहेबांच्या आवडीचा पदार्थ करा, घरात फोटोसमोर दोन दिवे लावा, पुण्यतिथीला गोपीनाथ गडावर गर्दी नको

इमेज
*लोकनेत्याच्या पुण्यतिथीच्या पार्श्वभूमीवर पंकजाताई मुंडे यांनी केले आवाहन* *मुंडे साहेबांच्या आवडीचा पदार्थ करा, घरात फोटोसमोर दोन दिवे लावा, पुण्यतिथीला गोपीनाथ गडावर गर्दी नको * परळी वैजनाथदि. २९---- लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीला मुंडे साहेबांच्या आवडीचा पदार्थ करायचा आणि घरातच फोटोसमोर दोन दिवे लावून त्यांना अभिवादन करायचं, असं आवाहन  पंकजाताई मुंडे यांनी केलं आहे. ३ जून रोजी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम गोपीनाथ गडावरच होईल, मात्र कार्यक्रम लाईव्ह असेल, कोणीही गडावर गर्दी करु नये, अशी सूचना पंकजाताई मुंडे यांनी केली आहे.  ३ जून हा दिवस उजाडलाच नाही पाहिजे, असं वाटत असल्याची फेसबुक पोस्ट पंकजाताई मुंडे यांनी केली आहे.   ३ जून रोजी लोकनेते गोपीनाथराव  मुंडे यांचा सहावा पुण्यस्मरण दिवस आहे. हा दिवस ‘संघर्ष दिन’ म्हणून मुंडे समर्थक साजरा करतात. परंतु सध्या कोरोनामुळे राज्यासह बीड जिल्ह्यातही लॉकडाऊन आहे. शिवाय गर्दीच्या सर्वच कार्यक्रमावर बंदी आहे. गोपीनाथ गडावर सध्या पद्धतीने मोजक्या लोकांमध्ये गोपीनाथराव मुंडे य...
इमेज
५८ दिवसांनंतर निघण्यासाठी सज्ज 'लालपरी' वाट पाहून पाहून थांबली ! *परळी आगारात दिवसभरात आले केवळ दोन प्रवासी* परळी वैजनाथ, प्रतिनिधी:-        कोरोनामुळे ठप्प झालेली अर्थव्यवस्था सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे.त्याचाच एक भाग म्हणून परिवहन महामंडळाची लालपरी शुक्रवार दि.22 मे पासून धावणार यासाठी परळी आगारात  8 गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. मात्र सकाळपासून कोणीही प्रवासी बसस्थानकावर फिरकलेच नाही.दिवसभरात केवळ दोन प्रवासी आले. त्यामुळे परळी आगारातून बसच्या नियोजित फेर्या झाल्या नाहीत.          दोन महिन्यांपासून बसून असलेल्या महामंडळाच्या बसेस शुक्रवारपासून सुरू करण्यात आल्या. शासनाच्या बसेस या जिल्हा अंतर्गत धावणार आहेत. परळी आगारात बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले. परळी-बीड अणि परळी-अंबाजोगाई अशा प्रत्येकी बारा फेर्यांचे नियोजन करण्यात आलेले आहे.यासाठी एकूण आठ बसेस सज्ज करण्यात आल्या. होत्या अशी माहिती आगारप्रमुख  आर.बी.राजपुत  यांनी दिली. मात्र 'वाट पाहिन पण एसटीनेच जाईन 'असे नेहमी म्हटले जाते परंतु आज वाट पाहिन पण...