* बीड शहरातील व्यवसायिकांची सहा तपासणी केंद्रांवर अॅन्टीजन टेस्ट--मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार* *संबंधिताना देण्यात आलेल्या वेळी आणि दिलेल्या तपासणी केंद्रावरच आपली तपासणी करून घ्यावी बीड,(जिमाका) दि. ७:--बीड शहरात व्यवसायिक,कर्मचारी वर्ग,कामगार व इतर यांची कोविड-१९ संदर्भात अॅन्टीजन तपासणीसाठी जिल्हा आरोग्य विभागाने विशेष मोहिम हाती घेतली असून सहा अॅन्टीजन तपासणी केंद्र कार्यन्चित करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी आरोग्य यंत्रणेस दिले आहेत. शहरातील दुकानदार व व्यवसायिकांनी त्यांना देण्यात आलेल्या वेळी आणि दिलेल्या तपासणी केंद्रावरच उपस्थित राहून आपली तपासणी करून घ्यावी यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत प्रत्येक तपासणी केंद्रावर एका तासा मध्ये साधारणतः 50 व्यक्तींची अॅन्टीजन तपासणी करण्यात येणार असून त्यासाठी बीड शहरातील व्यवसायिक आणि तपासणी करण्यासाठी येण्याच्या वेळा त्यांना कळविण्यात आलेले आहेत यामध्ये ८ ते 10 ऑगस्ट २०२० दरम्यान सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत तपासणी केली जाणार असून त्याचे ...