MB NEWS-देशात महिला सुरक्षित नाहीत गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा - सौ शोभना बद्दर

उत्तर प्रदेशमधील हाथरस घटनेतील नराधमांना तात्काळ फाशी द्या ; देशात महिला सुरक्षित नाहीत गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा - सौ शोभना बद्दर परळी वैजनाथ दि ४ ( प्रतिनिधी ) :- हैदराबाद येथील समशाबाद येथील घटनेस एक वर्ष पूर्ण होत नाही तोच उत्तर प्रदेश मधील हाथरस या ठिकाणी माणुसकीला काळीमा फासणारी लज्जास्पद घटना घडली. एका अबला महिलेस गॅंग रेप करून तिचे हाल हाल करीत तिच्या जिवाशी खेळ खेळला गेला त्यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. तेव्हा सदर घटनेतील नराधमांना तात्काळ काशी द्या आणि देशांमध्ये महिलांचे अस्तित्व धोक्यात असून महिला सुरक्षित नाहीत. त्याची लाजत का असेना जबाबदारी स्वीकारून तात्काळ केंद्रीय गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी आग्रही मागणी शिवसेनेच्या माजी नगरसेविका शोभना बद्दर यांनी केली आहे. गेली १० महिन्यांपूर्वी म्हणजे २७ नोव्हेंबर २०१९ रोजी हैदराबाद येथील समशाबाद याठिकाणी अशाच एका निष्पाप व्हेटरनरी महिला डॉक्टरवर रात्री ड्युटीवरून घरी जात असताना चार ते पाच नराधमांनी आडवून तिच्यावर गॅंग रेप करीत तिची निर्गुण हत्या केली आणि तिचा मृतदेह दुसऱ्या दिवशी जळाल्या स्थितीत आढळ...