पोस्ट्स

MB NEWS:वैद्यनाथाची दसरा पालखी परिक्रमा पाच मानकऱ्यांसह निघणार

इमेज
  वैद्यनाथाची दसरा पालखी परिक्रमा पाच मानकऱ्यांसह निघणार; जिल्हाधिकाऱ्यांची अटीसह परवानगी परळी : प्रतिनिधी...  जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दसऱ्याच्या दिवशी प्रभू वैद्यनाथाची पालखी मिरवणूक परिक्रमेस काही अटीसह परवानगी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी अटीचे पालनकरून दसरा परिक्रमा पूर्ण करण्याच्या सूचना दिल्याने हा पारंपारिक सोहळा खंडित होणार नाही     जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिलेल्या परवानगीनुसार श्री प्रभू वैद्यनाथाची पालखी मिरवणूक परिक्रमा वाहनातून पाच मानकऱ्यांच्या सहभागाने करावी. यावेळी वाहन कुठेही न थांबवता कमीत कमी वेळेत परिक्रमा पूर्ण करावी. पाचपेक्षा जास्त भाविकांनी व मानकरी यांनी गर्दी करू नये. संसर्गजन्य स्थिती असल्याने या अटीचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रेखावार यांनी शुक्रवारी श्री वैजनाथ मंदिराचे सचिव राजेश देशमुख यांना दिल्या आहेत. यासोबतच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सीमोल्लंघन स्थळी गर्दी करू नये असे आवाहनही करण्यात आले आहे. 

MB NEWS:नागनाथ अप्पा हलगे कॉलेज ऑफ इंजीनियरिंगचे प्राचार्य व शिक्षक कोरोना योद्धा म्हणून सन्मानित

इमेज
  नागनाथ अप्पा हलगे कॉलेज ऑफ इंजीनियरिंगचे प्राचार्य व शिक्षक कोरोना योद्धा म्हणून सन्मानित  विश्वमानवाधिकार परिषद महाराष्ट्र राज्याचा उपक्रम  परळी ( प्रतिनिधि) :- मागिल सात महिन्या पासुन पुर्ण देश लॉकडॉन आहे या लॉकडॉन मध्ये विद्यार्थींचे खुप नुकसान झाला होता ,परीक्षा सुद्धा होणे अवघड झाले होते. .  विद्यापीठाच्या आदेशानुसार कॉलेजने कोरोनाच्या काळात व्यवस्थितपणे परीक्षा घेतली या सर्व कामांची दखल घेऊन  विश्वमानवाधिकार परिषद महाराष्ट्र राज्याच्या वतीने नागनाथ अप्पा हलगे कॉलेज ऑफ इंजीनियरिंगचे प्राचार्य आणि शिक्षकांना कोरोना युद्धा प्रमाणपत्र देऊन संमानित करण्यात आले.   ज्या शिक्षकांना सम्मानित करण्यात आले त्या मध्ये  प्राचार्य भास्करराव सर , गोविंद मुंडे सर, केंद्रे सर,सय्यद सादत राज, विजय दहीवाळ सर, तकवीम कुरेशी मॅडम, चाटे मॅडम, उत्तम मुंडे सर, शिंदे सर, मराठे सर, सय्यद अदिल सर यांचा समावेश आहे. यावेळी महाराष्ट्र राज्याचे विश्व मानव अधिकार परिषद चे युवा सेना चे अध्यक्ष सय्यद  सोहेल लाईक ,शेख कासिम ,आयाज शेख व पत्रकार मुदस्सीर शेख व विश्वमानवाधि...

MB NEWS:बाजीराव भैय्या धर्माधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत औरंगाबादमधील "मार्व्हल 34" या नविन गृहप्रकल्पाचे उद्घाटन

इमेज
  बाजीराव भैय्या धर्माधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत औरंगाबादमधील "मार्व्हल 34" या नविन गृहप्रकल्पाचे उद्घाटन औरंगाबाद, प्रतिनिधी.... औरंगाबादमधील  स्थापत्य अभियंता राहुल स्वामी व सहकारी यांच्या "मार्व्हल 34" या नविन गृहप्रकल्पाच्या उद्घाटन सोहळा परळीचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत आज दि.२३ रोजी पार पडला.     दर्जेदार आणि माफक दरात नागरिकांना "मार्व्हल 34" या गृहप्रकल्पात रो हाऊस खरेदी करता येणार आहेत.या उद्घाटन सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते युवकनेते निलेश राऊत,शिवसेनेचे शहर प्रमुख विश्वनाथजी स्वामी,उद्योजक केशुभाई पटेल,उद्योजक प्रसाददादा जोशी, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

MB NEWS: परीक्षा हुकली, पेपर बुडाला,लाॅगिन झाले नाही....आता चिंता करु नका.

इमेज
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर परीक्षेकरिता अजून एक संधी. परीक्षा हुकली, पेपर बुडाला,लाॅगिन झाले नाही....आता चिंता करु नका. कोरोनाच्या प्रादूर्भावात विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जावू नये म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पदवी व पदव्युत्तर परीक्षेकरिता अजून एक संधी दिली आहे.

MB NEWS:ठाकरे सरकारचा मोठा निर्णय:अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटींचे पॅकेज

इमेज
  ठाकरे सरकारचा मोठा निर्णय:अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटींचे पॅकेज   मुंबई: अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारनं १० हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ही घोषणा केली. दिवाळीपर्यंत ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. शेतकऱ्यांना १० हजार प्रतिहेक्टर मदत २ हेक्टरपर्यंत दिली जाणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे. तसे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. ही मदत दिवाळीपर्यंत देण्याचा प्रयत्न असेल. शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू राहता कामा नये, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा --------- • शेती, फळपिकांसाठी हेक्टरी वाढीव मदत  •एकूण केंद्राकडून येणं 38 हजार कोटी रुपये आहे पण मिळालेले नाहीत.  •अद्यापपर्यंत पूर, अतिवृष्टीसंदर्भात केंद्राचे पथक पाहणीसाठी आलेले नाही. आम्ही दोन तीनदा विनंती केली आहे  •या आपत्तीत 10 हजार कोटी रुपये मदत देण्याचे निश्चित केले आहे. यात रस्त्यांची दुरुस्ती, शेतजमिनीची दुरुस्त...

MB NEWS:*'माझा व्यवसाय माझा हक्क' नोंदणी शिबिराचे अंतिम दोन दिवस शिल्लक !*

इमेज
  *'माझा व्यवसाय माझा हक्क' नोंदणी शिबिराचे अंतिम दोन दिवस शिल्लक !* *_२५ ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करुन अधिकाधिक लाभ घ्यावा- लक्ष्मण पौळ, बाजीराव भैय्या धर्माधिकारी_*   परळी वैजनाथ, प्रतिनिधी..             मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत बिझनेस आॅन व्हील संबंधित उपक्रम नोंदणी शिबिराचा शुभारंभ राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीडचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे. रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी 'माझा व्यवसाय माझा हक्क' शिबिर उपयुक्त ठरणार आहे. नोंदणी साठी अंतिम तारीख २५ आॅक्टोबर आहे. शेवटचे दोन दिवस शिल्लक असुन यामध्ये अधिकाधिक बेरोजगारांनी नोंदणी करावी व लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्षमण पौळ, शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.           ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळीत लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर येथे नोंदणी शिबिर सुरू आहे. बेरोजगारांना रोजगाराच्या विविध संध...

MB NEWS:बीड जिल्हा कोरोना अपडेटस्: आज दि. २३आॅक्ट़ोबर प्राप्त अहवाल....

इमेज
 *बीड जिल्हा कोरोना अपडेटस्: आज दि. २३आॅक्ट़ोबर प्राप्त अहवाल....* जिल्ह्यात ८२ रिपोर्ट पाॅझिटिव्ह. २०९५ अहवाल प्राप्त झाले. *परळीत केवळ ५ रिपोर्ट पाॅझिटिव्ह जिल्ह्यात २०१३ रिपोर्ट निगेटिव्ह. ------------------ *बीड २४, अंबाजोगाई ११, आष्टी ६, धारूर १, गेवराई ८, केज ३, माजलगाव ६, परळी ५ , पाटोदा ७, शिरूर ८ तर वडवणी ३*