इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS:*'माझा व्यवसाय माझा हक्क' नोंदणी शिबिराचे अंतिम दोन दिवस शिल्लक !*

 *'माझा व्यवसाय माझा हक्क' नोंदणी शिबिराचे अंतिम दोन दिवस शिल्लक !*



*_२५ ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करुन अधिकाधिक लाभ घ्यावा- लक्ष्मण पौळ, बाजीराव भैय्या धर्माधिकारी_*


 परळी वैजनाथ, प्रतिनिधी..      

      मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत बिझनेस आॅन व्हील संबंधित उपक्रम नोंदणी शिबिराचा शुभारंभ राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीडचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे. रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी 'माझा व्यवसाय माझा हक्क' शिबिर उपयुक्त ठरणार आहे. नोंदणी साठी अंतिम तारीख २५ आॅक्टोबर आहे. शेवटचे दोन दिवस शिल्लक असुन यामध्ये अधिकाधिक बेरोजगारांनी नोंदणी करावी व लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्षमण पौळ, शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी व पदाधिकाऱ्यांनी केले आहे. 

         ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळीत लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर येथे नोंदणी शिबिर सुरू आहे. बेरोजगारांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने 'माझा व्यवसाय माझा हक्क' शिबिर घेण्यात येत आहे.कोरोनाच्या बिकट परिस्थितीमध्ये बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे या दृष्टिकोनातून आणि स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने ही योजना राबविण्यात येत आहे.परळी मतदार संघातील बेरोजगारांसाठी या योजनेचा अधिकाधिक लाभ मिळावा असा प्रयत्न आहे. या योजनेअंतर्गत विविध व्यवसायांसाठी वाहन,कर्ज उपलब्धी, सबसिडी, आवश्यक वाहने, साधनसामग्रीची व्यवस्था आदींबाबत सबसिडी बरोबरच कर्ज व आर्थिक हातभार लावण्यात येणार आहे. परळी मतदारसंघातील बेरोजगारांसाठी व स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्यांसाठी ही मोठी उपलब्धी आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी शिबिरात आपला व्यवसाय नोंदवावा. अधिकाधिक बेरोजगारांनी नोंदणी करावी व स्वयंरोजगार करावा. नोंदणी शिबिराचे अंतिम दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. २५ ऑक्टोबरपर्यंत अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण पौळ, शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या