पोस्ट्स

MB NEWS: *अर्जुनराव जाहेर पाटील यांच्या निधनाने सहकार क्षेत्राची मोठी हानी - धनंजय मुंडे*

इमेज
 *अर्जुनराव जाहेर पाटील यांच्या निधनाने सहकार क्षेत्राची मोठी हानी - धनंजय मुंडे* बीड (दि.२६) ---- : बीड येथील छत्रपती शाहू नागरी सहकारी बँकेचे संस्थापक, उद्योजक अर्जुनराव जाहेर पाटील यांच्या निधनाने सहकार क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दात राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत.  स्व. अर्जुनराव जाहेर पाटील यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत धनंजय मुंडे यांनी त्यांना श्रध्दांजली अर्पण केली आहे, तसेच आपण पाटील कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचेही आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.  बीड जिल्ह्यासह मराठवड्यातच नव्हे तर राज्यभर छत्रपती शाहू बँकेच्या शाखांचे जाळे अर्जुनराव जाहेर पाटील यांनी विणले. शाळा, आयटीआय आदी उभे करून एका सामान्य गरीब कुटुंबातील व्यक्तीने सहकारसह शिक्षण, उद्योग अशा विविध क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करून अनेकांसमोर एक आदर्श उदाहरण प्रस्थापित केले आहे, अशा व्यासंगी व्यक्तिमत्वाच्या निधनाने जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राची मोठी हानी झाल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.

MB NEWS: *🚩उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते सपत्नीक श्री विठ्ठलाची महापूजा संपन्न*

इमेज
 *🚩उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते सपत्नीक श्री विठ्ठलाची महापूजा संपन्न*  -----------------------------------   सोलापूर/पंढरपूर : कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते सपत्नीक महापूजा संपन्न झाली. पहाटे अडीच वाजता पूजेला सुरुवात झाल्यानंतर 3.30 वाजण्याच्या सुमारास विठ्ठलाच्या लाईव्ह दर्शनासह महापूजेचा हा सोहळा पार पडला. यावेळी, श्री विठ्ठलाच्या शासकीय महापूजेच्या मानाच्या वारकरी दाम्पत्याचा मान कवडुजी नारायण भोयर ( वय ६४) व कुसुमबाई कवडूजी भोयर ( वय ५५ रा.मु.डौलापूर, पो. मोझरी शेकापूर, ता.हिंगणघाट, जि. वर्धा) यांना मिळाला. उपमुख्यमंत्र्यांसमेवत या दाम्पत्यानेही श्री विठ्ठलाची महापूजा केली.   श्री विठ्ठलाच्या महापूजेसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह. भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. कोरोनाचे सावट असल्याने अतिशय कमी मान्यवरांच्या उपस्थितीत यंदाची कार्तिकी एकादशीची महापूजा संपन्न झाली. दरम्यान, यापूर्वी आषाढी एक...

MB NEWS:कार-कँन्टरच्या अपघातात पाच ठार;गेवराई बायपासवरील घटना

इमेज
  कार-कँन्टरच्या अपघातात पाच ठार;गेवराई बायपासवरील घटना  गेवराई : प्रतिनिधी...     कार-कँन्टरच्या भिषण अपघातात पाच जण ठार झाल्याची घटना गेवराई बायपासवर गुरुवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास धुळे-सोलापूर महामार्गावर घडली. मयतामध्ये लातुरचे वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत करत घटनेचा पंचनामा केला.    याबाबत माहिती अशी की, लातूरहून औरंगाबाद कडे निघालेली कार (एम.एच.४६ बी.९७००) हिचे टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटल्याने सदरील कार विरुद्ध साईटला जाऊन उलटली. याच सुमारास औरंगाबादहून बीडकडे निघालेले कँन्टर (जी.जे.१६ ए.यू. २४७५) च्या खाली हि कार आल्याने कार काही अंतर कँन्टरने कारला फरफटत नेले. यामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य तीन गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथोमोपचार करुन बीड जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान या तिघांचाही मृत्यू झाला. मयतामध्ये लातुर...

MB NEWS:कामगार कल्याण मंडळ कर्मचारी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस अनंत जगताप यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन

इमेज
  कामगार कल्याण मंडळ  कर्मचारी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस अनंत जगताप यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन प्रतिनिधी : (औरंगाबाद)   महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कर्मचारी संघटना संलग्न भारतीय कामगार कर्मचारी महासंघ या संघटनेचे प्रदेश सरचिटणीस अनंत जगताप यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन  करण्यात आले आहे. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कर्मचारी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस  अनंत जगताप हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहे. या निमित्ताने शुक्रवार २७ नोव्हेंबर २०२०  रोजी दुपारी २ वाजता  मुंबई येथील कामगार कल्याण मंडळाच्या हुतात्मा बाबू गेनू गिरणी कामगार क्रीडा भवन सेनापती बापट मार्ग येथे कृतज्ञता सोहळा  संपन्न होणार आहे.   या कृतज्ञता सोहळ्याला भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष आमदार भाई जगताप, कामगार कल्याण मंडळ कर्मचारी संघटनेचे मानद सदस्य दिलीप दादा जगताप, कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज ईळवे यांची उपस्थिती राहणार आहे.   अनंत जगताप यांनी पूर्णवेळ व अर्धवेळ कर्मचाऱ्यांच्या हिताचे अ...

MB NEWS:अर्जूनराव जाहेर पाटील यांच्या निधनाने सहकार, शैक्षणिक क्षेत्रातील उमदे व्यक्तिमत्त्व हरपले -* *पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केल्या शोकभावना*

इमेज
 * अर्जूनराव जाहेर पाटील यांच्या   निधनाने सहकार, शैक्षणिक क्षेत्रातील उमदे व्यक्तिमत्त्व हरपले -* *पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केल्या शोकभावना* परळी दि. २६ ------  छत्रपती राजर्षि शाहू अर्बन बँकेचे अध्यक्ष अर्जूनराव जाहेर पाटील यांच्या निधनाने बीड जिल्हयाच्या सहकार व शैक्षणिक क्षेत्रातील उमदे व्यक्तिमत्त्व हरपले आहे अशा शब्दात भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी शोकभावना व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.   जाहेर पाटील यांच्या निधनाची वार्ता समजली, अतीव दुःख झाले. बीड जिल्हयाच्या सहकार, शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रात जाहेर पाटील यांचे कार्य उल्लेखनीय होते. शेतकरी, शेतमजूर व सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नांविषयी त्यांना जिव्हाळा होता. त्यांच्या निधनाने बीड जिल्हा एका उमद्या व्यक्तीमत्वाला मुकला आहे, त्यांच्या निधनाने कोसळलेल्या दुःखात मी व माझा परिवार सहभागी आहे, अशा शोकभावना व्यक्त करून भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली. ••••

MB NEWS: *उद्योजक अर्जुनराव जाहेर पाटील यांचे निधन*

इमेज
 *उद्योजक अर्जुनराव जाहेर पाटील यांचे निधन* बीड : येथील प्रसिध्द उद्योजक अर्जुनराव जाहेर पाटील यांचे दुःखद निधन झाले. अतिशय सामान्य परिस्थितून पुढे येऊन पाटील यांनी उद्योग- व्यवसाय आणि बँकिंग क्षेत्रात मोठा नावलौकिक मिळवला होता. मराठवाड्यातील अग्रगण्य बँक छत्रपती राजर्षी शाहू महाराज बँकेचे ते ससंस्थापक अध्यक्ष होते. मराठवाडा चेंबर्स चे ते अध्यक्ष होते. मराठवाडा शिक्षण प्रासारक मंडळासह अनेक संस्थांमध्ये त्यांनी काम केले. मृत्यू समयी त्यांचे वय 75 वर्षे होते.

MB NEWS: *काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांना परळीत श्रद्धांजली अर्पण !* _*देशाचा धुरंधर नेता हरवला -बाजीरावभैय्या धर्माधिकारी*_

इमेज
 *काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांना परळीत श्रद्धांजली अर्पण !* _*देशाचा धुरंधर नेता हरवला -बाजीराव भैय्या धर्माधिकारी*_ परळी वैजनाथ,प्रतिनिधी...       काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांचे आज (ता.२५) पहाटे तीन वाजता निधन झाले. त्यांना परळीत महाविकास आघाडीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.देशाचा धुरंधर नेता हरवला असल्याची शोकभावना यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी व्यक्त केली.         परळी वैजनाथ येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांच्या निधनाबद्दल शोकसभा घेउन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी,कॉंग्रेसचे शहराध्यक्ष बाबुभाई नंबरदार, नगरसेवक शंकर आडेपवार, विजय भोयटे, अन्वर मिस्किन, जयराज देशमुख, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वैजनाथ सोळंके, रमेश भोयटे, दीपक तांदळे, जमील अध्यक्ष, बशीतभाई, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष सय्यद सिराज, शिवसेनेचे शहर...