MB NEWS: *काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांना परळीत श्रद्धांजली अर्पण !* _*देशाचा धुरंधर नेता हरवला -बाजीरावभैय्या धर्माधिकारी*_

 *काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांना परळीत श्रद्धांजली अर्पण !*



_*देशाचा धुरंधर नेता हरवला -बाजीराव भैय्या धर्माधिकारी*_

परळी वैजनाथ,प्रतिनिधी...

      काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांचे आज (ता.२५) पहाटे तीन वाजता निधन झाले. त्यांना परळीत महाविकास आघाडीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.देशाचा धुरंधर नेता हरवला असल्याची शोकभावना यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी व्यक्त केली.

        परळी वैजनाथ येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांच्या निधनाबद्दल शोकसभा घेउन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी,कॉंग्रेसचे शहराध्यक्ष बाबुभाई नंबरदार, नगरसेवक शंकर आडेपवार, विजय भोयटे, अन्वर मिस्किन, जयराज देशमुख, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वैजनाथ सोळंके, रमेश भोयटे, दीपक तांदळे, जमील अध्यक्ष, बशीतभाई, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष सय्यद सिराज, शिवसेनेचे शहरप्रमुख राजेश विभूते, शिवसेनेचे जिल्हा संघटक रमेश चौंडे,काँग्रेसचे लहुदास तांदळे, विश्वनाथ गायकवाड, शेख अल्ताफ,शेख सिकंदर, जब्बार सेठ, रा.कॉ. नागरिक सेलचे अध्यक्ष के.डी.उपाडे, शिक्षक संघटनेचे शहराध्यक्ष अजय जोशी, देवराव कदम, गिरीश भोसले,लक्ष्मण वाकडे,अमोल कांबळे, शरद पवार विचार मंचचे शहराध्यक्ष श्रीकांत माने, प्रा.सुनिल चव्हाण, डी.जी.शिंदे, नारायण वानखेडे,शेख जफर,आर. आर. भोसले,राहुल ताटे,विनोद देशमुख, प्रदीप कळंबे, राजुभाई, जावेद कुरेशी, शेक सिकंदर,अथर खतीब, फरकुंदअली बेग, प्रा.शाम दासूद,बाळासाहेब हंगरगे,यासिन सय्यद, फारुख मोईन, परवेज आगा,जिया अबरार, जब्बार सर, पटेल सर, सयद बारी सर,योगेश नानावटे,मुश्ताक अली, चंद्रप्रकाश हालगे,उमेश देशमुख,अनिल घेवारे,रामकीशन टेकाळे, प्रल्हाद नखाते आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार