पोस्ट्स

MB NEWS- *पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी थांबून केली आश्रमातील वयोवृद्धांची अस्थेवाईकपणे चौकशी !* • *_घाटनांदुर येथील गुरुदास सेवा आश्रमाच्या वतीने ना.धनंजय मुंडे यांचा सत्कार_* •

इमेज
 *पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी थांबून केली आश्रमातील वयोवृद्धांची अस्थेवाईकपणे चौकशी !* • *_घाटनांदुर येथील गुरुदास सेवा आश्रमाच्या वतीने ना.धनंजय मुंडे यांचा सत्कार_* • परळी वैजनाथ, प्रतिनिधी...      नेहमीच आश्रमातील वयोवृद्धांना सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्वत: आत्मियतेने लक्ष घालणारे राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीडचे पालकमंत्री ना धनंजय मुंडे यांनी आज (दि.६) घाटनांदुर रस्त्यावरील गुरुदास सेवा आश्रमातील वयोवृद्धांची थांबून अस्थेवाईकपणे चौकशी केली. यावेळी गुरुदास सेवा आश्रमाच्या वतीने ना.धनंजय मुंडे यांचा सत्कार करण्यात आला.      वंदनीय राष्ट्रसंतश्री तुकडोजी महाराज यांच्या विचारसरणी अनुसार चालत असणारे घाटनांदूर येथील गुरुदास सेवाश्रमाशी नेहमीच ना.धनंजय मुंडे यांची आत्मियता दिसुन येते. आज (दि.६) ना.धनंजय मुंडे यांनी आश्रमातील वृद्ध महिला पुरुषांच्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे चौकशी केली. तसेच गुरूदास सेवाश्रमास सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. यावेळी आश्रमातील वयोवृद्धांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची...

MB NEWS-आदर्श शिक्षक महालिंग अप्पा फुटके गुरुजी यांच्या पंचाहत्तरी निमित्त ग्रंथतुला व गौरव समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न*

इमेज
 * आदर्श शिक्षक महालिंग अप्पा फुटके गुरुजी यांच्या पंचाहत्तरी निमित्त ग्रंथतुला व गौरव समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न* परळी वैजनाथ दि.०६ (प्रतिनिधी)     तालुक्यातील गाढे पिंपळगाव येथील निवृत्त आदर्श शिक्षक महालिंगअप्पा फुटके यांच्या पंचाहत्तरी निमित्त ग्रंथतुला व गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी (ता.०६) मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रंथतुला व गौरव सोहळा उत्साहात पार पडला.               गाढे पिंपळगाव येथील विवेकानंद विद्यालयातील सहशिक्षक महालिंगअप्पा फुटके गुरुजी यांच्या पंचाहत्तरी निमित्त मित्रमंडळी व परिवाराच्या वतीने ग्रंथतुला व अमृतमहोत्सवाचे आयोजन रविवारी (ता.०५) वैद्यनाथ मंदिर परिसरातील दर्शन मंडप कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला फुटके गुरुजी यांचे परिवारातील सुवासिनी महिलांनी ७५ दिव्यांनी औक्षण केले. त्यानंतर धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक ग्रंथाची फुटके गुरुजी यांच्या वजना ऐवढी (८० किलो) ग्रंथतुला करण्यात आल्यानंतर गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेख...

MB NEWS- *परळीच्या अंजली रुद्रवार चे सीए परीक्षेतील यशाबद्दल आर्यवैश्य समाजातर्फे सत्कार*

इमेज
 *परळीच्या अंजली रुद्रवार चे सीए परीक्षेतील यशाबद्दल आर्यवैश्य समाजातर्फे सत्कार* परळी वैजनाथ - परळी शहरातील अंजली मिलींद रुद्रवार या विद्यार्थिनीने सीए परीक्षेत सुयश मिळवले आहे.तिने मिळवलेल्या या यशाबद्दल आर्यवैश्य समाजातर्फे तिचा छोटेखानी सत्कार करण्यात आला.समाजातील विश्वस्त मंडळीने सत्कार करुन अंजलीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सीए परीक्षा उत्तीर्ण झालेल्या अंजली रुद्रवार हिचे प्राथमिक शिक्षण परळीतील फाउंडेशन स्कूल येथे झाले आहे.तर उच्च शीक्षण पुणे येथील सिम्बॉऐसेस काॅलेज मध्ये काॅमर्स विषयात पदवी मिळवलेली आहे.तिने सीए परिक्षेत 800 पैकी 419 गुण मिळवुन उत्तीर्ण झाली आहे.तिच्या या कामगीरी बद्दल सर्व स्तरातुन तिचे काैतुक होत आहे. या सत्कार प्रसंगी आर्य वैश्य समाजातील विश्वस्त अनिल रूद्रवार,रमाकांत कौलवर,श्रीनिवास रूद्रवार,रामकिशन देवशटवार,अय्या,अरुण गडगुळ,दत्तात्रय रूद्रवार,वैजनाथ झरकर,नागनाथ परसेवार हे उपस्थित होते.अंजली रुद्रवार ही परळी आर्य वैश्य समाजातील पहिली सीए परीक्षा उत्तीर्ण झाल्याने उपस्थित बांधवांनी कौतुक करून तिला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.अंजलीच्या यशाबद्दल...

MB NEWS- *तीर्थक्षेत्र विकास योजनेतील प्रस्तावित कामांचे ना.धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत रविवारी चित्रफीतीद्वारे सादरीकरण*

इमेज
 *तीर्थक्षेत्र विकास योजनेतील प्रस्तावित कामांचे ना.धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत रविवारी चित्रफीतीद्वारे सादरीकरण* परळी दि 6......... : बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या प्रभु वैद्यनाथाच्या परिसराचा 133.58 कोटी रूपयांचा विकास आराखडा राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालक मंत्री ना.धनंजय मुंडे साहेबांच्या विशेष प्रयत्नाने मंजुर झाला असुन या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामधुन वैद्यनाथ मंदिर परिसराचा कायापालट होणार आहे. या योजनेतील प्रस्तावित कामांचे सादरीकरण ना.धनंजय मुंडे साहेब यांच्या उपस्थितीत रविवार, दि. 07 फेब्रुवारी रोजी दर्शन मंडप येथे होणार आहे. परळी शहराची ओळख असलेल्या प्रभु वैद्यनाथाच्या परिसराचा धार्मिक कार्या बरोबरच सर्वागीण विकास व्हावा यासाठी ना.धनंजय मुंडे साहेब यांच्या विशेष प्रयत्नाने 133.58 कोटी रूपयांचा विकास आराखडा मंजुर झाला असुन या योजनेतुन वैद्यनाथ मंदिराच्या परिसरातील सर्व तीर्थ, सुसज्य भक्त निवास, वैद्यनाथ देवल कमिटीच्या अधिपत्याखालील मंदिरांचा विकास तसेच डोंगर तुकाई, कालरात्री देवी मंदिर परिसराचा विकास करण्यात येणार आहे.  ती...

MB NEWS-संभाजी ब्रिगेड परळी तालुका सचिव पदी शिवश्री प्रभाकर सटाले तर संघटक पदी शिवश्री विनोद सरवदे यांची निवड*

इमेज
 * संभाजी ब्रिगेड परळी तालुका सचिव पदी शिवश्री प्रभाकर सटाले तर संघटक पदी शिवश्री विनोद सरवदे यांची निवड* परळी वैजनाथ (प्रतिनिधी)- संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवश्री मनोजदादा आखरे महासचिव शिवश्री सौरभ दादा खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात संभाजी ब्रिगेड ची घोडदौड चालू असून त्याचाच एक भाग म्हणून संभाजी ब्रिगेडचे बीड जिल्हा पूर्व अध्यक्ष शिवश्री प्रवीण ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली व संभाजी ब्रिगेडचं आक्रमक नेतृत्व परळी वै. तालुकाध्यक्ष शिवश्री देवराव लुगडे महाराज यांच्या नेतृत्वा खाली संभाजी ब्रिगेडच्या परळी तालुका सचिव पदी राष्ट्रवादीचे तडोळी ग्रामपंचायत सदस्य  शिवश्री प्रभाकर उद्धवराव सटाले यांनी संभाजी ब्रिगेड मध्ये मंगळवार 02 फेब्रुवारी रोजी परळी येथे झालेल्या संभाजी ब्रिगेड कार्यकर्ता मेळाव्यामध्ये प्रवेश केला व त्याच कार्यक्रमात त्यांची संभाजी ब्रिगेड परळी तालुका सचिव पदी निवड करण्यात आली . तसेच तालुका संघटक पदी करेवाडीचे शिवश्री विनोद सरवदे यांची निवड करण्यात आली आहे. दोघांच्या निवडीबद्दल संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष शिवश्री सेवकराम जाधव, संभाजी ब्रिगेड विद्य...

MB NEWS- *धनंजय मुंडेंचे नाथऱ्याला वेलकम गिफ्ट! शनिवारी दोन कोटी तीस लाख रुपयांच्या कामांचे लोकार्पण*

इमेज
 *धनंजय मुंडेंचे नाथऱ्याला वेलकम गिफ्ट! शनिवारी दोन कोटी तीस लाख रुपयांच्या कामांचे लोकार्पण* *आणखी पाच कोटींच्या कामांचे भूमिपूजन, गावकरी करणार भूमीपुत्राचा नागरी सत्कार* परळी (दि. ०५) ---- : राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्यात दौऱ्यावर असून, शनिवारी ते जन्मगाव नाथरा येथे विविध विकास कामांच्या लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रमासाठी येणार आहेत. यावेळी नाथ्र्याच्या ग्रामस्थांकडून आपल्या लाडक्या भूमीपुत्राचा भव्य नागरी सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे गटनेते अजय मुंडे यांनी दिली आहे.  या वेळी धनंजय मुंडे यांच्या हस्ते नाथरा (पांढरी) येथील सव्वा कोटी रुपयांचा उच्चालक बंधारा, नाली, प्रवासी निवास, स्मशानभूमी कंपाउंड, सार्वजनिक वाचनालय, शाळेतील कंपाउंड, विविध ठिकाणचे पेव्हर ब्लॉक असे एकूण दोन कोटी तीस लाख रुपयांच्या कामांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. तर नाथरा गावातील सव्वा कोटी रुपये किमतीचा बंधारा, देशमुख टाकळी येथील सव्वा कोटी रुपयांचा बंधारा, दीड कोटी रुपये खर्चून प्राथमिक आरोग्य केंद्राचे दु...

MB NEWS- *गाव सुंदर करण्याचा टोकवाडी ग्रामस्थांनी केला निर्धार; 'माझं गाव -सुंदर गाव' अभियानाचा टोकवाडी येथे शुभारंभ*

इमेज
 *गाव सुंदर करण्याचा टोकवाडी ग्रामस्थांनी केला निर्धार; 'माझं गाव -सुंदर गाव' अभियानाचा टोकवाडी येथे शुभारंभ* परळी वैजनाथ, प्रतिनिधी...          प्रत्येक सार्वजनिक कार्यात आपल्या सामाजिक जाणिवा दर्शवत काम करणाऱ्या आणि सामाजिक उपक्रमांची जोड देत गावाच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय असलेल्या टोकवाडी ग्रामपंचायतीने स्वच्छतेच्या कामातह आपला ठसा उमटविलेला आहे.संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात बीड जिल्ह्यातून टोकवाडी ग्रामपंचायतने द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे.या पार्श्वभूमीवर आपले गाव आणखी सुंदर करण्याचा टोकवाडी ग्रामस्थांनी निर्धार केला असुन 'माझं गाव -सुंदर गाव' अभियानाचा टोकवाडी येथे दि.४ रोजी शुभारंभ करण्यात आला.          'माझं गाव -सुंदर गाव' या अभियानासाठी परळी तालुक्यातून टोकवाडी, गाढे पिंपळगाव व देशमुख टाकळी या तीन गावाची निवड करण्यात आली आहे. त्याअंतर्गत 'माझं गाव -सुंदर गाव' अभियानाचा शुभारंभ टोकवाडी येथे मान्यवरांच्या हस्ते झाला.यावेळी पंचायत समितीचे सभापती श्री बालाजी मुंडे, बीडीओ संजय केंद्रे , गावच्या सरपंच गोदावरी राजाराम ...