इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS- *धनंजय मुंडेंचे नाथऱ्याला वेलकम गिफ्ट! शनिवारी दोन कोटी तीस लाख रुपयांच्या कामांचे लोकार्पण*

 *धनंजय मुंडेंचे नाथऱ्याला वेलकम गिफ्ट! शनिवारी दोन कोटी तीस लाख रुपयांच्या कामांचे लोकार्पण*



*आणखी पाच कोटींच्या कामांचे भूमिपूजन, गावकरी करणार भूमीपुत्राचा नागरी सत्कार*


परळी (दि. ०५) ---- : राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्यात दौऱ्यावर असून, शनिवारी ते जन्मगाव नाथरा येथे विविध विकास कामांच्या लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रमासाठी येणार आहेत. यावेळी नाथ्र्याच्या ग्रामस्थांकडून आपल्या लाडक्या भूमीपुत्राचा भव्य नागरी सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे गटनेते अजय मुंडे यांनी दिली आहे.

 या वेळी धनंजय मुंडे यांच्या हस्ते नाथरा (पांढरी) येथील सव्वा कोटी रुपयांचा उच्चालक बंधारा, नाली, प्रवासी निवास, स्मशानभूमी कंपाउंड, सार्वजनिक वाचनालय, शाळेतील कंपाउंड, विविध ठिकाणचे पेव्हर ब्लॉक असे एकूण दोन कोटी तीस लाख रुपयांच्या कामांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. तर नाथरा गावातील सव्वा कोटी रुपये किमतीचा बंधारा, देशमुख टाकळी येथील सव्वा कोटी रुपयांचा बंधारा, दीड कोटी रुपये खर्चून प्राथमिक आरोग्य केंद्राचे दुरुस्तीकरण, आदी विविध अंदाजे पाच कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन ना. मुंडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी आ. संजय दौंड, जि. प. अध्यक्षा सौ. शिवकन्या ताई सिरसाट, जि. प. उपाध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे, जि. प. गटनेते अजय मुंडे, पंचायत समिती सभापती बालाजी (पिंटू) मुंडे आदी उपस्थित राहणार आहेत.

 यावेळी नाथऱ्याच्या ग्रामस्थांच्या वतीने आपल्या लाडक्या भूमीपूत्राचे जोरदार स्वागत करण्यात येणार आहे, अशी माहिती स्वागत समितीच्या वतीने देण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट