MB NEWS- *परळीच्या अंजली रुद्रवार चे सीए परीक्षेतील यशाबद्दल आर्यवैश्य समाजातर्फे सत्कार*

 *परळीच्या अंजली रुद्रवार चे सीए परीक्षेतील यशाबद्दल आर्यवैश्य समाजातर्फे सत्कार*




परळी वैजनाथ - परळी शहरातील अंजली मिलींद रुद्रवार या विद्यार्थिनीने सीए परीक्षेत सुयश मिळवले आहे.तिने मिळवलेल्या या यशाबद्दल आर्यवैश्य समाजातर्फे तिचा छोटेखानी सत्कार करण्यात आला.समाजातील विश्वस्त मंडळीने सत्कार करुन अंजलीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


सीए परीक्षा उत्तीर्ण झालेल्या अंजली रुद्रवार हिचे प्राथमिक शिक्षण परळीतील फाउंडेशन स्कूल येथे झाले आहे.तर उच्च शीक्षण पुणे येथील सिम्बॉऐसेस काॅलेज मध्ये काॅमर्स विषयात पदवी मिळवलेली आहे.तिने सीए परिक्षेत 800 पैकी 419 गुण मिळवुन उत्तीर्ण झाली आहे.तिच्या या कामगीरी बद्दल सर्व स्तरातुन तिचे काैतुक होत आहे.


या सत्कार प्रसंगी आर्य वैश्य समाजातील विश्वस्त अनिल रूद्रवार,रमाकांत कौलवर,श्रीनिवास रूद्रवार,रामकिशन देवशटवार,अय्या,अरुण गडगुळ,दत्तात्रय रूद्रवार,वैजनाथ झरकर,नागनाथ परसेवार हे उपस्थित होते.अंजली रुद्रवार ही परळी आर्य वैश्य समाजातील पहिली सीए परीक्षा उत्तीर्ण झाल्याने उपस्थित बांधवांनी कौतुक करून तिला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.अंजलीच्या यशाबद्दल वडील मिलिंद रुद्रवार व काका महेश रुद्रवार ,राजेश रुद्रवार यांनी समाधान व्यक्त केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !