पोस्ट्स

MB NEWS-स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अपमानास्पद फेसबुक पोस्ट !* *_ गुन्हा दाखल करण्याची परळीत सावकरप्रेमींची मागणी_*

इमेज
 * स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अपमानास्पद फेसबुक पोस्ट !*  *_ गुन्हा दाखल करण्याची परळीत सावकरप्रेमींची मागणी_* परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....       स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या बद्दल आज ऐन स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथी दिवशी (दि.२६) अपमानास्पद फेसबुक वर पोस्ट केल्याप्रकरणी परळीतील सावरकर प्रेमींनी रोष व्यक्त केला. या प्रकाराचा सर्वस्तरातून जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकर व अन्य महापुरुषां बद्दल अपमानास्पद मते ,आक्षेपार्ह टिप्पणी करुन सामाजिक शांतता भंग करणाऱ्या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी मागणी एका निवेदनाद्वारे पोलिसांकडे करण्यात आली आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक स्वाती भोर व पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांची भेट घेऊन हे निवेदन सादर करण्यात आले.         परळी शहर पोलीस ठाण्यात याबाबत निवेदन देऊन तातडीने गुन्हा दाखल करावा अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. आपला रोष व्यक्त करत याप्रकरणी संबंधित इसमावर कारवाई करावी अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. प...

MB NEWS-वैद्यनाथ साखर कारखान्याने केले दोन लाख मेट्रिक टन उसाचे गाळप

इमेज
  वैद्यनाथ साखर कारखान्याने केले  दोन लाख मेट्रिक टन उसाचे गाळप परळी वैजनाथ (प्रतिनिधी) पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने दोन लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकरी व नागरीकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.       अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आणि अनेक अडचणींवर मात करीत कारखान्याच्या अध्यक्षा, माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यनाथ कारखाना चालू झाला आहे. ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगार यांचे हीत लक्षात घेऊन वैद्यनाथ कारखाना सुरू करण्यात आला असुन यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण दुर झाली आहे. आर्थिक आणि नैसर्गिक आपत्तीमुळे वैद्यनाथ कारखाना अडचणीत आला होता. मात्र माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांनी यावर्षी कारखाना सुरू करून यशस्वीरित्या चालू केला आहे.      वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने सन 2020-21 या गळीत हंगामात दिनांक 25 फेब्रुवारीपर्यंत 2 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले असुन 1 लाख 75 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे तर सरासरी साखर उतारा 10. 44 टक्के असल्याचे कारखान्याच्या वतीने सांगण्यात आले. ...

MB NEWS-दयानंद व्यायाम शाळेचा पैलवान नितीन मुंडे जिल्ह्यात द्वितीय

इमेज
  दयानंद व्यायाम शाळेचा पैलवान नितीन मुंडे जिल्ह्यात द्वितीय * परळी (प्रतिनिधी):- महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धे निमित्य बीड जिल्हा कुस्ती निवड चाचणीत परळी वैजनाथ येथील दयानंद व्यायाम शाळेचा पैलवान नितीन व्यंकटराव मूंडे हा द्वितीय क्रमांक मिळवून यशस्वी झाला आहे ‌. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी बीड जिल्हा कुस्तीगीर परिषदेने आयोजित केलेल्या जिल्हा निवड चाचणी आहेरचिंचोली येथे घेण्यात आली. या निवड चाचणीत 74 किलो वजन गटात तिसऱ्या फेरी अंतीम कुस्ती मध्ये परळी वैजनाथ येथील महर्षी दयानंद व्यायाम शाळेचा पैलवान नितीन व्यंकटराव मुंडे यांनी दुसरा क्रमांक पटकावला आहे. या त्याच्या यशाबद्दल परळी येथील दयानंद व्यायाम शाळेचे अध्यक्ष श्री देविदास राव कावरे सर,मार्गदर्शक सुभाष नाणेकर सर,शिव शंकर कराड,प्रशिक्षक प्रा.अतुल दुबे सर प्रा.डॉ जगदीश कावरे सर यांच्या सह परळी तालुक्यातील कुस्ती प्रेमिनी अभिनंदन केले आहे.

MB NEWS-उद्या शुक्रवारी बीड जिल्हा बंदची व्यापार्यांची हाक

इमेज
  उद्या शुक्रवारी बीड जिल्हा बंदची व्यापार्यांची हाक बीड (प्रतिनिधी) केंद्र सरकार जीएसटीच्या माध्यमातून पुन्हा एकदा मागच्या दाराने इन्स्पेक्टर राज आणण्याचा प्रयत्न करत आहे. जीएसटी कायद्यातील जाचक अटी व तरतुदीचा निषेध करत येत्या 26 फेब्रुवारी रोजी भारत व्यापार बंदमध्ये सर्व व्यापारी संघटना सामील झाल्या आहेत. दरम्यान या बंदला बीड जिल्हा व्यापारी महासंघासह बीड शहर व्यापारी महासंघानेही जाहीर पाठींबा दिला असून व्यापार्‍यांनी शुक्रवारी आपली दुकाने बंद ठेवून बंद यशस्वी करावा असे आवाहन व्यापारी महासंघाच्या सर्व पदाधिकार्‍यांनी केले आहे. भारत बंदसंबंधी व्यापार्‍यांशी चर्चा करण्यासाठी बुधवारी (दि.24) बीड येथे एमआयडीसीतील मॉ वैष्णो पॅलेसमध्ये बीड जिल्हा व शहर व्यापारी महासंघाची व्यापक बैठक घेण्यात आली. यावेळी सीए भानुदास जाधव व सीए गोपाल लड्डा यांनी मार्गदर्शन केले. जीएसटी कायद्याचा मसुद्यात असलेल्या जटिल तरतुदी व जाचक अटीच्या विरोधात 26 फेब्रुवारी शुक्रवार रोजी भारत व्यापार बंदचे आवाहन कॉनफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स केले आहे त्यास बीड शहर व जिल्हा व्यापारी महासंघाने पाठिंबा दिला आहे. या भा...

MB NEWS-आमच्या परळीचे भुमिपुत्र भुजंगराव कुलकर्णी यांचे कार्य सदैव स्मरणात राहील - धनंजय मुंडे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली शोकभावना

इमेज
  आमच्या परळीचे भुमिपुत्र भुजंगराव कुलकर्णी यांचे कार्य सदैव स्मरणात राहील - धनंजय मुंडे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली शोकभावना परळी वैजनाथ दि.२४ (प्रतिनिधी )            परळी तालुक्याचे भुमिपुत्र भुजंगराव कुलकर्णी यांचे वयाच्या १०४ व्या वर्षी निधन झाले.मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या विकासाबद्दल जागरुकपणे कर्तव्य बजावलेले आणि राज्याच्या जडणघडणीचे साक्षीदार असलेले निवृत्त सनदी अधिकारी हरवले आहेत.आमच्या परळीचे भुमिपुत्र असलेल्या भुजंगराव कुलकर्णी यांचे कार्य सदैव स्मरणात राहील या शब्दात बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी शोकभावना व्यक्त केली आहे. परळी तालुक्यातील गाढे पिंपळगाव येथील भुमिपुत्र असलेल्या भुजंगराव कुलकर्णी यांच्या निधनाबद्दल शोकभावना व्यक्त करताना राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीडचे पालकमंत्री ना धनंजय मुंडे यांनी स्व.भुजंगराव कुलकर्णी यांच्या समवेत खा. शरद पवार व खा.सुप्रिया सुळे संवाद साधत असतानाच्या छायाचित्रासह ट्विट करून श्रद्धांजली अर्पण केली आहे.         ...

MB NEWS-भुजंगराव कुलकर्णी यांच्या निधनाने मराठवाडयाच्या विकासाची तळमळ असणारे व्यक्तिमत्त्व हरपले* *_पंकजाताई मुंडे यांची भावपूर्ण श्रध्दांजली_*

इमेज
 * भुजंगराव कुलकर्णी यांच्या निधनाने मराठवाडयाच्या विकासाची तळमळ असणारे व्यक्तिमत्त्व हरपले* *_पंकजाताई मुंडे यांची भावपूर्ण श्रध्दांजली_* परळी । दिनांक २४ । माजी सनदी अधिकारी तथा परळीचे भूमिपुत्र भुजंगराव कुलकर्णी यांच्या निधनाने मराठवाडयाच्या विकासाची तळमळ असणारे व्यक्तिमत्त्व हरपले आहे, अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली. मराठवाडयातील पहिले आयएएस अधिकारी, वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि माझ्या परळी तालुक्याचे भूमिपुत्र गाढे पिंपळगाव येथील मुळ रहिवासी असलेले भुजंगराव कुलकर्णी यांच्या दुःखद निधनाची बातमी समजली. अतीव दुःख झाले, मराठवाडयाच्या विकासाची तळमळ असणारे व्यक्तीमत्व हरपले, त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली अशा शब्दांत पंकजाताई मुंडे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. ••••

MB NEWS-मराठवाड्यातील पहिले सनदी अधिकारी परळी तालुक्याचे भुमिपुत्र भुजंगराव कुलकर्णी यांचे निधन राज्याच्या जडणघडणीचे साक्षीदार असलेले निवृत्त सनदी अधिकारी हरवल्याची सर्वस्तरातून शोकभावना

इमेज
  मराठवाड्यातील पहिले सनदी अधिकारी परळी तालुक्याचे भुमिपुत्र भुजंगराव कुलकर्णी यांचे निधन राज्याच्या जडणघडणीचे साक्षीदार असलेले निवृत्त सनदी अधिकारी हरवल्याची सर्वस्तरातून शोकभावना परळी वैजनाथ, प्रतिनिधी :             मराठवाड्यातील पहिले सनदी अधिकारी व परळी तालुक्याचे भुमिपुत्र भुजंगराव कुलकर्णी यांचे वयाच्या १०४ व्या वर्षी निधन झाले.मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या विकासाबद्दल जागरुकपणे कर्तव्य बजावलेले आणि राज्याच्या जडणघडणीचे साक्षीदार असलेले निवृत्त सनदी अधिकारी हरवल्याची सर्वस्तरातून शोकभावना व्यक्त होत आहे.            भुजंगराव आप्पाराव कुलकर्णी यांचा जन्म परळी तालुक्यातील पिंपळगाव (गाढे) या गावी एका शेतकरी कुटुंबात झाला. १९३२ ला औरंगाबाद येथून ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. १९३४ ला वयाच्या १७ व्या वर्षी त्यांचे लग्न झाले. १९३६ साली हैदराबाद येथून ते प्रथम क्रमांकाने बी.एस्सी. उत्तीर्ण होऊन त्यांनी उस्मानिया विद्यापीठाचे सुवर्णपदक पटकावले. १९३८ साली ते ह्याच विद्यापीठातून भौतिकशास्त्रामध्ये एम.एस्सी प्रथम क्...