पोस्ट्स

MB NEWS -पत्रकार विश्वास महाराज पांडे यांचे निधन

इमेज
पत्रकार विश्वास महाराज पांडे यांचे निधन परळी वैजनाथ दि. 17..      मराठवाडा साथीचे वृत्तसंपादक तथा ह. भ. प. विश्वास महाराज पांडे यांचे आज शनीवारी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 70 वर्षे होते.       विश्वास महाराज पांडे हे अखंड हरिनाम सप्ताहात प्रवचन करत असत त्यामुळे त्यांना सर्वत्र पांडे महाराज म्हणून ओळखत असत. विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यात ते सहभागी होत असत. विशेष म्हणजे ते ह.भ. प.अर्जुन महाराज लाड (गुरुजी ) यांचे ते शिष्य होते. गेल्या काही दिवसांपासून ते किरकोळ आजारी होते. त्यातच आज शनिवार दि. 17 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजण्याचे सुमारास दस्तापुर येथिल जवाईच्या  राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली.        स्व. विश्वास महाराज पांडे यांच्या पार्थिवावर आज  सायंकाळी 6 वाजता दस्तापुर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.     स्व. विश्वास महाराज पांडे यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, जावई, नातवंडे, असा भरगच्च परिवार आहे.त्यांच्या वर कोसळल्या दुःखात एमबी न्युज परिवार सहभागी आहेत

MB NEWS -तलफ लय बेक्कार रे $$$$$ .......! चक्क टरबूजातून कोरोना रुग्णांना खर्रा पार्सल पाठविण्याचा प्रकार

इमेज
  तलफ लय बेक्कार रे $$$$$ .......! चक्क टरबूजातून कोरोना रुग्णांना खर्रा पार्सल पाठविण्याचा प्रकार यवतमाळ :  यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कोरोना उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांची तलफ भागविण्यासाठी रुग्णांच्याच नातलगांनी टरबूज फोडून त्याच्या आत खर्रा पार्सल पाठविण्याचा प्रकार उघडकीस आला. तर काही नातलगांनी विदेशी मद्यसुद्धा पुरविण्याचा प्रयत्न काल गुरुवारी केला होता. मात्र, वैद्यकीय महाविद्यालयात तैनात असलेल्या सुरक्षा रक्षक आणि डॉक्टर यांच्या सतर्कमुळे हा प्रयत्न हाणून पाडला.         कोरोना रुग्णांना उपचारासाठी दाखल केल्यानंतर काही दिवसांनी ते रुग्ण उपचार घेतल्यानंतर बऱ्यापैकी धोक्यातून बाहेर आलेले असतात. त्यानंतर त्यांना आयसोलेशन वार्डमध्ये दाखल करण्यात येते. त्याच ठिकाणी असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी हा अजब प्रकार शौकीनांची तलफ भागविण्यासाठी केला. मात्र, हा सर्व प्रयत्न वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टर आणि सुरक्षा रक्षकांनी हाणून पाडला. यवतमाळच्या शासकीय रुग्णालयातील या प्रकारामुळे आर्श्चय व्यक्त केले जात आहे.

MB NEWS -आजच्या अहवालात 1005 जण कोरोना पॉझिटिव्ह ! विकेंड लाॅकडाउनचे काटेकोर पालन करा - तहसीलदार शेजूळ यांचे आवाहन

इमेज
  आजच्या अहवालात 1005  जण कोरोना पॉझिटिव्ह ! विकेंड लाॅकडाउनचे काटेकोर पालन करा - तहसीलदार शेजूळ यांचे आवाहन परळी – दि 15 प्रतिनिधी जिल्ह्यात शुक्रवार दि 16 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील  3655 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 1005  जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर  2650 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण अंबाजोगाई 142,आष्टी 168,बीड 348,गेवराई 67 माजलगाव 60,परळी 29, धारूर 29, केज 98, शिरूर 21 पाटोदा 21, वडवणी 22 परळी शहरात शुक्रवारी केवळ एक रुग्ण तर ग्रामीण भागात 28 रुग्ण आढळून आले अंबाजोगाई शहरात दररोज द्विशतक पूर्ण होत असताना शुक्रवारी 142 रुग्ण आढळून आल्याने समाधानकारक परिस्थिती पहावयास मिळाली. यातच शनिवार व रविवार रोजी विकेंड लॉक डाऊन असल्याने परळी शहर व तालुक्यातील व्यापारीवर्गांनी फक्त दवाखाने व मेडिकल दुकान वगळता सर्व व्यवहार बंद ठेऊन लॉकडाऊन पाळावा असे आवाहन परळी तहसील चे तहसीलदार सुरेश शेजुळ यांनी केले आहे

MB NEWS -निवृत्त पोस्टमन रावसाहेब आंधळे यांचे निधन ह. भ. प. अॅड. दत्ता महाराज, शिक्षण सभापती गोपाळ आंधळे यांना पितृशोक

इमेज
  निवृत्त पोस्टमन रावसाहेब आंधळे यांचे  निधन ह. भ. प. अॅड. दत्ता महाराज, शिक्षण सभापती गोपाळ आंधळे यांना पितृशोक परळी वैजनाथ दि. १६..      ह. भ. प. दत्ता महाराज व परळी नगर परिषदेचे शिक्षण सभापती गोपाळ आंधळे यांचे वडील, निवृत्त पोस्टमन रावसाहेब आंधळे यांचे आज शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ७१ वर्षे होते.       मुळचे मरळवाडी येथील रहिवासी असलेले रावसाहेब आंधळे यांनी पोस्ट खात्यात अतिशय प्रामाणिक सेवा केल्याने त्यांचा सर्वत्र चांगला परिचय होता. विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यात ते सहभागी होत असत. पोस्टात येणाऱ्या प्रत्येकाशी अतिशय आपुलकीने वागणूक असायची. त्यामुळे त्यांच्याबद्दल आदर आणि आपुलकी वाटत असे. गेल्या काही दिवसांपासून ते किरकोळ आजारी होते. त्यातच आज शुक्रवार दि. १६ एप्रिल रोजी दुपारी २ वाजण्याचे सुमारास कृष्णा नगर मधील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली.        स्व. रावसाहेब आंधळे यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात सायंकाळी परळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय,...

MB NEWS - *बीड जिल्हयात रेमडेसिवर आणि कोरोना लसीचा तुटवडा ; बीडच्या सत्ताधाऱ्यांना फक्त माफियांचं हित माहिती - पंकजाताई मुंडे यांचं आरोग्यमंत्र्यांना पत्र*

इमेज
 *बीड जिल्हयात रेमडेसिवर आणि कोरोना लसीचा तुटवडा ; बीडच्या सत्ताधाऱ्यांना फक्त माफियांचं हित माहिती - पंकजाताई मुंडे यांचं आरोग्यमंत्र्यांना पत्र* मुंबई । दिनांक १६। बीड जिल्हयात कोरोनाची स्थिती गंभीर बनली असताना रेमडेसिवर आणि कोरोना लसींचा मोठया प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे. अशातच राज्य सरकारने बीडला केवळ २० डोस दिले आहेत, यासंदर्भात भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आरोग्यमंत्र्यांना पत्र पाठवून खेद व्यक्त केला आहे. दरम्यान, बीडमध्ये सत्ताधाऱ्यांना  फक्त माफियांचं हित माहित आहे, जनतेच्या हितासाठी आम्ही लढण्यास तयार आहोत असेही त्यांनी म्हटले आहे.   सध्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून बीडमध्ये परिस्थिती चिंताजनक बनली आहे. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार जिल्हयात आतापर्यंत ७२९ कोरोना पाॅझेटिव्ह रूग्णांचा मृत्यू झाला आहे तर बाधितांची संख्या ३५ हजाराच्या आसपास गेली आहे.  एकीकडे आरोग्य यंत्रणा पुर्ण ताकदीने रूग्णांना मदत करण्यासाठी अहोरात्र काम करत असताना दुसरीकडे कोरोना रूग्णांसाठी लागणाऱ्या रेमडेसिवरचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे, रूग्ण ...

MB NEWS-जगदीश घेवारे यांना पत्नीशोक; सौ.वंदना घेवारे यांचे निधन

इमेज
  जगदीश घेवारे यांना पत्नीशोक; सौ.वंदना घेवारे यांचे निधन                    परळी (प्रतिनिधी)- येथील बसवेश्वर कॉलनीतील रहिवाशी जगदीश रामेश्वरअप्पा  घेवारे यांची पत्नी सौ. वंदना जगदीश घेवारे  यांचे दिर्घ आजाराने शुक्रवारी पहाटे 5 वाजता निधन झाले.मृत्यूसमयी त्या 52 वर्षाच्या होत्या. त्यांच्या पार्थिवदेहावर आज दुपारी 2 वाजता वीरशैव स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्या मनमिळाऊ व धार्मिक प्रवृत्तीच्या असल्याने सर्वपरिचित होत्या.त्यांच्या पश्चात पती , दोन मुली, 1 मुलगा असा  परिवार आहे. दै. परळी प्रहारचे कॉम्प्युटर ऑपरेटर शिवराज घेवारे यांच्या त्या मातोश्री होत्या.

MB NEWS-पोहनेरच्या अवैध वाळू उपसा प्रकरणी खा. डाॅ. प्रितमताई मुंडेंनी अधिकाऱ्यांना घेतले फैलावर!* *परळीत उपोषणार्थींची घेतली भेट ; लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे*

इमेज
 * पोहनेरच्या अवैध वाळू उपसा प्रकरणी खा. डाॅ. प्रितमताई मुंडेंनी अधिकाऱ्यांना घेतले फैलावर!*  *परळीत उपोषणार्थींची घेतली भेट ; लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे* परळी । दिनांक १५। पोहनेर येथील गोदावरी गंगा पात्रातून राजरोसपणे वाळूचा मोठया प्रमाणावर अवैध उपसा करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करा अन्यथा परिणामांना सामोरे जा अशा कडक शब्दांत तंबी देत खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी आज महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. याप्रकरणात कठोर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर खा. प्रितमताईंच्या मध्यस्थीने ग्रामस्थांनी आपले उपोषण मागे घेतले.   पोहनेर येथील  गोदावरी गंगा पात्रातून गेल्या कांही महिन्यांपासून उघडपणे मोठया प्रमाणावर अवैध वाळू उपसा होत आहे. शासनाचा लाखो रूपयांचा महसूल बुडवून हा प्रकार सर्रास सुरू आहे. माफियांपुढे पोलिस व महसूल प्रशासन शरण गेले असून त्यांचेवर काहीच कारवाई केली जात आहे.  वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर कडक कारवाई करून बुडवलेला महसूल वसुल करावा, उपसा केलेल्या वाळूचे पंचनामे करावेत आणि तातडीने उपसा थांबवावा या मागणीसाठी भाजपचे ज्येष्ठ ...