पोस्ट्स

MB NEWS- पञकार धनंजय आढाव यांना पितृशोक दशरथ आढाव यांचे वृद्धापकाळाने निधन

इमेज
 पञकार धनंजय आढाव यांना पितृशोक  दशरथ आढाव यांचे वृद्धापकाळाने निधन  परळी l प्रतिनिधी दैनिक दिव्य मराठी परळी तालुका प्रतिनिधी धनंजय आढाव यांचे वडिल दशरथ आढाव यांचे आज शनिवार दि.22 मे रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे. मृत्यूसमयी ते 72 वर्षांचे होते.  मौजे निळा येथील दशरथ दादा आढाव यांचे अल्पशा आजाराने शनिवार, दि.22 मे रोजी दुपारच्या सुमारास निधन झाले. अचानक त्यांना प्रकृती अस्वास्थ्य जाणवू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डक्टरांनी तपासणी केल्यानंतर प्राणज्योत मालवल्याचे कळवले. दशरथ दादा आढाव हे निळा व पंचक्रोशीतील सर्वपरिचित व्यक्तिमत्त्व होते. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांत त्यांचा हिरीरीने सहभाग असायचा. अतिशय शांत, संयमी आणि लोकपरिचित व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, एक मुलगी, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. आढाव कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात परळीचा संपूर्ण पत्रकार परिवार सहभागी आहे.

MB NEWS- *सेवानिवृत्त शिक्षक उत्तम बांगर यांचे निधन*

इमेज
 *सेवानिवृत्त शिक्षक उत्तम बांगर यांचे निधन* परळी वैजनाथ - शहरातील गणेशपार भागातील रहिवासी असलेले उत्तम भगवानराव बांगर यांचे काल गुरुवार दि.20 रोजी रात्री 8 च्या सुमारास निधन झाले.मृत्यसमयी ते 72 वर्षांचे होते.जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत त्यांनी अनेक वर्षे शिक्षक म्हणून आपले कर्तव्य पार पाडले. गणेशपार येथील मूळ रहिवासी असलेले उत्तम बांगर यांचा सर्वदूर परिचय होता.गेले काही वर्षांपासून ते पुणे येथे वास्तव्यास होते. गुरुवारी रात्री हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.बांगर यांच्या पार्थिवावर पुणे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगी, 2 मुले असा परिवार आहे.

MB NEWS-पाच दिवसाच्या अंतराने काळे पितापुत्राचे निधन वैदिक क्षेत्रातील चाणक्य हरवले समाजावर शोककळा-समाधान कुलकर्णी

इमेज
  पाच दिवसाच्या अंतराने काळे पितापुत्राचे निधन  वैदिक क्षेत्रातील चाणक्य हरवले  समाजावर शोककळा-समाधान कुलकर्णी  प्रतिनिधी-परळी कासारवाडी.ता.बार्शी येथील वेद विज्ञान आश्रमाचे रघुनाथ उर्फ केतन नानासाहेब काळे वय 53 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे त्याच्या पश्चात आई पत्नी मुलगा मुलगी दोन भाऊ असा परिवार आहे काल रात्री त्याच्यां पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले पाच दिवसापूर्वीच 15 मे रोजी केतन काळे यांचे सुपुत्र भार्गव वय.26 यांचेही अल्पशा आजाराने निधन झाले होते पाच दिवसांच्या अंतरावर एकाच कुटुंबातील वडिल आणि मुलाचे निधन झाल्याने शेकडो युवकांना संस्काराने घडविणाऱ्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे बार्शीतील पहिले संघचालक कै.बाबासाहेब काळे यांचे ते नातु.होत कै नानासाहेब यांच्या नेतृत्वाखाली देश विदेशापर्यंत अनेक ठिकाणी वैदिक कार्यक्रम पिता पुत्राने केले त्यांची वैदिक.करण्याची पद्धत खुप छान होती विद्यार्थ्यांवर आई वडिलासारखा प्रेम करणे हे गुण अंगिकारण करणे हे गुरूजीच्या स्वभावच होता कोणालाही परका समजला नाही विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ दिला नाही हेच आमचे माय बाप आहेत अस म्हणत...

MB NEWS- *गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या आयसोलेशन सेंटरमधील रूग्णांना मिळतोय गोपीनाथ गडावरील आंब्यांचा गोडवा !* *पंकजाताई मुंडे घेत असलेल्या काळजीबद्दल रूग्णांच्या चेहर्‍यांवर कृतज्ञतेचे भाव*

इमेज
 *गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या आयसोलेशन सेंटरमधील रूग्णांना मिळतोय गोपीनाथ गडावरील आंब्यांचा गोडवा !* *पंकजाताई मुंडे घेत असलेल्या काळजीबद्दल रूग्णांच्या चेहर्‍यांवर कृतज्ञतेचे भाव*  परळी । दिनांक २०।  गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान मार्फत सुरू असलेल्या आयसोलेशन (विलगीकरण) सेंटरमधील रूग्णांना दररोजच्या जेवणात गोपीनाथ गडावरील मधुर आणि रसाळ आंब्यांची चव चाखायला मिळत आहे. पंकजाताई मुंडे यांच्या आग्रही सूचनेनुसार प्रतिष्ठानच्या टीमने अक्षय्य तृतीयेपासून रूग्णांच्या दैनंदिन आहारात याचा समावेश केल्याने जेवणाची लज्जत आणखी वाढल्याचे समाधान रूग्णांच्या चेहर्‍यावर दिसून येत आहे.   लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांना आंबा, चिंच, बोरं, जांब अशी विविध प्रकारची फळं खूप आवडायची. या सर्व फळांची झाडे पंकजाताई मुंडे यांनी गोपीनाथ गडावर लावलेली आहेत. सध्या मोसम असल्याने मोठया प्रमाणावर आंबे आले आहेत. सदर आंबे लोकनेत्याचा 'प्रसाद' म्हणून आयसोलेशन सेंटर मधील रूग्णांना द्यावीत अशी सूचना पंकजाताई मुंडे यांनी कार्यकर्त्यांना केली होती, त्यानुसार त्यांनी गडावरील आंबे सेंटरमध्ये पोहोचवली. डाॅक्टरां...

MB NEWS-शालेय क्रमिक पुस्तकांचा नियोजनबध्द विनियोग करून शासनाच्या शेकडो कोटी रुपयांची बचत करा चंदुलाल बियाणी यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री व विविध खात्याच्या मंत्र्यांना निवेदन

इमेज
  शालेय क्रमिक पुस्तकांचा नियोजनबध्द विनियोग करून शासनाच्या शेकडो कोटी रुपयांची बचत करा  चंदुलाल बियाणी यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री व विविध खात्याच्या मंत्र्यांना निवेदन   परळी l प्रतिनिधी      इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतची सर्व विषयांची व सर्व माध्यमांची पुस्तके विद्यार्थ्यांना मोफत वाटप करण्यात येतात. मागील शैक्षणीक वर्षापासून कोरोना महामारीमुळे सर्व शाळा बंद आहेत. इयत्ता १ ते ४ थी च्या शाळा उघडल्याच नाहीत तर इतर इयत्तांचे वर्ग काही दिवसच भरले त्यातच अभ्यासक्रमही कपात केला गेला. आँनलाईन शिक्षणामुळे पाठ्यपुस्तके फारशी वापरली गेली नाहीत. बंद मुळे शाळांना सर्व विद्यार्थ्यांना पुस्तके देणे शक्य झाले नाहीं त्यामुळे गतवर्षी छापण्यात आलेली पुस्तके तशीच पडून आहेत. या पुस्तकांचा विनियोग करण्यात यावा जेणेकरून दरवर्षी मराठी, इंग्रजी, उर्दूसह अनेक भाषांची पुस्तके छापण्यास येणारा शेकडो कोटी रुपयांची बचत होऊ शकते अशा आशयाचे निवेदन बीड जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी मुख्यमंत्री उद्धव ...

MB NEWS-लेख:महिला सक्षमीकरण व समाजोपयोगी उपक्रमावर भर देणारी प्रशासक डॉ. रेखा परळीकर✍️संजय देशमुख,अध्यक्ष-कै.ल.दे.महिला महाविद्यालय,परळी वैजनाथ.

इमेज
  महिला सक्षमीकरण व समाजोपयोगी उपक्रमावर भर देणारी प्रशासक डॉ. रेखा परळीकर कै .लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या , डॉ .रेखा परळीकर हे नाव विद्यापीठ परिक्षेत्रात सर्वपरिचित असं नाव होतं. त्यामुळे या परिक्षेत्रात आमच्या महाविद्यालयाची एक वेगळी ओळख निर्माण झाली होती.विद्यापीठाच्या सिनेट मेंबर व विद्या परिषद सदस्य म्हणूनही काही काळ त्यांनी उत्कृष्ट कार्ये केलं. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे विद्यापीठात त्यांचा दबदबा होता .एक वेगळे वजन होते.         आमच्या महाविद्यालयात त्या २००३पासून कार्यरत होत्या . या दीड तपाच्या कालावधीत महाविद्यालयात काही धाडसी निर्णय त्यांनी घेतले . त्यामुळे कर्मचाऱ्यांचे प्रश्न , विद्यार्थ्यांचे प्रश्न सुव्यवस्थित मार्गी लागण्यास त्यांच्या भूमिकांची चांगलीच मदत आम्हाला झाली. त्यांच्या उत्तम कार्यशैलीमुळे ' नॅक ' मूल्यांकनात महाविद्यालयाने दोनदा ' बी ' दर्जा प्राप्त केला . ही आमच्यासाठी भूषणावह बाब आहे . संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आमचे वडील आदरणीय स्व . श्यामरावजी देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ घेतलेली 'आंतरविद्यापीठीय...

MB NEWS-प्रेमी युगुलाची गळफास घेऊन आत्महत्या

इमेज
  प्रेमी युगुलाची गळफास घेऊन आत्महत्या राजेवाडीतील घटना : झाडाच्या फांदीला एकाच ओढणीने घेतला गळफास अंबाजोगाई : तालुक्यातील राजेवाडी येथील २४ वर्षीय तरुण आणि १८ वर्षीय तरुणीने झाडाच्या फांदीला एकत्रित गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि.१९) दुपारी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. प्रेमप्रकरणातून त्या दोघांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त होत आहे.  अनिता शेषेराव राठोड (वय १८) आणि प्रवीण सुधाकर काचगुंडे (वय २४) दोघेही रा. राजेवाडी, ता. अंबाजोगाई अशी त्या दोघा मयतांची नावे आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनिता आणि प्रवीण हे दोघेही बुधवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास आपापल्या घरातून बाहेर पडले होते. त्यानंतर त्यांनी सकाळी अंदाजे ११ वाजताच्या आसपास राजेवाडी शिवारातील गायरानाच्या उतारावरील लिंबाच्या झाडाच्या एकाच फांदीला एकाच ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी ४ वाजताच्या सुमारास काही ग्रामस्थांच्या ही घटना लक्षात आल्यानंतर त्यांनी अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांना त्याबाबत माहिती दिली. ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरिक्षक महादेव राऊत, उपनिरिक्षक केंद्रे, बीट अंम...