MB NEWS-प्रेमी युगुलाची गळफास घेऊन आत्महत्या

 प्रेमी युगुलाची गळफास घेऊन आत्महत्या



राजेवाडीतील घटना : झाडाच्या फांदीला एकाच ओढणीने घेतला गळफास


अंबाजोगाई : तालुक्यातील राजेवाडी येथील २४ वर्षीय तरुण आणि १८ वर्षीय तरुणीने झाडाच्या फांदीला एकत्रित गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि.१९) दुपारी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. प्रेमप्रकरणातून त्या दोघांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त होत आहे. 


अनिता शेषेराव राठोड (वय १८) आणि प्रवीण सुधाकर काचगुंडे (वय २४) दोघेही रा. राजेवाडी, ता. अंबाजोगाई अशी त्या दोघा मयतांची नावे आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनिता आणि प्रवीण हे दोघेही बुधवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास आपापल्या घरातून बाहेर पडले होते. त्यानंतर त्यांनी सकाळी अंदाजे ११ वाजताच्या आसपास राजेवाडी शिवारातील गायरानाच्या उतारावरील लिंबाच्या झाडाच्या एकाच फांदीला एकाच ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी ४ वाजताच्या सुमारास काही ग्रामस्थांच्या ही घटना लक्षात आल्यानंतर त्यांनी अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांना त्याबाबत माहिती दिली. ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरिक्षक महादेव राऊत, उपनिरिक्षक केंद्रे, बीट अंमलदार गुट्टे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.  पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वाराती रुग्णालयात पाठविण्यात आले. दरम्यान, प्रेमप्रकरणाला होत असलेल्या विरोधामुळे या प्रेमी युगुलाने आत्महत्या केली असल्याची चर्चा आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !