पोस्ट्स

MB NEWS-जिवलग मित्र आणि सहकारी गमावला - धनंजय मुंडे*

इमेज
 * जिवलग मित्र आणि सहकारी गमावला - धनंजय मुंडे* परळी दि. 29 --- परळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष बाबू नंबरदार हे महा विकास आघाडीतील काँग्रेस या घटक पक्षाचे परळी शहराध्यक्ष म्हणून सहकारी तर होतेच पण त्याहीपेक्षा त्यांचे आणि माझे जिवलग मित्राचे नाते होते आज मी माझा जिवलग मित्र गमावला आहे अशा शब्दात बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. बाबु नंबरदार यांच्यासोबत आपण विद्यार्थी दशेपासून सोबत होतो. अनेक वर्षे सोबत क्रिकेट खेळले आहे. क्रिकेटचे वेड असलेले बाबू नंबरदार हे संपूर्ण बीड जिल्ह्यात आपल्या शैलीमुळे परळीचे अझरुद्दीन  म्हणून प्रसिद्ध होते.  क्रिकेट सोबतच परळीच्या राजकीय सामाजिक जीवनातही आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती त्यांच्या निधनाने परळीच्या क्रीडा आणि राजकीय क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाली आहे त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे.

MB NEWS-परळीवरच्या सुक्ष्म सुरक्षा नजरेची 'नजरबंदी' : शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा बंद

इमेज
    परळीत पोलीसांची संख्या कमी- शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा बंद ; चोरट्यांना मोकळं रान-चोरीच्या घटना वाढल्या परळी वैजनाथ, प्रतिनिधी....        परळी शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने शहरावर नजर रहावी यासाठी सार्वजनिक ठिकाणी मुख्य रस्त्यावर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती.मात्र गेल्या अनेक दिवसांपासून ही यंत्रणा केवळ शोभेची वस्तू बनली आहे.शहरातील बहुतांश सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे समोर आले आहे.सध्या कोरोना काळात शहराची सुरक्षाच एकप्रकारे रामभरोसे झाली आहे.        परळी शहरात प्रमुख चौक, रस्ते तसेच सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून या सर्व कॅमेर्‍यांचा नियंत्रण कक्ष शहर ठाण्यात आहे. परंतु मागील काही महिन्यांपासून सीसीटीव्ही कॅमेरे पुर्णपणे बंद असून ही यंत्रणा धुळखात पडली आहे. गुन्हेगारी रोखण्यासोबत गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी असलेली अत्याधुनिक व तेवढीच उपयुक्त यंत्रणा तातडीने पुन्हा कार्यरत होणे गरजेचे आहे. परळी शहरात सुरक्षेच्या दृष्टीने मुख्य रस्त्यावर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित केलेली असुन जवळप...

MB NEWS-गाढे पिंपळगाव येथे माता रमाईस अभिवादन करुन बोधिवृक्षाचे रोपण

इमेज
 * गाढे पिंपळगाव येथे माता रमाईस अभिवादन करुन बोधिवृक्षाचे रोपण                 परळी वैजनाथ ------ परळी तालुक्यातील  गाढे पिंपळगाव ता परळी येथे बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची सावली माता रमाई यांच्या स्मृतिदिनी अभिवादन करुन बोधिवृक्षाचे रोपण करण्यात आले.माता रमाई आंबेडकर यांच्या स्मृतिदिनी गाढे पिंपळगाव येथे सर्व प्रथम तथागत गौतम बुद्ध, डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला बोधिसत्व प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन रणखांबे आणि योगेश जगताप यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.सामुदायिक त्रिसरण पंचशील ग्रहण केल्यानंतर सचिन रणखांबे यांनी माता रमाई आंबेडकर यांच्याविषयी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विनोद घुंबरे यांनी केले. माता रमाई आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त गाढे पिंपळगाव येथील स्मशानभूमीत बोधिवृक्षाचे रोपण करण्यात आले.याप्रसंगी बोधिसत्व प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन रणखांबे, ऑफ इंडिया पॅंथर सेनेचे परळी ता महासचिव विनोद घुंबरे, सुरज घागरमाळे, सिध्दार्थ घुंबरे, नितीन रोडे, हर्षद घुंबरे, प्रदिप घुंबरे,...

MB NEWS-*✍️दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय, ‘असा’ लागणार दहावीचा निकाल*

इमेज
-----------------------------------------  *✍️दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय, ‘असा’ लागणार दहावीचा निकाल* ------------------------------------------ मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता शालेय शिक्षण मंत्री वर्षागायकवाड यांनी दहावीचा निकाल कसा लावणार याविषयी निकष जाहीर केले आहेत. दहावीच्या निकालाचे निकष जाहीर करताना वर्षा गायकवाड यांनी दहावीचा निकाल जूनअखेर लावू असं म्हटलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना निकालाबाबत समाधान नसेल त्यांच्यासाठी श्रेणी सुधार योजनेअंतर्गत दोन संधी उपलब्ध राहतील, असं म्हटलं आहे, गेले अनेक दिवस १०वी आणि १२वीच्या परीक्षेवरुन त्यानंतर त्याच्या निकालावरुन सावाळा गोंधळ उडाला होता. पालक, विद्यार्थी यांच्यातही संभ्रम निर्माण झाला होता. या सगळ्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. राज्यातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचं आरोग्य हेच सरकारचं प्राधान्य आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर बोलवणं योग्य होणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा ...

MB NEWS-परळी ब्लड डायरी तर्फे परळीत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

इमेज
  परळी ब्लड डायरी तर्फे परळीत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन परळी (प्रतिनिधी) :- दि २८ मे २०२१ कोरोना च्या पार्श्वभूमीवर रक्ततुटवड्याचे संकट लक्षात घेऊन परळी ब्लड डायरी तर्फे आज रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आला आहे जमाते इस्लामी हिंद परळीचा कार्यालयात रक्तदान शिबिरचा आयोजन करण्यात आलेला आहे सकाळी 10 ते दुपारी 04 पर्यंत हा रक्तदान शिबिर परळी ब्लड डायरी व इतर संघटना च्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात येत आहे जमात ए इस्लामी हिंद परळी, नय्यर ग्रुप ,खिदमत फाऊंडेशन , हजरत उमर फारुख ग्रुप, AK बॉईज, स्टुडन्ट इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया परळी, टिपू सुलतान युवा मंच परळी, एम पी जे परळी. या सर्व संघटनांचा समावेश आहे. रक्तदान शिबीर घेण्याचा उद्देश परळीत जेव्हा रक्ताची गरज असते तेव्हा स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालय ब्लड बँक अंबाजोगाई तिथून रक्त पुरवठा केला जातो सध्या कोरोना महामारी मुळे रक्ततुटवड्याचे संकट लक्षात घेऊन परळी ब्लड डायरी च्या वतीने रक्तदान शिबिराचा आयोजन केलेला आहे तरी सर्व परळीकरांना खास करून युवकांना विनंती आहे जास्तीत जास्त रक्तदान करून या परिस्थितीत सामान्य जन माणूस व शासनाल...

MB NEWS-उद्या मिळणार नागरिकांना कोविशिल्ड लस

इमेज
  उद्या मिळणार नागरिकांना कोविशिल्ड लस  परळी वैजनाथ, प्रतिनिधी....     शहरातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस मिळणार असुन उद्या दि.२८ रोजी कोविशिल्ड लस उपलब्ध असणार आहे. लसिकरणासाठी चे नियोजन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण मोरे यांनी जाहीर केले आहे.

MB NEWS-महर्षी नारदाच्या गादीचा निष्काम सेवक परळी पंचक्रोशीने गमावला; नारद जयंतीलाच इहलोकीचा प्रवास सोडला ✍️ शिक्षण सभापती गोपाळ आंधळे यांनी वाहिलेली शब्द श्रद्धांजली

इमेज
  महर्षी नारदाच्या गादीचा निष्काम सेवक परळी पंचक्रोशीने गमावला; नारद जयंतीलाच इहलोकीचा प्रवास सोडला   ह .भ.प. पुरुषोत्तम महाराज उखळीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली! संत श्रेष्ठ वैकुंठवासी गुरूवर्य सोपान काकांच्या गादीचा खराखुरा वारस, सोपान काकांचे आमच्या समूळ समाजावर खूप मोठे उपकार आहेत. त्यांच्यामुळेच समाजाच्या गळ्यात तुळशीची माळ पडली. आणि समाज आध्यात्मिक बनला. त्यांचे वारसदार वैराग्यमुर्ती, वै.ह.भ.प.पुरुषोत्तम महाराज उखळीकर हे आयुष्यभर नारदाच्या गादीचे निष्काम सेवक होते. कधीच मान-पान न पहाता केवळ भक्ती करत परळी तालुक्यातील हजारो लोकांना भक्ती मार्ग दाखवला. आणि आज महर्षी नारद जयंती दिनीच त्यांनी आपले अवतार कार्य संपविले.  वैकुंठवासी गुरूवर्य पुरुषोत्तम महाराज यांच्या आत्म्यास प्रभू श्री वैद्यनाथ चिरशांती देवो हीच प्रार्थना! माझ्या वतीने आणि आंधळे कुटुंबीयांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! उखळीकर कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो हीच पांडूरंग चरणी प्रार्थना! 👏👏👏 ✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️ गोपाळ आंधळे,  शिक्षण सभापती,नगर परिषद परळी वैजनाथ.