MB NEWS-परळीत पोलीसांची संख्या कमी- शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा बंद ; चोरट्यांना मोकळं रान-चोरीच्या घटना वाढल्या

परळीत पोलीसांची संख्या कमी- शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा बंद ; चोरट्यांना मोकळं रान-चोरीच्या घटना वाढल्या परळी वैजनाथ, प्रतिनिधी.... परळी शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने शहरावर नजर रहावी यासाठी सार्वजनिक ठिकाणी मुख्य रस्त्यावर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती.मात्र गेल्या अनेक दिवसांपासून ही यंत्रणा केवळ शोभेची वस्तू बनली आहे.शहरातील बहुतांश सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे समोर आले आहे.सध्या कोरोना काळात शहराची सुरक्षाच एकप्रकारे रामभरोसे झाली आहे. परळी शहरात प्रमुख चौक, रस्ते तसेच सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून या सर्व कॅमेर्यांचा नियंत्रण कक्ष शहर ठाण्यात आहे. परंतु मागील काही महिन्यांपासून सीसीटीव्ही कॅमेरे पुर्णपणे बंद असून ही यंत्रणा धुळखात पडली आहे. गुन्हेगारी रोखण्यासोबत गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी असलेली अत्याधुनिक व तेवढीच उपयुक्त यंत्रणा तातडीने पुन्हा कार्यरत होणे गरजेचे आहे. परळी शहरात सुरक्षेच्या दृष्टीने मुख्य रस्त्यावर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित केलेली असुन जवळपास ५२ कॅमेरे...