पोस्ट्स

MB NEWS-*⭕Maharashtra Lockdown : ... तर कदाचित आपल्याला लॉकडाऊन लावावा लागेल, मुख्यमंत्री ठाकरेंचं मोठं वक्तव्य*

इमेज
 🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴 ------------------------------------------  *⭕Maharashtra Lockdown : ... तर कदाचित आपल्याला लॉकडाऊन लावावा लागेल, मुख्यमंत्री ठाकरेंचं मोठं वक्तव्य* ------------------------------------------  मुंबई :  राज्यातील ऑक्सिजन साठ्यात फार काही विशेष वाढ झालेली नाही. राज्यात कोविड रुग्णांसाठी 700 मेट्रिक टनांपर्यंत ऑक्सिजन जेव्हा लागेल तेव्हा कदाचित आपल्याला राज्यात लॉकडाऊन (Maharashtra Lockdown update) लावावा लागेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी म्हटलं आहे.  मुंबईतील खास बाल कोविड काळजी केंद्राचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन आज उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.  उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की,  आज जनतेच्या सेवेसाठी दोन आरोग्यसेवेचे लोकार्पण झालं आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. इतर देशात, राज्यात लहान मुलांमध्ये कोरोना संसर्ग वाढलेला आहे.  आपल्याकडे हा संसर्ग वाढणार नाही, तरी आपण तयारी सर्व गोष्टींची ठेवत आहोत, असं ते म्हणाले. ते म्हणाले की, त्याच अनुषंगाने लहान मुलांना कोविडची लागण झ...

MB NEWS-आजचा कोविड अहवाल: आज परळी तालुक्याचा आकडा ०१ तर जिल्ह्यात ११५पाॅझिटिव्ह_

इमेज
 * आजचा कोविड अहवाल: आज परळी तालुक्याचा आकडा ०१ तर जिल्ह्यात ११५पाॅझिटिव्ह_ परळी वैजनाथ, प्रतिनिधी....         आरोग्य प्रशासनाच्या वतीने कोविड -१९ रुग्णांच्या बाबतीत दैनंदिन अहवाल जाहीर करण्यात येतो.आजच्या अहवालात परळी तालुक्यातील संख्या ०१ आहे.                    आजच्या कोविड- 19 दैनंदिन अहवालात जिल्ह्यात पाॅझिटिव्ह रुग्णसंख्या ११५ आहे.संख्या ओसरत असतानाच परळी तालुक्याची संख्या हळूहळू झिरो पाॅझिटिव्हकडे जाताना दिसत आहे. कोरोना संसर्गाची साखळी  संपुर्णतः तुटलेली दिसून येत नाही. झिरो कोरोणा करण्याच्या दृष्टीने नागरिकांनी सतर्कता बाळगण्याची नितांत आवश्यकता असून कोविड विषयक नियमांचे पालन करावे व सोशल डिस्टंसिंग, मास्कचा वापर, आदी मूलभूत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

MB NEWS-धर्मापुरी येथील श्री मरळसिद्ध मल्लिकार्जुन देवस्थान येथे श्री ष. ब्र. 108 श्री नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांचे श्रावणमास तपोनुष्ठान सुरू

इमेज
  धर्मापुरी येथील श्री मरळसिद्ध  मल्लिकार्जुन देवस्थान येथे श्री ष.  ब्र. 108 श्री नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांचे श्रावणमास तपोनुष्ठान सुरू परळी वैजनाथ, प्रतिनिधी...        तालुक्यातील धर्मापुरी येथील श्री मरळसिद्ध मल्लिकार्जुन देवस्थान येथे श्री श्री ष. ब्र. 108 श्री नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठ यांचे विसावे श्रावणमास तपोनुष्ठान रविवार दिनांक 15 ऑगस्ट 2021पासून सुरू झाले आहे .या तपोनुष्ठान ची सांगता बुधवार दिनांक 8 सप्टेंबर 2021 रोजी होणार आहे.            श्रावणमास तपोनुष्ठाना मध्ये रोज इष्टलिंग, महापूजा व तीर्थप्रसाद सकाळी 9 ते 12 दरम्यान तर दुपारी 12 ते 2 दरम्यान महाप्रसाद व दुपारी 4 ते 6च्या दरम्यान जप ,भजन व अध्यात्म चिंतन होत आहे. कोरोना च्या पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळून श्रावणमास तपोनुष्ठान सुरू आहे . याचा भाविक, भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री नंदिकेश्वर महिला भजनी मंडळ व श्री नंदिकेश्वर विचारमंच सदस्य यांनी केले आहे . या अनुष्...

MB NEWS-परळीत काॕग्रेसला गतवैभव मिळवून देऊ - सय्यद हानिफ सय्यद करिम

इमेज
  परळीत काॕग्रेसला गतवैभव मिळवून देऊ - सय्यद हानिफ सय्यद करिम परळी वैजनाथ, प्रतिनिधी... परळी शहर काॕग्रेस कमिटीच्या शहराध्यक्षपदी नुकतीच सय्यद हानिफ सय्यद करिम उर्फ बाहदुर भाई यांची निवड झाली आहे.बहादुर भाई यांनी शहराध्यक्ष पदाची जवाबदारी स्विकारताच शहर काॕग्रेस कार्यकर्त्यांची व्यापक बैठक घेतली.बैठक संपन्न होताच पञकार परिषद घेऊन पञकारांशी बहादुर भाई यांनी संवाद साधला.यावेळी काॕग्रेसचे जेष्ठनेते बाबुराव मुंडे,वसंत मुंडे ,प्रकाश देशमुख,अवस्थी,अॕड संजय रोडे अदी नेतेगन उपस्थित होते. पञकारांशी संवाद साधतांना बहादुर भाई यांनी सांगितले कि,राज्यात आघाडी सरकार मध्ये असलो तरी राज्यात पुढे होऊ घातलेल्या निवडणुका काॕग्रेस स्वबळावर लढवणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यापुर्वीच जाहिर केल्याने परळी नगर परिषदेच्या निवडणुका कुढल्याही पक्षाची आघाडी न करता स्वबळावर लढवुन परळी नगर परिषदेवर काॕग्रेसचा झेंडा फडकवणार असल्याचे सांगितले.शहराच्या विविध नागरी प्रश्नावर लवकरच पालकमंञी ना.धनंजय मुंडे यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.काॕग्रेस पक्षच भाजपाला सत्तेपासुन दुर करु शकतो.पुन्हा एकद...

MB NEWS-जागतिक छायाचित्र दिन उत्साहात साजरा.

इमेज
  जागतिक छायाचित्र दिन उत्साहात साजरा परळी वैजनाथ, प्रतिनिधी... फोटोग्राफर असोसिएशन च्या वतीने आयोजित करण्यात आलेला जागतिक छायाचित्र दिन सर्व फोटोग्राफर एकत्र येवून उत्साहात साजरा केला. जागतिक छायाचित्र दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला कार्यक्रमाचे उद्घाटन मा. श्री. चंदुलाल बियाणी यांच्या शुभहस्ते श्री वैद्यनाथची प्रतिमा व फोटोग्राफरसाठी प्रकाशाचा एकमेव मार्ग असणारा सूर्य यांच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच प्रमुख पाहुणे बाजीरावजी भैय्या धर्माधिकारी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व श्रीफळ वाढवून करण्यात आला. प्रसंगी चंदुलाल बियाणी यांनी छायाचित्रकारांसाठी छायाचित्र भवन साठी जागा उपलब्ध करून देण्यात येईल व संघटितपणे काम करून परळीचे नावलौकिक करावे अशा शुभेच्छा दिल्या. बाजीराव भैया यांनी मी परळीतील विविध छायाचित्रकारांचे कौतुक करून छायाचित्र भवन व आर्ट गॅलरी उभारण्यासाठी आपण सदैव असोसिएशन च्या पाठीशी राहू व सदैव मदत करत राहूत‌. पण काम करणाऱ्या व्यक्तींना इतरांनी सहकार्य करावे कार्य करणाऱ्यांना खोडा घालू नये "जयचंद" होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली.व सर्व छायाचित्रकारांना शुभेच्छ...

"हमारी छोरियां भी छोरो से कम नही" -पंकजा मुंडे

इमेज
  "हमारी छोरियां भी छोरो से कम नही" -पंकजा मुंडे पाथर्डी च्या आयुषी खेडकरची वायु सेनेत वैमानिकपदी निवड;पंकजा मुंडे यांनी केले अभिनंदन  परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....       पाथर्डी च्या आयुषी खेडकरची वायुसेनेत वैमानिकपदी निवड झाली आहे.या निवडीबद्दल पंकजा मुंडे यांनी खास शब्दांत तिचे अभिनंदन केले आहे."हमारी छोरियां भी छोरो से कम नही" असे म्हणत पंकजा यांनी कौतुक केले आहे.        पाथर्डी चे  डॉ. नितीन व डॉ. मनीषा खेडकर यांची कन्या कु. आयुषी नितीन खेडकर हिची भारतीय वायू सेनेमध्ये वैमानिक (FIGHTER PILOT IN INDIAN AIR FORCE) म्हणून निवड झाली आहे. त्या बद्दल तिचे अभिनंदन करुन भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आयुषी तुझा आम्हाला अभिमान आहे. असे म्हणत सोशल मीडियामध्ये पोस्ट केली आहे. 🕳️ अशी आहे पंकजा मुंडे यांची फेसबुक व ट्विटरवर पोस्ट.......           "हमारी छोरियां भी छोरो से कम नही" पाथर्डी चे आमचे डॉ. नितीन व डॉ. मनीषा खेडकर यांची कन्या कु. आयुषी नितीन खेडकर हिची भारतीय वायू सेनेमध्ये वैमानिक FIGHTER PILOT IN INDIAN ...

MB NEWS-आजचा कोविड अहवाल: आज परळी तालुक्याचा आकडा नि‌रंक तर जिल्ह्यात १४३ पाॅझिटिव्ह_

इमेज
 * आजचा कोविड अहवाल: आज परळी तालुक्याचा आकडा नि‌रंक तर जिल्ह्यात १४३ पाॅझिटिव्ह_ परळी वैजनाथ, प्रतिनिधी....         आरोग्य प्रशासनाच्या वतीने कोविड -१९ रुग्णांच्या बाबतीत दैनंदिन अहवाल जाहीर करण्यात येतो.आजच्या अहवालात परळी तालुक्यातील संख्या ०० आहे.                    आजच्या कोविड- 19 दैनंदिन अहवालात जिल्ह्यात पाॅझिटिव्ह रुग्णसंख्या १४३ आहे.संख्या ओसरत असतानाच परळी तालुक्याची संख्या हळूहळू झिरो पाॅझिटिव्हकडे जाताना दिसत आहे. कोरोना संसर्गाची साखळी  संपुर्णतः तुटलेली दिसून येत नाही. झिरो कोरोणा करण्याच्या दृष्टीने नागरिकांनी सतर्कता बाळगण्याची नितांत आवश्यकता असून कोविड विषयक नियमांचे पालन करावे व सोशल डिस्टंसिंग, मास्कचा वापर, आदी मूलभूत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.