पोस्ट्स

MB NEWS-श्री पार्डीकर महाविद्यालयात 'कोविड-19 लसीकरण' मोहिम

इमेज
  श्री पार्डीकर महाविद्यालयात 'कोविड-19 लसीकरण' मोहिम  सिरसाळा , प्रतिनिधी :- येथील श्री पंडितगुरु पार्डीकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आज दि. 28/10/2021, गुरुवार रोजी "मिशन युवा स्वास्थ" अभियानांतर्गत कोविड-19 लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रा डॉ. हरिभाऊ कदम, तर प्रमुख उपस्थितीत डॉ. एम बी धोंडगे हे उपस्थित होते. तसेच सिरसाळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य कर्मचारी श्री राऊत साहेब, परदेशी मॅडम, नागरगोजे मॅडम, मुंढे मॅडम, श्री जाधव साहेब हे उपस्थित होते.प्रसंगी प्राचार्य डॉ हरीभाऊ कदम यांनी कोविड-19 लसीकरणाचे महत्त्व विषद केले. उद्घाटनानंतर लगेच प्रत्यक्ष लसीकरण मोहीमेस सुरुवात करण्यात आली. या मोहिमेत ऐकून 42 विद्यार्थ्यानी लसीकरनाचा लाभ घेतला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ जयदिप सोळंके यांनी, सुत्रसंचालन प्रा. दयानंद झिंझुर्डे तर आभार प्रा. अरुणा वाळके यांनी मानले.ही लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

MB NEWS-दिवाळीच्या तोंडावर खोळंबा: परळी बस आगारातून एकही बस सुटली नाही;एसटी कामगारांचे बेमुदत उपोषण

इमेज
  दिवाळीच्या तोंडावर खोळंबा: परळी बस आगारातून एकही बस सुटली नाही;एसटी कामगारांचे बेमुदत उपोषण  परळी वैजनाथ, प्रतिनिधी :           एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी संयुक्त कृती समितीच्या वतीने 27 ऑक्टोबरपासून राज्यस्तरीय बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. या उपोषणास पाठिंबा म्हणून परळी येथे एसटी कामगारांनीही गुरुवारपासून उपोषण सुरू केले आहे. एसटीचे सर्व कर्मचारी संपात सहभागी झाल्याने आज आगारातून एकही बस सुटू शकली नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रवासाचा खोळंबा झाला आहे.       एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी संयुक्त कृती समितीच्या वतीने वार्षिक वेतन वाढीचा दर तीन टक्के करावा, राज्य सरकारप्रमाणे देय महागाई भत्ता अदा करावा ,राज्य सरकारप्रमाणे देय घर भाडे अदा करावे, सण उचल म्हणून बारा हजार पाचशे रुपये दिवाळीपूर्वी अदा करावी , दिवाळीपूर्वी पंधरा हजार रुपये बोनस मिळावा या मागणीसाठी संयुक्त कृती समितीच्या वतीने एसटी कामगारांच्या मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू करण्य...

MB NEWS- *ज्योतिर्लिंगक्षेत्र परळी वैजनाथ येथे पवित्र कार्तिक मासानिमित्त नवकुंडी शतचंडी यागाचे आयोजन* 🕳️ _भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेण्याचे आवाहन_🕳️

इमेज
 *ज्योतिर्लिंगक्षेत्र परळी वैजनाथ येथे पवित्र कार्तिक मासानिमित्त नवकुंडी शतचंडी यागाचे आयोजन* 🕳️ _भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेण्याचे आवाहन_🕳️  परळीवैजनाथ, प्रतिनिधी....         बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग क्षेत्र असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या पावन भूमीत परळी वैजनाथ येथे पवित्र कार्तिक मासानिमित्त नवकुंडी शतचंडी यागाचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक पर्वणीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.           धर्मशास्त्रात शतचंडी यागाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. कार्तिक माहात्म्य मोठ्या प्रमाणावर असून या पर्वणीत विविध धार्मिक विधी व साधनांना अतिशय महत्त्व आहे. या अनुषंगाने ज्योतिर्लिंग क्षेत्र असलेल्या परळी वैजनाथ येथे नवकुंडी शतचंडी यागाचे आयोजन करण्यात आले आहे. वैद्यनाथ मंदिरच्या बाजूला वक्रेश्वर मंदिर येथे दि. 12 ते 16 नोव्हेंबर या कालावधीत हा याग सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्यात धार्मिक क्षेत्रातील उच्चपदस्थ संत- महंत यांची उपस्थिती लाभणार आहे. यामध्ये कर्नाटकमधिल स्वामी संकेश्वर मठाचे शंकराचार्य ...

MB NEWS- 'महिमा श्री वडवालसिद्ध नागनाथांचा 'या पुस्तकांचे प्रकाशन आणि श्रीनागनाथ देवस्थान वेबसाईटचे उद्घाटन

इमेज
 'महिमा श्री वडवालसिद्ध नागनाथांचा 'या पुस्तकाचे  प्रकाशन आणि श्रीनागनाथ देवस्थान  वेबसाईटचे उद्घाटन सोलापुर (प्रतिनिधी) महेश कोटिवाले लिखित महिमा श्री वडवालसिध्द नागनाथांचा या पुस्तकांचे प्रकाशन  आणि श्रीनागनाथ देवस्थान  वेबसाईटचे उद्घाटन संपन्नसंतवाॾ:मयाचे संशोधक ह.भ.प.ॲड.दत्तामहाराज आंधळे यांचे हस्ते  मान्यवरांच्या उपस्थितीत दस-याच्या शुभमुहूर्तावर श्रीश्रेत्र वडवाल येथे संपन्न झाले. श्रीनागनाथ देवस्थान पंचकमेटी यांनी या नेत्रदिपक सोहळयाचे आयोजन केले होते. या  प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना ॲड दत्ता महाराज आंधळे म्हणाले की,नागेश संप्रदाय हा सर्वसमावेशक आणि समन्वयक असलेला संप्रदाय असून याचे सखोल संशोधन होणे गरजेचे आहे.नागनाथ देवस्थान पंचकमेटी स्तुत्य उपक्रम आणि समाज उपयोगी योजना राबवित असल्याबाबत पंचकमेटी चे कौतुक केले.याकार्यक्रमास खर्गेमहाराज,पोपट शिवपुजे महाराज,आकाश शिवपुजे महाराज,राजेंद्रबुवाखर्गे महाराज, पोलिस निरिक्षक आकाश सायकर, नागनाथ देवस्थान पंचकमेटी अध्यक्ष श्री श्रीकांत शिवपुजे,लेखक महेश कोटिवाले,ॲड हिंदुराव देशमुख,आण्णासाहेब देशमुख...

MB NEWS-*स्व. पंडितअण्णा मुंडे स्मृतीप्रित्यर्थ हरिहर महाराज दिवेगावकर यांच्या वाणीतून सुरू असलेल्या भागवत सप्ताहाची सांगता*

इमेज
  *स्व. पंडितअण्णा मुंडे स्मृतीप्रित्यर्थ हरिहर महाराज दिवेगावकर यांच्या वाणीतून सुरू असलेल्या भागवत सप्ताहाची सांगता* *ह.भ.प. समाधान महाराज केजकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता* *स्व.पंडित अण्णांच्या स्मृतींनी धनंजय मुंडे भावुक* परळी (दि. 17) ---- : बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, कृषी महर्षी स्व. पंडित अण्णा मुंडे यांच्या 5 व्या पुण्यतिथीनिमित्त मुंडे परिवाराच्या वतीने मागील 7 दिवसांपासून सुरू असलेल्या बालयोगी ह.भ.प. हरिहर महाराज दिवेगावकर यांच्या श्री वाणीतून सुरू असलेल्या भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याची आज सांगता झाली.  या सप्ताहाच्या सांगतेवेळी ह.भ.प. समाधान महाराज शर्मा (केजकर) यांचे काल्याचे कीर्तन संपन्न झाले. बालयोगी हरिहर महाराजांच्या वाणीतून भागवत कथेचा शेवट व त्यानंतर संगीत विशारद ह.भ.प. शर्मा महाराज यांचे संगीतमय सुश्राव्य कीर्तन यामुळे वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते. यावेळी ना. धनंजय मुंडे यांच्या सह मुंडे कुटुंबीय, नाथरा व पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते. तत्पूर्वी ना. धनंजय मुंडे यांनी स्व. पंडित अण्णा मुंडे यांचे नाथरा निवासस्थान येथील स्मृ...

MB NEWS-राधा-मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने दमा आजारावर आयुर्वेदाचार्य चंदुलालजी कलंत्री यांच्या औषधींचे मोफत वितरण रुग्णांनी नाव नोंदणी करण्याचे संयोजकांचे आवाहन

इमेज
  राधा-मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने दमा आजारावर आयुर्वेदाचार्य चंदुलालजी कलंत्री यांच्या औषधींचे मोफत वितरण रुग्णांनी नाव नोंदणी करण्याचे संयोजकांचे आवाहन परळी (प्रतिनिधी-) राधा-मोहन साथी प्रतिष्ठान परळीच्या वतीने कोजागिरी पोर्णीमेच्या दिवशी दूधातून घेण्यासाठीचे दमा आजारावरील मोफत औषधींचे वितरण करण्यात येत आहे. बीड येथील आयुर्वेदाचार्य वैद्य चंदुलालजी कलंत्री (बाबूजी) यांनी सदरचे औषध तयार केले असून मागील अनेक वर्षापासून त्याचे वितरण करण्यात येते. दमा आजारावर अत्यंत प्रभावशाली औषध त्यांनी तयार केले असून कोजागिरी पोर्णिमेच्या दिवशी परळीतील दमा रुग्णांसाठी औषधी दिली जाणार असल्याचे राधा-मोहन साथी प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी सांगीतले. दमा आजाराने अनेकांना विविध प्रकारचे औषध घेऊनसुद्धा गुण येत नसल्याची तक्रार असते. परंतु बीड येथील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य वैद्य चंदुलालजी कलंत्री यांनी तयार केलेली औषधी मागील 75 वर्षापासून दिली जात असून त्याचा दमा आजारावर योग्य उपार झाल्याचे अनेकांनी सांगीतलेले आहे. सदरील औैषधी उपयुक्त असल्याने बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी मागील अनेक वर्षापासू...

MB NEWS- *राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनाने वेधले लक्ष; ठिकठिकाणी भगव्या ध्वजाचे पुष्पवृष्टीने स्वागत* *_असंख्य हिंदूंच्या कार्यामुळेच अयोध्येतील श्रीराम मंदिर उभे राहत आहे - शरद हेबाळकर_*

इमेज
 *राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनाने वेधले लक्ष; ठिकठिकाणी भगव्या ध्वजाचे पुष्पवृष्टीने स्वागत* *_असंख्य हिंदूंच्या कार्यामुळेच अयोध्येतील श्रीराम मंदिर उभे राहत आहे - शरद हेबाळकर_* प्रतिनिधी।परळी वैजनाथ दि.17- राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे घेण्यात येणाऱ्या वार्षिक उत्सवांपैकी एक असलेल्या विजयादशमी उत्सव 17ऑक्टोबर रविवार रोजी शहरातील औद्योगिक वसाहतीच्या सभागृहात उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमाचे आयोजन परळी वैजनाथ शाखेतर्फे करण्यात आले होते.विजयादशमी उत्सवानिमित्त शहरात पथसंचलन करण्यात आले.पथसंचलनानंतर झालेल्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून शरद हेबाळकर (अखिल भारतीय इतिहास संकलन समिती, उपाध्यक्ष) अंबाजोगाई यांची उपस्थिती होती. 1982 पासून सुरू असलेल्या कार्याचे फळ म्हणूनच आज अयोध्येतील श्रीराम मंदिर होत आहे.यामध्ये हजारो साधूंना, रामभक्तांना बलिदान द्यावे लागले.संघटन रोजच्या शाखेतून चालते,संघाचे कार्य परिस्थिती निरपेक्ष आहे.असे शरद हेबाळकर यावेळी म्हणाले त्यांनी संघाच्या कार्याची माहिती देत उपस्थितांना मार्गदर्शन केले.प्रमुख पाहुणे म्हणून प्रभाकर वेरुळे,जिल्हा संघचालक प्रा.उ...