पोस्ट्स

MB NEWS- *प्रामाणिकपणा : ६५हजार रोख व अतिमहत्त्वाची कागदपत्रे असलेली रस्त्यावर सापडलेली बॅग केली सुपूर्द*

इमेज
प्रामाणिकपणा : ६५हजार रोख व अतिमहत्त्वाची कागदपत्रे असलेली रस्त्यावर सापडलेली बॅग केली सुपूर्द परळी वैजनाथ, प्रतिनिधी....       ६५हजार रोख व अतिमहत्त्वाची कागदपत्रे असलेली रस्त्यावर सापडलेली बॅग पोलिसांकडे जमा केली व ज्याची होती त्याला सुपुर्द करण्यात आली.एका हाॅटेल चालकाने हा प्रामाणिकपणा दाखवला.त्याबद्दल पोलिसांनी त्यांचा सत्कार करुन कौतुक केले.        प्रामाणिक माणसेही आजही आहेत याचे मूर्तिमंत उदाहरण शनिवारी परळीत घडलेल्या घटनेवरून लक्षात येईल. विशाल हॉटेलचे संचालक दत्ता लहूदास मुंडे यांनी हा प्रमाणिकपणा सिद्ध केला आहे. अंबाजोगाई येथील रहिवासी शेख सादेक हे परळीहून अंबाजोगाईला  रिक्षाने जात होते. आपली बॅग त्यांनी रिक्षाच्या मागच्या बाजूस  ठेवली. अंबाजोगाई येथे पोचल्यानंतर रिक्षातून उतरत असतांना आपली बॅग नसल्याचं लक्षात आलं.  परळी ते अंबाजोगाई रोडवर कण्हेरवाडी येथील विशाल हॉटेलचे मालक दत्ता लहूदास मुंडे यांना हॉटेलसमोर मुख्य रस्त्यावर बॅग पडलेली आढळून आली. बॅग त्यांनी तात्काळ शहर पोलीस ठाण्यात आणून दिली. बॅग मालकाचा शोध घेतला.बॅगमधील मह...

MB NEWS-प्रदीप मुंडे यांच्या नेतृत्वाखाली संतप्त कृषी पंप धारक शेतकरी महावितरण कार्यालयावर धडकले

इमेज
  प्रदीप मुंडे यांच्या नेतृत्वाखाली संतप्त कृषी पंप धारक शेतकरी महावितरण कार्यालयावर धडकले परळी वैजनाथ/प्रतिनिधी महावितरण कार्यालयाच्या वतीने शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे वीज कनेक्शन तोडले जात आहे या पार्श्वभूमीवर नागापूर गटाचे जिल्हा परिषद सदस्य प्रदीप मुंडे (बबलू सेठ)यांच्या नेतृत्वाखाली संतप्त कृषी पंप धारक शेतकरी महावितरण कार्यालयावर धडकले.   नागापूर जिल्हा परिषद गटातील नागापूर,मांडेखेल , अस्वल आंबा तडोळी दौनापूर वानटाकळी ,मोहा, गडदेवाडी ,कावळेवाडी तसेच परिसरातील संतप्त शेतकरी यांनी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप भैय्या मुंडे यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयावर आंदोलन केले आंदोलन करताच सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या.    परळी कार्यालयातील महावितरणचे उप अभियंता मा. आंबडकर साहेब यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करून तोडलेले कृषी पंपाचे कनेक्शन पूर्ववत करणार अशी ग्वाही दिली.       या आंदोलनास संबोधित करताना प्रदीप भैया मुंडे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत लोकनेते प्रा. टी.पी.मुंडे (सर)यांच्या मार्गदर्...

MB NEWS- *वैद्यनाथ मंदिर आरडीएक्सने उडविण्याचे धमकीचे पत्र ; पोलीस सतर्क-वेगाने तपास; दोघांना घेतले ताब्यात*

इमेज
 *वैद्यनाथ मंदिर आरडीएक्सने उडविण्याचे धमकीचे पत्र ; पोलीस सतर्क-वेगाने तपास; दोघांना घेतले ताब्यात*  परळी वैजनाथ,...        बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचव्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग असलेल्या परळी येथील प्रभू वैद्यनाथ देवल समितीचे विश्वस्त यांना आपण फार मोठ्या मंदिर संस्थानचे विश्वस्त आहात. आतापर्यंत आपल्या मंदिराला भरमसाट देणगी रुपाने रक्कम मिळाली आहे. मी फार मोठा नामी गुंड, ड्रग माफिया व गावठी पिस्तूलधारक आहे. मला तातडीची गरज भागविण्यासाठी ५० लाख रुपयांची गरज आहे. हे पत्र मिळताच पत्त्यावर रक्कम पोहोच करावी, अन्यथा मी वैद्यनाथ मंदिर माझ्याकडील आरडीएक्सने उडवीन, अशी धमकी असलेल्या कथित ड्रग माफियाने पत्राद्वारे दिली. यामुळे संस्थानच्या तक्रारीवरुन शहर ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पोलिसांनी मंदिराची सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.         शुक्रवारी वैद्यनाथ मंदिर सचिव राजेश देशमुख हे मंदिरात आले असताना टपालाद्वारे आलेली पत्रे ते पाहात होते. यातील एक पत्र व्यंकट गुरुपद मठपती (स्वामी) या नावाने आले होते. ते त्यांनी वाचून पाहिले अन् त्यांना धक्का...

MB NEWS-कोणीही घाबरून जाऊ नये;वैद्यनाथ मंदिर उडवून देण्याची धमकी देणारे गजाआड दिसतील-ना.धनंजय मुंडे

इमेज
  कोणीही घाबरून जाऊ नये;वैद्यनाथ मंदिर उडवून देण्याची धमकी देणारे गजाआड दिसतील-ना.धनंजय मुंडे    परळी वैजनाथ, प्रतिनिधी....         वैद्यनाथ मंदिर उडवून देण्याची धमकी देणारे गजाआड दिसतील.कोणीही घाबरून जाऊ नये असे आवाहन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री  ना.धनंजय मुंडे यांनी केले आहे. याबाबत फेसबुक पोस्ट करुन ना.धनंजय मुंडे यांनी धमकीच्या पत्राबाबत गांभीर्याने दखल घेतली आहे.         🕳️अशी आहे ना.धनंजय मुंडे यांची फेसबुक पोस्ट.......      श्री क्षेत्र परळी वैद्यनाथ या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एका ज्योतिर्लिंग मंदिरास आरडीएक्सने उडवण्याची धमकी मंदिर ट्रस्टला मिळाली आहे. गृहमंत्री ना. श्री. दिलीप वळसे पाटील साहेब, डिजीपी, बीड एसपी, तसेच दहशतवाद विरोधी पथकास याबाबत माहिती दिली असून, पोलीस खाते याबाबत त्वरित ऍक्शन घेत आहे.  कोणीही घाबरून जाण्याचे कारण नाही, प्रभू वैद्यनाथ मंदिराची एक विट सुद्धा इकडची तिकडे होणार नाही. वैद्यनाथ प्रभू दुःख, अडचणी, आजार बरे करणारे वैद्य हे नाव घ...

MB NEWS-*'५० लाख रुपये द्या,अन्यथा वैद्यनाथ मंदिर आरडीएक्सने उडवू' - धमकीच्या पत्रावरील मोबाईल नंबर इनव्हॅलिड* 🕳️ पोलिसांनी पत्र घेतलं गांभीर्याने;तपास वेगाने सुरू

इमेज
 '५० लाख रुपये द्या,अन्यथा वैद्यनाथ मंदिर आरडीएक्सने उडवू' - धमकीच्या पत्रावरील मोबाईल नंबर इनव्हॅलिड 🕳️ पोलिसांनी पत्र घेतलं गांभीर्याने;तपास वेगाने सुरू    परळी वैजनाथ, प्रतिनिधी...              आपण फार मोठ्या मंदिर संस्थानचे विश्वस्त आहात. आतापर्यंत आपल्या मंदिराला भरमसाठ देणगी रुपाने रक्कम मिळाली आहे. मी फार मोठा नामी गुंड, ड्रग माफिया व गावठी पिस्तूलधारक आहे. मला तातडीची गरज भागविण्यासाठी ५० लाख रुपयांची गरज आहे. हे पत्र मिळताच पत्त्यावर रक्कम पोहोच करावी, अन्यथा मी वैद्यनाथ मंदिर माझ्याकडील आरडीएक्सने उडवीन अशी धमकी असलेल्या कथित ड्रग्स माफियाच्या धमकीच्या पत्राने परळीत एकच खळबळ उडालीय.              संस्थानच्या तक्रारीवरुन शहर ठाण्यात कडून पोलिसांनी मंदिराची सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. पोलीसांनी तपासाची सूत्र हलवली आहेत. देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक प्रभू वैद्यनाथाचे मंदिर परळी येथे आहे. या मंदिराच्या दर्शनासाठी राज्य व पर राज्यातून भाविक येतात. सध्या मंदिरात भाविकांची गर्दी आहे. शुक्रवारी ...

MB NEWS-26/11 हल्ल्यातील शहिदांना रक्तदानातून श्रद्धांजली कृष्णतेज सामाजिक प्रतिष्ठानचा उपक्रम

इमेज
  26/11 हल्ल्यातील शहिदांना रक्तदानातून श्रद्धांजली कृष्णतेज सामाजिक प्रतिष्ठानचा उपक्रम परळी | प्रतिनिधी मुंबई येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला तो आजचाच दिवस पण यात रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढून दहशतवाद्यांना यमसदनी पाठवणाऱ्या शूरवीरांना परळी येथिल 22 जणांनी रक्तदान करून आदरांजली वाहिली. कृष्णतेज सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते परळी व परिसरातील युवकांनी  रक्तदानाच्या या राष्ट्रीय कार्यात सहभाग घेतला. आज शुक्रवार दि.26 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वा.उपजिल्हा रुग्णालय, परळी वैजनाथ येथे सदरील शिबीरास सुरुवात झाली. अंबाजोगाई येथील शासकीय रक्तपेढीच्या वतीने रक्तसंकलन करण्यात आले. सदरील शिबिरात रक्तदान करणाऱ्या तसेच रक्तपेढी व रुग्णालयातील अधिकारी कर्मचारी या सर्वांचे कृष्णतेज सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने अभिनंदन करण्यात आले असून शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले तर याकामी उपजिल्हा रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी सहकार्य केले. शासकीय रक्तपेढी अंबाजोगाई येथील डॉ.अनुराधा डाके, शशिकांत पारखे, शेख, अफसर...

MB NEWS-जगात सर्वश्रेष्ठ संविधान भारत देशाचे-प्राचार्य अतुल दुबे* *यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन व शहीद दिन साजरा.*

इमेज
 * जगात सर्वश्रेष्ठ संविधान भारत देशाचे-प्राचार्य अतुल दुबे* *यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन व शहीद दिन साजरा.*         परळी वैजनाथ परळी वैजनाथ येथील यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिना निमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामूहिक संविधान प्रस्तावनेचे वाचन करत संविधान दिन व मुबंईच्या अतिरेकी हल्यात शहीदाना श्रद्धांजली अर्पण करून शहीद दिन साजरा करण्यात आला. 26 नोव्हेंबर हा दिवस देशात संविधान दिन म्हणुन साजरा केला जातो याच अनुषंगाने यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिना निमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामूहिक संविधान प्रस्तावनेचे वाचन करण्यात आले तर मुबंई येथील 26/11च्या अतिरेकी हल्यात शहीद झालेल्या पोलीस जवानांना श्रध्दांजली अर्पण करून शहीद दिन साजरा केला. या वेळी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.अतुल दुबे म्हणाले की समाजातील स्त्री-पुरुष,गरीब-श्रीमंत या सर्वांना समान अधिकार देऊन सर्वसामान्य माणसाला सर्वच पदावर काम करण्याची संधी उपलब्ध करून देणारे जगात सर्वश्रेष्ठ संविधा...