पोस्ट्स

MB NEWS- *कै. जगन्नाथ रानबा पाळवदे स्वर्ण पदकाने तेजस्विनी सावंत हिला मानसशास्त्र विषयात सर्वप्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल गौरव*

इमेज
 *कै. जगन्नाथ रानबा पाळवदे स्वर्ण पदकाने तेजस्विनी सावंत हिला मानसशास्त्र विषयात सर्वप्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल गौरव* परळी वैजनाथ /परभणी (प्रतिनिधी) :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या उन्हाळी 2021 परीक्षेत एम.ए मानसशास्त्र विषयात येथील बी. रघुनाथ महाविद्यालयाची विद्यार्थीनी कु सावंत तेजस्विनी उत्तम हि विद्यापीठात सर्वप्रथम आलेली असल्यामुळे कै. जगन्नाथ रानबा पाळवदे स्वर्ण पदकाने गौरविण्यात आले .  स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे झालेल्या पुरस्कार वितरण समारंभात नादेड परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी यांच्या हस्ते व कुलगुरू डॉ उद्धव भोसले प्र कुलगुरू जोगेंद्र सिंह बिसेन कुलसचिव सर्जेराव शिंदे परीक्षा नियंत्रक रवि सरोदे यांच्या उपस्थितीत सुवर्णपदक बहाल करण्यात आले, तीच्या या यशाबद्दल गोदावरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅड . अशोक सोनी उपाध्यक्ष सुरेश शर्मा, सचिव ओमप्रकाश डागा, सहसचिव अनिल हराळ , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विलास सोनवणे मानसशास्त्र विभागप्रमुख डॉ नागोराव पाळवदे डॉ गणेश वायकोस तसेच महाविद्यालया...

MB NEWS-सोमवंशी आर्य क्षत्रिय समाज प्रादेशिक संस्थेच्या मराठवाडा उपाध्यक्षपदी संजय क्षिरसागर

इमेज
  सोमवंशी आर्य क्षत्रिय समाज प्रादेशिक संस्थेच्या मराठवाडा उपाध्यक्षपदी संजय क्षिरसागर परळी (प्रतिनिधी) सोमवंशी आर्य क्षत्रिय समाज प्रादेशिक संस्था महाराष्ट्र राज्यची त्रैमासिक तसेच वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पुणे येथे पार पडली. या सभेत संस्थेच्या मराठवाडा विभागीय उपाध्यक्षपदी येथील पत्रकार संजय क्षिरसागर यांची नियुक्ती करण्यात आली.         सभेच्या सुरुवातीला स्वर्गीय राजाभाऊ संगमनेरकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.तसेच त्यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर सोलापूरचे गुरूदत्त प्रभू चव्हाण यांची लोकशाही पद्धतीने निवडणूक प्रक्रियेद्वारे निवड करण्यात आली. यावेळी संस्थेच्या कोकण विभागीय उपाध्यक्षपदी चिपळूणचे संदीप मनोरकर यांची तर मराठवाडा विभागीय उपाध्यक्षपदी परळी येथील पत्रकार तथा किसान ट्रॅक्टर स्पेअर चे संचालक संजय क्षीरसागर यांची सर्वसंमतीने नियुक्ती करण्यात आली. तसेच विशेष सभासद म्हणून अंबादास दिल्लीकर यांची नियुक्ती करण्यात आली.         मोहनरावजी पिंपळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेमध्ये लातूर येथील समाजाच्या जनगणना सूची चे अन...

MB NEWS- *धारदार शस्त्राने गळा चिरून ३५ते४०वर्षिय इसमाची हत्या* *पाय बांधलेला व शस्त्रांचे वार असलेला मृतदेह सिरसाळ्याजवळ वांगी तलावात आढळला *

इमेज
 ⬛ धारदार शस्त्राने गळा चिरून ३५ते४०वर्षिय इसमाची हत्या* 🌑 पाय बांधलेला व शस्त्रांचे वार असलेला मृतदेह सिरसाळ्याजवळ वांगी तलावात आढळला  परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....        धारदार शस्त्राने गळा चिरून व शरीरावर इतर ठिकाणी शास्त्राचे वार करत एका 35 ते 40 वर्षीय अज्ञात इसमाची हत्या झाल्याचे उघड झाले आहे. सिरसाळा जवळील बीड रस्त्याच्या उत्तर बाजूला असलेल्या वांगी तलावात दोरीने पाय बांधलेला मृतदेह आढळून आला आहे. याप्रकरणी पोलिसात अज्ञात आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.             याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, दिनांक 1 डिसेंबर रोजी दुपारी 4:30 वाजण्याच्या सुमारास सिरसाळा- बीड रस्त्यावर उत्तर बाजुला असलेल्या वांगी तलावात 35 ते 40 वर्षीय इसमाचे प्रेत आढळून आले. हा मृतदेह काढला असताता या मृत इसमाचे दोन्ही पाय घोट्याजवळ बांधून तलावात फेकल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. त्याचप्रमाणे मृत इसमाच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार असल्याचेही दिसून आले आहे. यामध्ये कानाच्या डाव्या बाजूस...

MB NEWS-प्रा. डॉ. विठ्ठल रा. भोसले यांना संशोधक मार्गदर्शक म्हणून मान्यता..

इमेज
  प्रा. डॉ. विठ्ठल रा. भोसले यांना संशोधक मार्गदर्शक म्हणून मान्यता सिरसाळा (प्रतिनिधी):- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,औरंगाबाद यांच्या मार्फत श्री पंडितगुरु पार्डीकर महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण विषयाचे विभाग प्रमुख तथा सहाय्यक प्राध्यापक डाॅ. विठ्ठल रामकिशन भोसले यांना शारिरीक शिक्षण विषयाचे संशोधक मार्गदर्शक म्हणून मान्यता दिली आहे.  सन 2012 मध्ये त्यांनी आपले एम. फिल. शिक्षणशास्त्र संकुल, स्वा. रा. ती. म. विद्यापीठ, नांदेड येथून डॉ. सिंकुकुमार सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले व संशोधनाची खरी सुरुवात केली.  सन 2013 मध्ये त्यांनी आपले शारिरीक शिक्षण या विषयात पी.एच.डी चे संशोधन कार्य  शिक्षणशास्त्र संकुल, स्वा. रा. ती. म. विद्यापीठ, नांदेड येथून डॉ. सिंकुकुमार सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केले.  सन 8 मार्च 2016 रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्याकडून त्यांना पी.एच.डी पदवी प्रदान करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात त्यांनी शिक्षणशास्त्र संकुल, स्वा. रा. ती. म. विद्यापीठ येथे स्पोर्ट्स ट्रेनर, रिसर्च असोसिएट यापदा...

MB NEWS-दिव्यांग व गोरगरीबांच्या कल्याणासाठी डॉ.संतोष मुंडे यांचे कार्य अद्वितीय- मुख्य अभियंता मोहन आव्हाड* *दिव्यांग बांधवांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा- उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे* *जागतिक दिव्यांग दिनानिमीत्त नेत्र तपासणी शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद*

इमेज
 * दिव्यांग व गोरगरीबांच्या कल्याणासाठी डॉ.संतोष मुंडे यांचे कार्य अद्वितीय- मुख्य अभियंता मोहन आव्हाड* *दिव्यांग बांधवांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा- उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे*  *जागतिक दिव्यांग दिनानिमीत्त  नेत्र तपासणी शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद*    परळी  वैजनाथ (प्रतिनिधी) :-     महाराष्ट्रातील दिव्यांगाचे अनेक प्रश्न असुन या प्रश्नांची सोडवणुक करण्यासाठी डॉ.संतोष मुंडे हे सतत कार्यरत असतात दिव्यांग व गोरगरीबांच्या कल्याणासाठी त्यांचे कार्य हे अद्वितीय असल्याचे प्रतिपादन परळी औष्णीक वीज निर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांनी केले. दिव्यांग बांधवांनी शासनाच्या विविध योजनेचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे यांनी बोलताना व्यक्त केले आहे.       शहरातील श्रीनाथ हाँस्पीटल येथे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांच्या हस्ते व तहसिलदार सुरेश शेजुळ यांच्या उपस्थितीत शिबीराचे उद्घाटन...

MB NEWS-नामदेवशास्त्री महाराज यांचा पुतळा जाळणे,बेकायदेशीर जमाव करणे व परळी बंदच्या घोषणा प्रकरणी राष्ट्रवादी पदाधिकार्यांची निर्दोष मुक्तता*

इमेज
 * नामदेवशास्त्री महाराज यांचा पुतळा जाळणे, बेकायदेशीर जमाव करणे व परळी बंदच्या घोषणा प्रकरणी राष्ट्रवादी पदाधिकार्यांची निर्दोष मुक्तता परळी वैजनाथ, प्रतिनिधी....     सन २०१५ मध्ये तत्कालीन विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्या गाडीवर भगवानगड येथे झालेल्या दगडफेकीच्या घटनेचे पडसाद परळीत उमटले होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकार्यांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करत आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या होत्या.याप्रकरणी पोलिसांनी पदाधिकार्यांवर नामदेवशास्त्री महाराज यांचा पुतळा जाळणे, बेकायदेशीर जमाव करणे व परळी बंदच्या घोषणा आदी दोषारोप ठेउन गुन्हे दाखल केले होते.याप्रकरणात परळी न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकार्यांची निर्दोष मुक्तता केली आहे.            तत्कालीन विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्या गाडीवर श्रीक्षेत्र भगवान गड येथे 4 जानेवारी 2015 रोजी  दगडफेक झाली होती. याचे पडसाद म्हणून परळी येथील राष्ट्रवादीचे तात्कालीन नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, तात्कालीन शहराध्यक्ष चंदुलाल बियाणी तसेच नगरसेवक शकील कुरेशी,अझिझ ...

MB NEWS-⬛ *आजचे राशिभविष्य

इमेज
  ⬛ आजचे राशिभविष्य ⬛      *दि.२ डिसेंबर २०२१* मेष – कौटुंबिक वादविवाद मिटतील. भागीदारीतील व्यावसायिकांना लाभदायक दिवस. प्रवासाचे योग संभवतात. जोडीदाराची साथ लाभेल. मनासारख्या घटना घडतील. वृषभ – शत्रू नामोहरम होतील. आर्थिक प्रगती होईल. पदोन्‍नतीचे योग. जबाबदारी वाढेल. सज्जनांचा सहवास लाभेल. नोकरदारांच्या कामाचे कौतुक होईल. मिथुन – जुन्या गुंतवणुकीमध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे. ठरवलेल्या कामांमध्ये अडचणी. गुंतवणूक करण्यास अयोग्य दिवस. प्रेम प्रकरणांमध्ये अपयश संभवते. कर्क – वडिलोपार्जित प्रॉपर्टीच्या कामांमध्ये अडचणी येतील. विषय समजून प्रतिक्रिया द्या. अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका. कामाचे नियोजन करा. सिंह – आत्मविश्‍वास वाढवणार्‍या घटना घडतील. कलाकार व लेखकांना लाभदायक दिवस. मित्रमंडळींच्या सहकार्याने कामांना गती मिळेल. इच्छापूर्ती होईल. कन्या- आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. आत्मविश्‍वास महत्त्वाचा. वाणीवर नियंत्रण आवश्यक आहे. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. तुळ – आवडत्या मित्रमंडळींचा सहवास लाभेल. अतिथ्यामधे दिवस जाईल. खरेदीचे योग संभवतात. एकंदर लाभदायक दिवस....