MB NEWS-सकाळी सत्कार, संध्याकाळी अटक;लाचखोर फौजदार एसीबीच्या जाळ्यात
सकाळी सत्कार,संध्याकाळी अटक;लाचखोर फौजदार एसीबीच्या जाळ्यात पाटोदा , प्रतिनिधी..... तक्रारदाराचा गुन्ह्यात जप्त केलेला मोबाईल परत करण्यासाठी तसेच आरोपीस अटकपूर्व जामीनाला सहकार्य करण्यासाठी पाटोदा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाने 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडअंती 40 हजार रुपयांची लाख स्विकारण्याचे पंचासमक्ष मान्य केले. या प्रकरणी उपनिरीक्षकावर पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.11) बीड एसीबीने केली. या कारवाईने जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या पोलिस उपनिरीक्षकाची सहाय्यक निरीक्षक म्हणून पदोन्नती झाल्या बद्दल शुक्रवारी सकाळी सत्कार करण्यात आला होता. अफरोज तैमीरखा पठाण (वय 38) हे पाटोदा पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनी तक्रारदाराकडे गुन्ह्यातील मोबाईल परत देण्यासाठी व तक्रादाराच्या भावास अटकपुर्व जामीन मंजुर झालेली रद्द न करण्यासाठी, जप्त गाडी व पिस्टल सोडविण्यासाठी चांगला अहवाल देण्यासाठी 50 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती चाळीस हजार रुपये लाच स्विकारण...