MB NEWS-महसुलचे अधिकारी पक्षपातीपणे काम करतात -बहादूरभाई

महसुलचे अधिकारी पक्षपातीपणे काम करतात -बहादूरभाई परळी l प्रतिनिधी परळी तहसील कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी पक्षपाती काम करत आहेत. काँग्रेस पक्षाने राबवलेले उपक्रम चोरून इतर पक्ष त्या उपक्रमांचे श्रेय मतांसाठी घेत आहेत. त्याचबरोबर एका पक्षाचीच कामे केली जात असून इतरांना डावलण्यात येत असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष बहादूरभाई यांनी केला. काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात शुक्रवारी पत्रकार परिषद घेण्यात आली याप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते. Click &Watch:🏵️ *"वात्सल्य शिल्प"*🏵️ *_आपल्या आवती भवती बघा नक्की नैसर्गिक कलाकृती आढळतील._* _MB NEWS ला नक्की Subscribe करा._ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने परळीत पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत महसूल प्रशासन आणि सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून शहरातील रेशन कार्डधारकांच्या मुद्यावर काँग्रेसकडून पाठपुरावा करण्यात येत आहे. धान्य न उचलणाऱ्या कार्डधारकांची नवे वगळून ज्यांना धान्य मिळत नाही त्यांना देण्यात यावे यासाठी पाठपुर...