MB NEWS -ब्राह्मण बहुद्देशीय सभा आयोजित शानदार सोहळ्यात २१ बटुंवर सामुदायिक उपनयन संस्कार !*

ब्राह्मण बहुद्देशीय सभा आयोजित शानदार सोहळ्यात २१ बटुंवर सामुदायिक उपनयन संस्कार !* परळी वै.(प्रतिनिधी)- ब्रह्मवृंदांचा मंत्रघोष, मराठवाड्यातील विविध भागातील समाजबांधवांची उपस्थिती, विधीवत संस्करण व हजारो समाजबांधवांच्या साक्षीने परळीत ब्राह्मण बहुद्देशीय सभा आयोजित शानदार सोहळ्यात २१ बटुंवर सामुदायिक उपनयन संस्कार करण्यात आले. ब्राह्मण समाजाची मध्यवर्ती संस्था असलेल्या ब्राह्मण बहुद्देशीय सभा परळी वै.च्या वतीने आयोजित ४२ वा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा आज ६ मे रोजी शानदार व वैभवी स्वरूपात संपन्न झाला. शानदार सोहळ्यात २१ बटुंवर सामुदायिक उपनयन संस्कार करण्यात आले. ब्रह्मवृंद मान्यवर व समाज बांधवांची सोहळ्यासाठी मोठी उपस्थिती लाभली. गेल्या ४१ वर्षा पासून ब्राह्मण बहुद्देशीय सभा परळी वै.च्या वतीने अविरतपणे हा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा उपक्रम चालवला जातो. शानदार आयोजन, नियोजनबध्द सोहळा या वैशिष्ट्यामुळे हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहे. यावर्षीचा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा सकाळी ११....