MB NEWS-मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान येणार गोपीनाथ गडावर

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान येणार गोपीनाथ गडावर *लोकनेत्याच्या अभिवादनासाठी जनसागर उसळणार ; कीर्तन, महाप्रसादाचे आयोजन* *पंकजाताई मुंडेंकडून गडावरील व्यवस्थेची पाहणी* परळी वैजनाथ ।दिनांक २। लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान उद्या ३ जूनला गोपीनाथ गडावर येणार आहेत. हा स्मृती दिन "संघर्षदिन सन्मान" म्हणुन साजरा केला जाणार असुन सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे. लोकनेत्याला अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखोंचा जनसमुदाय येणार आहे. मुंडे प्रेमींच्या व्यवस्थेसाठी भव्य दिव्य मंडपाच्या उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. दरम्यान, आज भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी कार्यक्रमस्थळी भेट देऊन सर्व व्यवस्थेची पाहणी केली. उद्या ३ जुन रोजी गोपीनाथ गडावर सकाळी 10 ते 12.30 या वेळेत रामायणाचार्य ह. भ. प. रामराव महाराज ढोक यांचे कीर्तन, दुपा...