पोस्ट्स

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...
इमेज
  श्रीमती महानंदाबाई गंगाधरअप्पा बुरांडे यांचा सत्कार  परळी-: जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी माजी खा.गंगाधरअप्पा बुरांडे यांच्या पत्नी श्रीमती महानंदाबाई गंगाधरअप्पा बुरांडे यांचे परळीत भारत देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यावर पुष्पहार घालून व प्रभू श्री वैद्यनाथाची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी नगरसेवक चेतन सौंदळे,शकुंतला परमेश्वरअप्पा बुरांडे, अंबाजोगाईच्या सौ. शर्मिला व्यास,श्री.कुशध्वज व्यास,युवा सेनेचे बीड जिल्हा समन्वयक श्री.अतुल दुबे,संजय खाकरे उपस्थित होते. ---------------------------------------------------------- Click:  *घरफोडी:दीड लाखाची रोख रक्कम चोरली* Click:  *सावधान: ओटीपी विचारून दीड लाखाचा गंडा* Click: *भाजप संसदीय मंडळातून नितीन गडकरी बाहेर तर केंद्रीय निवडणूक प्रचार समितीत देवेंद्र फडणवीस* Click: *राणी लक्ष्मीबाई टॉवर येथील समूह राष्ट्रगीत गायनात नागरिकांचा स्वयंस्फूर्तीने सहभाग* Click: *श्रीमती महानंदाबाई गंगाधरअप्पा बुरांडे यांचा सत्कार* Click: *परळीतील व्यापाऱ्यांनी केले सामूहिक राष्ट्रगीत गायन* Click: ● *वैद्यनाथ ज्य...

●थेट प्रक्षेपण...... परळी वैजनाथ: शिवमहापुराण

इमेज
  परळी येथे आयोजित शिवमहापुराण कथा थेट प्रक्षेपण..      परळी शहरातील वैद्यनाथ कॉलेज समोरील मैदानात सोमवार १५ ऑगस्ट २०२२ पासुन दुपारी १ ते ४ या वेळेत अांतराष्ट्रीय कथा वाचक भागवत भुषण प.पु.प्रदिप मिश्रा यांच्या अभिषेक शिव महापुराण कथेस सुरूवात झाली आहे. ●थेट प्रक्षेपण...... https://youtu.be/tNX8l4ILqz4

MB NEWS-परळीतील व्यापाऱ्यांनी केले सामूहिक राष्ट्रगीत गायन

इमेज
  परळीतील व्यापाऱ्यांनी केले सामूहिक राष्ट्रगीत गायन परळी  प्रतिनिधी  मोंढा व्यापारी असोसिएशनच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त आज बुधवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी समूह राष्ट्रगीत गायन करण्यात आले. या कार्यक्रमात मोंढा परिसरातील असंख्य व्यापारी सहभागी झाले होते.    भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभरात साजरा केला जात असून हर घर तिरंगा नंतर आज महाराष्ट्रात एकाच वेळी समूह राष्ट्रगीत गायन करण्यात आले. परळी येथील मोंढा मार्केट असोसिएशनच्या वतीने आज सकाळी 11 वाजता सायरन वाजताच एकाच वेळी राष्ट्रगीत गायन करण्यात आले. यावेळी संपूर्ण बाजारपेठ राष्ट्रगीता दरम्यान आहे त्या ठिकाणी उभे राहत सहभागी झाली होती. जन गण मन या राष्ट्रगीतांच्या ओळी सुरू होताच सर्वत्र देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले. राष्ट्रगीता नंतर भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणांचा एकच निनाद करण्यात आला . परिसरात सर्वत्र नागरिकही यादरम्यान समूह राष्ट्रगीत गायनात सहभागी झाले होते. परळी येथील मोंढा व्यापारी नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवीत असते आजचा हा उपक्रम देशासाठी आपले बलिदान देणाऱ्यांन...

*मोखाडयातील घटना दुर्दैवी ; सरकारने आदिवासी भागात तातडीने मुलभूत सुविधा पुरवाव्यात* - *पंकजाताई मुंडे यांची राज्य सरकारकडे मागणी*

इमेज
 *मोखाडयातील घटना दुर्दैवी ; सरकारने आदिवासी भागात तातडीने मुलभूत सुविधा पुरवाव्यात*  - *पंकजाताई मुंडे यांची राज्य सरकारकडे मागणी*  मुंबई  ।दिनांक १६। आरोग्य सुविधा वेळेत न मिळाल्याने मोखाडा (जि. पालघर) तालुक्यातील एका गर्भवती महिलेच्या जुळ्या बालकांचा झालेला मृत्यु हा दुर्दैवी आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांत विकासरूपी पोषण अजूनही दुर्गम भागात नाही याचं दुःख आहे असं ट्विट भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केलं आहे. त्यांच्या या ट्विटची आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित यांनी तातडीने दखल घेतली आहे.      जव्हार - मोखाडा सारख्या दुर्गम भागातील आदिवासी महिलेच्या बाबतीत घडलेला हा प्रकार दुर्दैवी आहे, या घटनेने मी व्यथित झाले आहे असे पंकजाताई म्हणाल्या.   "एका माऊलीला जुळ्या मुलांना जीव गमवावा लागला. कारण गावाला रस्ता नाही.गरिबांच्या गरजा आणि जीवाची लढाई आजही कठीण आहे.अमृत महोत्सवी वर्षात देशाच्या या भागात विकास रूपी पोषण अजुनही नाही याचं दुःख व दुर्दैवी वाटले " असं ट्विट त्यांनी केलं आहे.  मी स्वतः याबाबत राज्य सरक...

MB NEWS- *केंद्र सरकाच्या शेतकरी धोरणा विरोधात किसान सभा लढा उभारणार-कॉ अजीत नवले*

इमेज
 *केंद्र सरकाच्या शेतकरी धोरणा विरोधात किसान सभा लढा उभारणार-कॉ अजीत नवले* परळी वै. ता.१५ प्रतिनिधी     शेतकऱ्यांना आस्मानी संकटासोबत लढत असतानाच कार्पोरेट कंपन्या धार्जिणे शासकीय धोरणे, कार्पोरेट लॉबी  यांच्या विरोधात लढा उभारावा लागेल. शेतकऱ्यांचे प्रश्न तीव्र होत असताना राज्यकर्त्यांना मात्र शेतकऱ्यांच्या असंतोषाची भीती वाटत नाही. कारण शेतकरी एकजुटीला भेदणारे शस्त्र जाती आणि धर्म याचा पद्धतशीर वापर करण्याचे तंत्र सत्ताधार्यांनी आत्मसात केले आहे. यावर मात करून आपल्याला लढा पुढे घेऊन जावा लागणार आहे. लढाया व्यक्तीकेंद्री न ठेवता  आपल्या सदसद विवेकातून पेटून उठले पाहिजे असे मत अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सरचिटणीस कॉ अजित नवले यांनी व्यक्त केले आहे.      अखिल भारतीय किसान सभेचे २३ वे बीड जिल्हा अधिवेशन परळी तालुक्यातील मोहा येथील कॉ शिवाजीराव देशमुख नगरीत कॉ नानासाहेब पोकळे सभागृहात रविवारी (ता.१४) पार पडले. यावेळी किसान सभेचे राज्याध्यक्ष कॉ किसन गुजर, व कवी शामसुंदर सोन्नर महाराज यांची प्रमुख उपस्थीती होती. यावेळी बोलताना कॉ अजीत नवले यांनी श...

MB NEWS-LIC मध्ये नौकरीची सुवर्णसंधी

इमेज
  LIC मध्ये नौकरीची सुवर्णसंधी भारतीय आयुर्विमा महामंडळात नोकरी करण्याचा विचार करणाऱ्या तरूणांना सुवर्णसंधी आहे. LIC च्या गृहनिर्माण शाखेमध्ये सहाय्यक आणि सहाय्यक व्यवस्थापकच्या ८० पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. किमान २१ तर कमाल ४० वयोमर्यादा असलेल्या पदवीप्राप्त उमेदवारांकडून २५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. कोणत्याही विषयात पदवी प्राप्त विद्यार्थी या पदांसाठी अर्ज करू शकतात. सहायक प्रबंधक पदासाठी २१ ते ४० पर्यंत तर सहाय्यक पदासाठी २१ ते २८ वर्ष इतकी वयोमर्यादा आहे. सहाय्यक पदासाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवाराला ३३ हजार ९६० रुपये तर सहाय्यक प्रबंधक पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला ८० हजार वेतन मिळणार आहे. असा करा अर्ज..... अर्हता प्राप्त उमेदवार भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या  lichousing.com या वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. उमेदवारांची निवड लेखी परीक्षेसह गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येणार आहे. परिक्षेचे स्वरूप व निवड प्रक्रिया ८० पदांसाठी घेण्यात येणाऱ्या या भरती प्रक्रियेमध्ये ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. या परिक्षेकरी...

●थेट प्रक्षेपण...... परळी वैजनाथ: शिवमहापुराण

इमेज
 परळी येथे आयोजित शिवमहापुराण कथा थेट प्रक्षेपण..     परळी शहरातील वैद्यनाथ कॉलेज समोरील मैदानात सोमवार १५ ऑगस्ट २०२२ पासुन दुपारी १ ते ४ या वेळेत अांतराष्ट्रीय कथा वाचक भागवत भुषण प.पु.प्रदिप मिश्रा यांच्या अभिषेक शिव महापुराण कथेस सुरूवात झाली आहे. ●थेट प्रक्षेपण...... --------------------------------------------- परळी वै.,प्रतिनिधी      बारा ज्योतीर्लिंगापैकी पाचवे ज्योतीर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथांच्या पावण भुमी असलेल्या परळीत येत्या सोमवार १५ ऑगस्ट २०२२ पासुन अांतराष्ट्रीय कथा वाचक भागवत भुषण प.पु.प्रदिप मिश्रा यांच्या अभिषेक शिव महापुराण कथेस सुरूवात होत आहे. मथुरा प्रतिष्ठानने या कथेचे आयोजन करण्यात आले आहे. संबंधित बातमी: *आत्मा परमात्म्याचे मिलन म्हणजे अभिषेक - प.पु.प्रदीप मिश्रा* _भक्तिमय वातावरणात अभिषेक शिवमहापुराण कथेला सुरुवात_

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!