
परळीच्या बाजारपेठेत चोरांचा सुळसुळाट;पाच जणांचे मोबाईल हातोहात पळवले परळी वैजनाथ, प्रतिनिधी.... परळीत चोरांचा प्रचंड सुळसुळाट झाला आहे.परळीतील चोऱ्यांचे सत्र थांबायचे नाव घेत नाही. परळीच्या बाजारपेठेत चोरांचा सुळसुळाट झाला असुन काल दिनांक.29 रोजी सायंकाळी 7.30 वा.सुमारास घरणीकर रोडवरील बाजारात खरेदी करणाऱ्या पाच जणांचे मोबाईल हातोहात पळवले आहेत. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार दि. 29 रोजी सायंकाळी चार ते सात वाजण्याच्या सुमारास धरणीकर रोडवरील बाजारात बाजाराची खरेदी करत असताना फिर्यादी मनोज प्रल्हाद अग्रवाल रा. विद्यानगर परळी वैजनाथ यांचा मोबाईल गर्दीमध्ये अज्ञात चोरट्याने खिशातून काढून घेतला. त्याचबरोबर श्रीनिवास किशनराव कुलकर्णी रा. कावळ्याची वाडी यांचा मोबाईल तसेच अरुण प्रभू चव्हाण रा. वसंत नगर ,बंडू लक्ष्मण मुंडे रा. लिंबुटा, बापूराव विष्णू खोत पाटील रा. शंकर पार्वती नगर परळी वैजनाथ अशा पाच जणांचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी खिशातून काढून नेला. या पाच मोबाईल...